Breaking News

Ramprahar Team

आमदार महेश बालदी यांची दत्त मंदिरास भेट

उरण ः वार्ताहर दत्त जयंतीनिमित्ताने उरण तालुक्यातील म्हातवली ग्रामपंचायत हद्दीतील नवे पोपुड येथील दत्तवाडी येथील दत्त मंदिरास आमदार महेश बालदी यांनी भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी ओम दत्त ठाकूर महाराज ट्रस्टचे ठाकूर महाराज यांचे सुपुत्र निनाद ठाकूर व ओम दत्त ठाकूर, महाराज ट्रस्टचे ट्रस्टी तथा माजी उपनगराध्यक्ष रमेश ठाकूर …

Read More »

डीएनएस बँकेचा नवीन वास्तूत शुभारंभ

पनवेल ः वार्ताहर डोंबिवली नागरी सहकारी बँक (डीएनएस) पनवेल शहरात गेली 10 वर्षे कार्यरत आहे. या कालावधीत नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच बँकेचा व्यवसाय उत्तम प्रकारे वाढण्यासमदत झाली आहे. बँकेची पनवेल शाखा आता आधुनिक सोयीसुविधांयुक्त (एटीएम किंवा ई-लॉबीसह) अशा तळमजल्यावरील वास्तूत स्थलांतरित होत आहे. त्यानिमित्त बँकेच्या आर्थिक परिस्थितीची, व्यवसाय विस्ताराची तसेच निरनिराळ्या …

Read More »

खारघरमधील रस्ते डांबरीकरण कामाला सुरुवात

नगरसेविका संजना कदम यांच्या मागणीला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघरमधील रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात झाली असून या कामासंदर्भात नगरसेविका संजना समीर कदम यांनी खारघरच्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार प्रशांत ठाकूर व सिडको अधिकारी तसेच खारघर येथील सर्व नगरसेवक …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने कळंबोली-कामोठे सर्व्हिस रोडवरील पथदिवे उजळले

स्त्री शक्ती फाऊंडेशनचा पाठपुरावा पनवेल ः वार्ताहर कळंबोली-कामोठे सर्व्हिस रोडवर दोन्ही बाजूला असलेले पथदिवे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद होते. त्यामुळे त्या ठिकाणाहून ये-जा करताना रात्रीच्या वेळी महिलावर्गाला त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्याचप्रमाणे येथे चोरी, लुटमार आदी घटनासुद्धा घडल्या होत्या. यासंदर्भात स्त्री शक्ती फाऊंडेशनने संबंधित पीडब्ल्यूडीचे अधिकारी त्याचप्रमाणे आमदार प्रशांत …

Read More »

अंमली पदार्थांचा विळखा

एकट्या 2017 या वर्षांत जगभरात पाच लाख 85 हजार लोक हे अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे मृत्यूमुखी पडल्याची नोंद आहे. आता वेदनाशामक गोळ्यांचाही अंमली पदार्थांसारखा उपयोग केला जाताना दिसतो व त्याविषयीही संबंधितांकडून चिंता व्यक्त केली जाते. इंजेक्शनद्वारे घेतल्या जाणार्‍या अंमली पदार्थांमुळे अन्य आरोग्यविषयक समस्यांसोबतच एचआयव्हीचा फैलावही होताना दिसतो. अत्यंत गुंतागुंतीच्या अशा या …

Read More »

जलसंवर्धनासाठी महिला सरसावल्या

सिद्धेश्वरमध्ये सलग तिसर्‍या वर्षी उभारला बंधारा पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर बुद्रुक गावातील महिलांनी पाणी संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. या वर्षीदेखील सर्व महिलांनी मिळून येथील ओढ्यावर मातीचा बंधारा बांधून पाणी अडविले आहे. पाण्याचे महत्व लक्षात घेऊन सिद्धेश्वर बुद्रुक गावातील महिला मागील तीन वर्षांपासून पाणी अडवण्यासाठी श्रमदान करीत आहेत. हातात …

Read More »

खोपोलीत पिसाळलेल्या वळूची दहशत

खालापूर : प्रतिनिधी खोपोलीत सध्या मुक्याप्राण्यांची दहशत निर्माण झाली आहे.  शहरातील सोमजाईवाडी मागील आठवड्यात दोन पिसाळलेल्या कुत्र्याने तीन लहान मुलांचा चावा घेऊन जखमी केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि. 11) सकाळी वळू (बैल)ने 75 वर्षांच्या आजीबाईंसह विद्यार्थी व नागरिकांना जखमी केले. प्राथमिक उपचार करून या जखमींना घरी सोडण्यात आले. खोपोली …

Read More »

ट्रेलरवर एसटी बस आदळून अपघात; चारजण जखमी

पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरून पुढे चाललेला ट्रेलर अचानक थांबल्याने पाठिमागून वेगात आलेली एसटी बस ट्रेलरच्या मागील भागावर जोरात आदळली. या अपघातात एसटी बसमधील चार प्रवासी जखमी होऊन एसटी बसचे नुकसान झाले आहे. वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 10) दुपारी 2 च्या सुमारास हा अपघात झाला. ट्रेलर (एमएच-43,बीजी-9498) गोवा- …

Read More »

पेणमध्ये आजपासून राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धा

अलिबाग : प्रतिनिधी पेण येथे 12 व 13 डिसेंबर रोजी  राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातून 16 दिव्यांग संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती समविचारी संघटनंचे अध्यक्ष साईनाथ पवार यांनी दिली.  दरवर्षी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दिव्यांग क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा रायगडला यजमानपद मिळाले …

Read More »

‘रायगड’च्या पायथ्याशी पार्किंग समस्या

शैक्षणिक सहली आणि स्थानिक एसटी फेर्‍यांना अडथळा महाड : प्रतिनिधी महाडजवळील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या चित्तदरवाजा येथील अरुंद जागेमुळे गेल्या अनेक वर्षाचा पार्किंगचा प्रश्न आजही कायम आहे. याठिकाणी बेजबाबदारपणे पार्किंग होत असल्याने किल्ले रायगडपासून पुढे जाणार्‍या एसटी बसला हिरकणीवाडी फाट्यापासूनच परतावे लागत आहे. यामुळे शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना किमान पाच …

Read More »