Breaking News

Ramprahar Team

मावरीक इव्हेंटमध्ये कर्जतचे विद्यार्थी अव्वल

कर्जत : बातमीदार महात्मा एज्युकेशन ट्रस्टच्या रसायनी येथील पिल्ले विद्यालयाच्या विद्या संकुलात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मावरीक इव्हेंटमध्ये रायगड जिल्ह्यातील शंभरहून अधिक माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती सादर केल्या होत्या. त्यात कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलने पहिला क्रमांक पटकावला. कर्जत इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी भार्गव घोडविंदे, सिद्धी बडेकर आणि दर्शन …

Read More »

खोपोलीच्या स्नेहल जोगळेकर ठरल्या ‘मिसेस महाराष्ट्र’

खोपोली : प्रतिनिधी दिवा पॅजन्टच्या वतीने घेण्यात आलेल्या मिसेस महाराष्ट्र इम्प्रेस 2019 या स्पर्धेत खोपोलीच्या स्नेहल जोगळेकर यांनी मिसेस कॉन्फिडन्ट व मिसेस महाराष्ट्र हे मानाचे किताब पटकावले. दिवा पॅजन्ट संस्थेतर्फे 5  ते 8 डिसेंबर या कालावधीत ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये मिसेस महाराष्ट्र इम्प्रेस 2019 ही स्पर्धा घेण्यात आली. संपूर्ण …

Read More »

तासगाव नदीवर श्रमदानातून बंधारा

माणगाव गटविकास अधिकार्‍यांच्या हस्ते जलपूजन माणगाव : प्रतिनिधी पंचायत समिती माणगाव व ग्रुप ग्रामपंचायत भागाड यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव येथील नदीवर श्रमदानातून बंधारा उभारण्यात आला असून, गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्या हस्ते जलपूजनही करण्यात आले. माणगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन गटविकास अधिकार्‍यांनी केले आहे. तालुक्यातील भागाड …

Read More »

कबड्डी संघांची भाईगिरी ठेचा!

रायगड जिल्हा म्हणजे कबड्डीचे माहेरघर समजले जाते. येथे कबड्डीच्या जेवढ्या स्पर्धा होतात तेवढ्या स्पर्धा अन्य जिल्ह्यात होत नाहीत, परंतु याच जिल्ह्यात कबड्डी स्पर्धेत जेवढ्या भानगडी होतात तेवढ्या भानगडी इतर कोणत्याही जिल्ह्यात होत नाहीत. रायगड जिल्ह्यातील कबड्डीला भानगडींचा शाप आहे. याला जबाबदार जेवढे खेळाडू आहेत तेव्हढीच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनदेखील याला …

Read More »

उचलली जीभ…!

नुकत्याच घडलेल्या हैदराबाद येथील एका डॉक्टर युवतीच्या बलात्कार आणि हत्येच्या पार्श्वभूमीवर हे विधान त्यांनी करायला नको होते. बलात्काराच्या घटनांमुळे देशातील जनता आधीच हळवी झाली आहे. सोशल मीडियापासून अन्य अनेक माध्यमांपर्यंत सर्वच स्तरांवर बलात्काराच्या घटनांबद्दल असंतोष व्यक्त होत असताना सुज्ञ पुढार्‍यांनी सांत्वनाचा सूर लावणे अपेक्षित असते, परंतु या सुज्ञपणाची अपेक्षा कुठल्याही …

Read More »

अॅड. आशा भगत यांचे नूतन कार्यालय सुरू

कामोठे ः येथे अ‍ॅड. आशा भगत यांचे नूतन कार्यालय सुरू झाले आहे. या कार्यालयाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी भेट दिली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी अ‍ॅड. भगत यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा …

Read More »

खारघरमध्ये नगरसेवक निधीतून विकासकामे

पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर शहरातील भाजप नगरसेवक रामजीभाई बेरा यांच्या नगरसेवक निधीतून येथील मैदानात जेष्ठ नागरिक तसेच नागरिकांना विसाव्यासाठी शेड उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सिडको नोड मधील विकासकामांमध्ये विविध परवानग्यांचा अडथळा निर्माण होत होता. मात्र सिडको नोडमध्ये पालिकेच्या विकासकामांना मंजुरी मिळाल्याने खारघर शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामांना सुरुवात …

Read More »

‘एमकेसीएल’च्या माध्यमातून रोजगार आणि पदवीची संधी

पनवेल ः प्रतिनिधी एमकेसीएलच्या माध्यमातून रोजगाराच्या अधिक संधींसाठी नवीन एमएससीआयटी दोन प्रकारात उपलब्ध करण्यात येत असून बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘स्टायपेंडसह पदवीची संधी’ देणार असल्याची माहिती एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी गुरुवारी (दि. 12) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या परिषदेस एमकेसीएलचे कोकण समन्वयक …

Read More »

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 25 डिसेंबरपर्यंत दिवाळी अंक सादर करण्याची मुदत

पनवेल ः प्रतिनिधी शैक्षिणक, सामाजिक, कला. क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संपुर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत सहभाग घेण्याची …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात चर्चासत्र

पनवेल ः रामप्रहर वृत्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे गुरुवारी (दि. 12) सायन्स ऑफ टॉक्सिकॉलॉजी व ओन्कलॉजी अवेयरनेस या विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात डॉक्टर अश्विनी फडणीस-मोघे, कोवेंस लेबोरेटरीज, मॅडिसन, यु. एस. ए. यांनी विद्यार्थ्यांना टॉक्सिकॉलॉजी या विषयावर मार्गदर्शन केले. कुठल्याही …

Read More »