Breaking News

Ramprahar Team

पनवेल टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात

 मेल-एक्स्प्रेस सोडण्याची तयारी; देखभाल, दुरुस्तीसाठी केंद्रही उभारणी पनवेल : रामप्रहर वृत्त मध्य रेल्वे पनवेल येथे टर्मिनस आणि कळंबोलीमध्ये देखभाल-दुरुस्ती केंद्र उभारत आहे. टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर 2022 पर्यंत ते पूर्ण होईल आणि 2023 पासून तेथून मेल-एक्स्प्रेस गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली. …

Read More »

पोलिसाने केला वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस दलातील जलद प्रतिसाद पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले स्वप्नील लाटे यांनी त्यांचा वाढदिवस कोप्रोली येथील कै. रामचंद्र कुरुळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था आदिवासी कर्णबधिर-मतिमंद निवासी विद्यालयातील मुलांना क्रिकेट खेळाचे साहित्य, तसेच भेटवस्तू देऊन त्याठिकाणी वाढदिवस साजरा केला. याचबरोबर नवीन पनवेल येथील साई आश्रय या निराधार …

Read More »

रेल्वे मार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील आपटा गावाच्या हद्दीतील पाताळगंगा नदीवर रेल्वेपुलालगत पादचारी जोडपूल तत्काळ बांधण्यात यावा. तसेच रेल्वे अपघात घडल्यास त्याबाबत योग्य तपास करण्यासाठी तपास यंत्रणेला मदत व्हावी, या उद्देशाने रेल्वेचे इंजिन आणि शेवटच्या डब्याला उच्चप्रतिचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी झोनल रेल्वे युजर्स कन्सलटेटीव्ह कमिटीच्या बैठकीत करण्यात आली झोनल …

Read More »

नवी मुंबईत लसीकरणाकडे विशेष लक्ष

 महापालिकेकडून कोरोना प्रतिबंधात्मक सूचना; दुसरा डोस व प्रिकॉशन डोसमधील अंतरही झाले कमी नवी मुंबई : बातमीदार कोव्हीड विषाणूपासून संरक्षणाच्या दृष्टीने कोव्हीड 19 लसीकरण लाभदायी असल्याचे दिसून येत असून नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात जलद कोव्हीड लसीकरणाकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. आत्तापर्यंत 13 लाख 80 हजार 548 नागरिकांनी कोव्हीडचा …

Read More »

‘सर्वोच्च’ धावाधाव

पक्षफुटीच्या कड्याच्या टोकावर अधांतरी लोंबकळणार्‍या शिवसेनेचा आता अस्तित्वासाठीचा लढा सुरू झाल्याचे दिसू लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय तिढा आणि त्यावरील निवाडा दीर्घ काळासाठी लांबणीवर पडेल अशी चिन्हे आहेत. हे सारे अर्थातच मुख्यमंत्री शिंदे यांच्या समर्थक गटाच्या पथ्यावरच पडणारे आहे यात शंका नाही. महाराष्ट्रातील सत्तांतराच्या नाट्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख …

Read More »

पिक विमा योजनेत सहभागी व्हावे

मुरूड तालुका कृषी अधिकारी मनिषा भुजबळ मुरूड : प्रतिनिधी राज्य शासनाने  खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली असून, मुरूड तालुक्यात भारतीय कृषी विमा कंपनीकडून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेत सहभागीसाठी 31 जुलैपर्यंत मुदत असून अधिकाधिक शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी …

Read More »

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी साधला पत्रकारांशी संवाद

पेण : प्रतिनिधी मनसे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीकोणातून संपर्क अभियान सुरु केला असून, रविवारी (दि. 10) त्यांचे पेणमध्ये फटाक्याच्या आतषबाजीत मनसे पदाधिकार्‍यांनी  स्वागत केले. यावेळी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली होती. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अमित ठाकरे यांनी अभिवादन …

Read More »

रोह्यात पावसाचा जोर कायम

रोहे : प्रतिनिधी शहरासह रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम असल्याचे सोमवारी (दि. 11) दिसून आले आहे. सोमवार सकाळपासून अधुनमधून पावसाच्या जोरदार सरी येत होत्या. वातावरण ढगाळ होते. जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसर्‍या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतीला अनकूल पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीची कामे जोरात सुरू आहेत. …

Read More »

माथेरान जुम्मापट्टीजवळ वटवृक्ष कोसळला

कर्जत : प्रतिनिधी माथेरान-नेरळ घाटरस्त्यावर सायंकाळी  साडेचार वाजण्याच्या सुमारास सुमारे शंभर वर्षापूर्वीचे मोठे वडाचे झाड कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही. माथेरानमध्ये गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे घाटातील धबधबे मोठ्या प्रमाणात कोसळताना दिसत आहेत. धबधब्याच्या आकर्षणामुळे माथेरानमध्ये पर्यटक येत असल्याने नेरळ-माथेरान घाटात वाहतूक वाढली …

Read More »

पाली सबपोस्ट ऑफिसमध्ये पाच जागा रिक्त

अपूरे कर्मचारी व सुविधांच्या अभावाने नागरिकांची ग़ैरसोय पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली येथील सबपोस्ट ऑफिसमध्ये (उप डाकघर) कर्मचार्‍यांची वानवा आहे. येथे एक पोस्टमास्तर व चार क्लार्क या पाच जागा रिक्त आहेत. परिणामी उपलब्ध कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. तसेच लवकर काम न झाल्याने नागरिकांना एका कामासाठीसुद्धा …

Read More »