पोलादपूर : प्रतिनिधी राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या गुहागर आगाराची गुहागर ते बोरीवली एसटी बस बुधवारी (दि.15) सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर शहरातील कमानीजवळील रस्त्यालगतच्या चरात कलंडली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, पोलादपूर शहरातील ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ मंदिराच्या कमानीजवळ खणलेल्या चरांमुळे महामार्गाची साईडपट्टी अरूंद …
Read More »कुंडलिका नदी प्रदुषणाच्या विळख्यात
कोळी समाज संघाचा आंदोलनाचा पवित्रा, तहसिलदारांना दिले निवेदन रोहे ः प्रतिनिधी धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रसायनयुक्त सांडपाणी येत असल्याने कुंडलिका नदी प्रदुषित होत आहे. यामुळे नदीतील जलचर मृत्यूमुखी पडत असून, त्याची पैदास कमी होत आहे. मागच्या आठवड्यात कुंडलिका नदी पात्रातील मासे मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे या नदीत मासेमारी करणार्या मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा …
Read More »नागोठणेत नालेसफाईच्या कामास प्रारंभ
Exif_JPEG_420 नागोठणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेमुळे काही अंशी उशिरा चालू झालेल्या नागोठणेतील पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाला सोमवार (दि. 13) पासून प्रारंभ झाला असल्याची माहिती सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी दिली. नागोठणे शहरात ज्या ज्या ठिकाणी नाले आहेत, अशा सर्व नाल्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, संबंधित काम वेगाने …
Read More »कॉलिस आणि मोटारसायकलची ठोकर
मुरुड : मोटारसायकल आणि कॉलिस कारची भालगाव (ता. मुरुड) या गावाजवळ समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात मोटारसायकलस्वार आणि त्याचा सहप्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. भालगांव येथील सुरज घाडगे हे आपल्या मालकीच्या मोटारसायकल (एमएच-04, ईआर-9464)वरून कविता शेलार यांना घेऊन आगरदांडाकडे जात होते. त्याचवेळी नांदला …
Read More »घनकचरा प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर
पेण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांचा पत्रकार परिषदेत दावा पेण : प्रतिनिधी नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे कामकाज प्रगतीपथावर असून, ते नियमानुसार सुरू आहे. शासनाच्या आदेशानुसारच या कामाचा ठेका देण्यात आला असून, आजपर्यंत संबंधित ठेकेदाराला ठेक्याची रक्कम अदा करण्यात आलेली नाही, अशी माहिती पेण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे …
Read More »वारजेत टँकर उलटला
पुणे ः प्रतिनिधी पुण्यातील वारजे महामार्गावर पेट्रोल आणि डिझेल वाहून नेणारा टँकर उलटला असून या अपघातामुळे टँकरमधील तब्बल पाच हजाल लिटर पेट्रोल-डिझेल वाया गेले. टँकरमधील पेट्रोल आणि डिझेल रस्त्यावर वाहून गेले, अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वारजे येथील महामार्गावर मुंबईकडून कात्रजच्या दिशेने जाणारा टँकर …
Read More »बडोदा बँकेच्या दोन व्यवस्थापकांना समन्स
नागपूर ः प्रतिनिधी कर्मचार्याच्या निवृत्ती वेतनातून अवैध कपात करण्यासंदर्भातील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बडोदा बँकेच्या नवी दिल्ली येथील संसद मार्ग शाखेचे मुख्य व्यवस्थापक व नागपुरातील महाल शाखेचे व्यवस्थापक यांना समन्स बजावला आहे. निवृत्ती वेतन खात्यातून एप्रिल-2016पासून दर महिन्याला 5,336 रुपये कपात करण्यात आल्यामुळे बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी विष्णू बुराडे …
Read More »नाशिक येथे रोईंगपटूवर चोरट्यांचा प्राणघातक हल्ला
नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणे याच्यावर चोरट्यांनी काल रात्री प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या निखिलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे निखिलला दोन दिवसांवर आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेला मुकावे लागणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील रोईंगपटू निखिल मंगळवारी रात्री सराव करून चोपडा लॉन्स येथून जात होता. त्याचवेळी तेथील पेट्रोलपंपासमोर …
Read More »ठाण्यात कार खड्ड्यात उलटून एकाचा मृत्यू
कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, अग्निशमन दलाच्या जवानांची मदत ठाणे ः प्रतिनिधी ठाण्यात घोडबंदर रोड येथे ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात कार उलटून झालेल्या दुर्दैवी अपघातात एक प्रवासी ठार झाला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. काल पहाटे सव्वासहा वाजता घोडबंदर …
Read More »प. बंगालमध्ये निवडणूक आयोगाची दुटप्पी भूमिका
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था निवडणुकांदरम्यान गोंधळ घालणार्या लोकांवर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून देशभरात 107 कलमाचा वापर केला जातो, मात्र पश्चिम बंगालमध्ये असे होताना दिसत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग देशात एक आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळी अशी दुटप्पी भूमिका कसे घेऊ शकते, असा सवाल करताना यामुळे आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper