Breaking News

Ramprahar Team

वारजेत टँकर उलटला

पुणे ः प्रतिनिधी पुण्यातील वारजे महामार्गावर पेट्रोल आणि डिझेल वाहून नेणारा टँकर उलटला असून या अपघातामुळे टँकरमधील तब्बल पाच हजाल लिटर पेट्रोल-डिझेल वाया गेले. टँकरमधील पेट्रोल आणि डिझेल रस्त्यावर वाहून गेले, अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वारजे येथील महामार्गावर मुंबईकडून कात्रजच्या दिशेने जाणारा टँकर …

Read More »

बडोदा बँकेच्या दोन व्यवस्थापकांना समन्स

नागपूर ः प्रतिनिधी कर्मचार्‍याच्या निवृत्ती वेतनातून अवैध कपात करण्यासंदर्भातील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बडोदा बँकेच्या नवी दिल्ली येथील संसद मार्ग शाखेचे मुख्य व्यवस्थापक व नागपुरातील महाल शाखेचे व्यवस्थापक यांना समन्स बजावला आहे. निवृत्ती वेतन खात्यातून एप्रिल-2016पासून दर महिन्याला 5,336 रुपये कपात करण्यात आल्यामुळे बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी विष्णू बुराडे …

Read More »

नाशिक येथे रोईंगपटूवर चोरट्यांचा प्राणघातक हल्ला

नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणे याच्यावर चोरट्यांनी काल रात्री प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या निखिलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे निखिलला दोन दिवसांवर आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेला मुकावे लागणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील रोईंगपटू निखिल मंगळवारी रात्री सराव करून चोपडा लॉन्स येथून जात होता. त्याचवेळी तेथील पेट्रोलपंपासमोर …

Read More »

ठाण्यात कार खड्ड्यात उलटून एकाचा मृत्यू

कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, अग्निशमन दलाच्या जवानांची मदत ठाणे ः प्रतिनिधी ठाण्यात घोडबंदर रोड येथे ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात कार उलटून झालेल्या दुर्दैवी अपघातात एक प्रवासी ठार झाला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. काल पहाटे सव्वासहा वाजता घोडबंदर …

Read More »

प. बंगालमध्ये निवडणूक आयोगाची दुटप्पी भूमिका

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था निवडणुकांदरम्यान गोंधळ घालणार्‍या लोकांवर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून देशभरात 107 कलमाचा वापर केला जातो, मात्र पश्चिम बंगालमध्ये असे होताना दिसत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग देशात एक आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळी अशी दुटप्पी भूमिका कसे घेऊ शकते, असा सवाल करताना यामुळे आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, …

Read More »

कांचनजुंगा मोहीम फत्ते

‘गिरीप्रेमी’ने रचला इतिहास पुणे ः प्रतिनिधी पुण्यातील 10 गिर्यारोहकांनी जगातील तिसरे आणि भारतातील सर्वात उंच कांचनजुंगा शिखर सर करीत तिरंगा फडकावला आहे. गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील 10 जणांच्या संघाने काल सकाळी दहाच्या सुमारास ही अभिमानास्पद कामगिरी केली. आठ हजार 586 मीटर उंच असलेले माऊंट कांचनजुंगा उंचीनुसार जगातील तिसरे, …

Read More »

‘पेटीएम’मध्ये कॅशबॅकच्या नावाखाली 10 कोटींचा घोटाळा

फसवणूक करणार्‍या कर्मचार्‍यांचे निलंबन नवी दिल्ली ः वृत्तसंस्था नोटाबंदीनंतर पेटीएम ही कंपनी चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पेटीएम कंपनी चर्चेत आली आहे. कॅशबॅकच्या माध्यमातून पेटीएमममध्ये 10 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. खुद्द कंपनीचे प्रमुख विजय शेखर शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. पेटीएममध्ये हा फसवणुकीचा …

Read More »

‘उमेद’तर्फे खाद्यपदार्थ, वस्तूंचे प्रदर्शन

नवी मुंबई : प्रतिनिधी पनवेल-खारघर मधील ग्रामविकास भवन येथे महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांचे व विविध उत्पादनांचे, तसेच लोकपयोगी वस्तूंचे  प्रदर्शन सुरू आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण महिलांनी बनवलेली दर्जेदार उत्पादने ठेवण्यात आली आहेत. 10 मे पासून बीड जिल्ह्यातील महिला बचत गट येथे आपले खाद्यपदार्थ व वस्तू येथे विक्रीसाठी आल्या आहेत. …

Read More »

नेरूळ येथे सहा वाहनांची धडक

नवी मुंबई : प्रतिनिधी सायन-पनवेल महामार्गावरील नेरूळ उड्डाणपुलावर सहा वाहनांची रविवारी (दि. 12) दुपारी एकमेकांना धडक बसली. सर्वात पुढे असलेल्या कार चालकाच्या चुकीने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. यात कोणीही गंभीर झालेले नसले तरी वाहनांचे नुकसान झाले आहे. रविवारी दुपारच्या सुमारास नेरूळ उड्डाणपुलावर मुंबईच्या दिशेने सुसाट जात असलेल्या कारचालकाने …

Read More »

आपटा आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय

पनवेल : वार्ताहर रसायनीजवळच्या आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळनंतर डॉक्टर हजर राहत नसल्याने  गोरगरीब रुग्णांना नाहक त्रास होऊन रुग्णांची हेळसांड होत आहे. आपटा प्राथमिक आरोग्य केंद्र हे पनवेल-गोवा, तसेच दांड पेण रस्त्याजवळ असल्याने किरकोळ अपघातातील रुग्णांसाठी सोईस्कर आहे. रायगड जिल्हा परिषदेचे आपटा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आपटा ग्रामपंचायत हद्दीत अनेक …

Read More »