Breaking News

Ramprahar Team

रायगडच्या मतदारांवर ठरणार मावळचा खासदार

अलिबाग : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. रायगड जिल्ह्यातील 11 लाख 9 हजार 250 मतदार या मतदारसंघात आहेत. हेच मतदार मावळचा खासदार ठरवणार आहेत. या मतदारसंघात  21 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी शिवसेनेच्या श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थपवार यांच्यात प्रमुख लढत होणार  आहे.  पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, …

Read More »

पुणे तिथे सर्वच उणे

जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून भारतीय मतदान प्रक्रियेकडे लोकतंत्र मानणारे देश पाहतात. अभ्यासही केला जातो. हिंदुस्थानच्या पंतप्रधान निवडीसाठी अद्यापपर्यंत तीन टप्प्यांत मतदान घेण्यात आले. चौथा टप्पा येत्या 29 एप्रिल रोजी पार पडणार आहे. देशात 117 ठिकाणी झालेल्या मतदानात 64 टक्के, तर राज्यात 14 ठिकाणी झालेल्या मतदानात 61.30 टक्के मतदान झाले. …

Read More »

शरद पवार, विजयसिंह मोहिते-पाटील आणि अर्धी चड्डी!

एखादं जवळचं माणूस आपल्यापासून दूर गेलं की मनाला खूप वेदना होतात. प्रेम, युद्ध आणि राजकारणात सारं काही माफ असलं तरी जवळच्या व्यक्तीचा वियोग हा वेदनादायक असतो. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि अनेकांना बाळासाहेबांनी मोठे केले. त्यापैकी राज ठाकरे, छगन भुजबळ …

Read More »

तुर्भे बुद्रुक येथील घराला आग

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील तुर्भे बुद्रुक येथील साळवी बौद्धवाडीतील एका घराला गुरुवारी रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचे पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आल्यानंतर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, तोपर्यंत घरातील चीजवस्तू व कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती पोलादपूर पोलिसांनी दिली. तुर्भे बुद्रुक साळवी बौद्धवाडी येथे विलास सुधाकर साळवी यांचे …

Read More »

पांडापूरजवळ एसटीची टेम्पोला ठोकर बसून महिला ठार

पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील पांडापूर गावाजवळ गुरूवारी (दि. 25) एसटी व टेम्पोची समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. पेण कोळीवाडा येथील महेश पाटील हे टेम्पोतून (एमएच-06, एजी-4445) डीजेचे सामान घेऊन मुंबई-गोवा मार्गावरून महाडच्या दिशेने निघाले होते. पांडापूर …

Read More »

रोहा तालुक्यात पाणीटंचाई

टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी रोहे ः प्रतिनिधी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला सुरूवात झाल्यानंतर  रोहा तालुक्यात काही गावात पाणीटंचाई भासू लागली आहे.  शहराजवळच असलेल्या धामणसई विभागातील मढाली खुर्द, वांदोली, वांदोली आदीवासीवाडी या गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून तेथील महिलांना दोन कि.मी. अंतरावरून पाणी डोक्यावर आणावे लागत आहे. या तिन्ही गावांना टँकरने …

Read More »

सोलनपाडा पाझर तलावाने गाठला तळ

परिसरातील आठ नळपाणी योजना बंद, चिल्लार नदी कोरडी कर्जत : बातमीदार तालुक्यातील सोलनपाडा येथे असलेल्या पाझर तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे या पाझर तलावामधून खालच्या बाजूला असलेल्या नदीमध्ये पाणी सोडण्याचे बंद झाल्याने चिल्लार नदी कोरडी झाली असून, त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नळपाणी योजना कोलमडून पडल्या आहेत. कर्जत तालुक्यातील सोलनपाडा येथे …

Read More »

अपघातानंतर खालापुरातील रस्ता दुभाजक पूर्ववत

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खालापूर हद्दीत हॉटेल व ढाबा चालकांनी रस्ता दुभाजक तोडल्यामुळे अपघाताची घटना घडली  असून, अपघातानंतर मात्र कंत्राटदाराने तातडीने  दुभाजक दुरूस्ती केली आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर ते खोपोली रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. खालापूर ते महडपर्यंत दोन्ही मार्गिका तयार झाल्या असून रस्त्याच्या मधोमध दुभाजक तयार करण्यात …

Read More »

मुरूडमध्ये पर्यटनाचा हंगाम फुलला

सध्या मुरूड तालुक्यात पर्यटनाचा हंगाम फुलला असून विविध पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. वार्षिक परीक्षा संपल्यामुळे पर्यटक आपल्या मुलांसह मुरूड समुद्रकिनारी येण्यास अधिक पसंती देत आहेत. विशेष करून शनिवार व रविवारची सुटी साधून पर्यटक मोठ्या संख्येने मुरूड व काशीद समुद्र किनारी येत आहेत. कोकणाला 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला …

Read More »

रालोआचे शक्तिप्रदर्शन

देशाच्या भवितव्यासाठी होणार्‍या लोकशाहीच्या उत्सवातील  पाचव्या टप्प्याचे वेध आता देशवासीयांना लागले आहेत. या उत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही सज्ज झाले असून, शुक्रवारी त्यांनी वाराणसीमधून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी झालेले शक्तिप्रदर्शन निश्चितच विरोधकांना धडकी भरून टाकणारे ठरले आहे. लोकसभेच्या महासंग्रामास आता खर्‍या अर्थाने रंगत येऊ लागली आहे. …

Read More »