Breaking News

Ramprahar Reporters

रोह्यातील कोलाड रेल्वे फाटकावर गोळीबार; गेटमन जागीच ठार

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील कोलाड येथील तिसे रेल्वेफाटकावर सोमवारी (दि. 21) दुपारी गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली. गेटमन म्हणून कामावर असलेले स्थानिक चंद्रकांत कांबळे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. यामध्ये कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कोलाड येथील तिसे रेल्वेफाटकावर गेटमन म्हणून कामावर असलेले पाले बुद्रुक येथील चंद्रकांत कांबळे …

Read More »

१ ऑक्टोबरला मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर

प्रत्येक शिबिरार्थीला सेवा देण्यासाठी कटिबद्ध -अरुणशेठ भगत पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक बांधिलकी म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५व्या मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिराचे आयोजन १ ऑक्टोबरला करण्यात आले असून प्रत्येक शिबिरार्थीला सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही …

Read More »

इन्फिनिटी अकॅडमीच्या यशस्वी प्रशिक्षणार्थींचा गौरव

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणार्‍या इन्फिनिटी अ‍ॅक्टींग आणि मीडिया अकॅडमीच्या वतीने तीन महिन्यांचे शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात यशस्वी झालेल्या प्रशिक्षणार्थींचा गुणगौरव सोहळा तसेच एकपात्री, द्विपात्री व नाटीका सादरीकरण पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत …

Read More »

माणगाव कार्यालयातील तोडफोडप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्षासह पाच जणांना अटक

जामिनावर सुटका माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणार्‍या माणगाव येथील चेतक इंटरप्राइझेसच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षासह पाच कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. सनी कन्स्ट्रक्शन कंपनी अंतर्गत चेतक इंटरप्रायझेसकडून मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावमधील इंदापूर ते लाखपाले बायपासचे काम सुरू …

Read More »

पोलीस असल्याचे सांगून तरुणीवर लैंगिक अत्याचार; पेणमधील घटना

पेण : प्रतिनिधी पोलीस असल्याचे सांगून पेणमध्ये एका नराधमाने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 17 वर्षीय तरुणी ही सहकार्‍यासोबत ट्री हाऊसकडून पेणकडे येत असताना रिक्षाचालक प्रशांत पाटील याने मी पोलीस आहे असे धमकावून तरुणी व …

Read More »

रोह्यात लॉजवर चालत असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड

मॅनेजरला अटक, तीन महिलांची सुटका रोहे, धाटाव : प्रतिनिधी रोहा पोलिसांनी वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या दमखाडी येथील श्रीराम लॉजवर शुक्रवारी रात्री उशिरा धाड टाकली. या प्रकरणी लॉज चालविणार्‍या मॅनेजरला अटक, तर तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. रोह्यात सुरू असलेल्या अवैध, अनैतिक धंद्यांविरोधात गेले काही दिवस नागरिकांतून ओरड सुरू आहे. …

Read More »

भाताण येथील अमेटी युनिव्हर्सिटीच्या मनमानी कारभाराच्या चौकशीचे आदेश

आमदार महेश बालदी यांच्या मागणीला मंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्त स्थानिक कामगारांना पगारवाढ आणि भत्ते न देणार्‍या पनवेल तालुक्यातील भाताण येथील अमेटी युनिव्हर्सिटीच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी मंत्रीमहोदयांना अवगत केले असता …

Read More »

पनवेलकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे ठरणार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : वार्ताहर पनवेलमधील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गर्दीच्या व महत्त्वाच्या ठिकाणी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने 44 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 12) भेट देऊन त्यांनी सीसीटीव्ही कंट्रोल रूमची …

Read More »

पनवेलमध्ये माझी माती माझा देश अभियान; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिलाफलकाचे अनावरण

पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या देशातील स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती आपल्या मनात जागत राहिल्या पाहिजेत, ज्या मातीतून आपण जन्माला आलो ती माती आपल्याला वंदनीय असली पाहिजे यासाठी माझी माती माझा देश हे अभियान राबविण्यात येत आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान महापालिका करतेय यातून देशापुढे, तरुण पिढीच्या पुढे बालपिढीसमोर मोठा संदेश दिला जातोय, असे …

Read More »

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये इन्व्हेस्टीचर समारंभ उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षणामुळे आपला देश प्रगती करीत असून या शिक्षणामध्ये उच्च दर्जा प्राप्त करून देण्याकरिता सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल योगदान देईल, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 11) इन्व्हेस्टीचर समारंभात केले. नेतृत्व, एकता, शिस्त, नैतिकता, निष्पक्षता आणि …

Read More »