प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरच्या गाण्यांची मैफिल पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे शनिवारी (दि. 11) पहाटे 5.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. …
Read More »राज्यातील सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन
प्रथम क्रमांकास एक लाख रुपये तर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास 40 हजारांचे बक्षीस पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षिणक, सामाजिक, कला. क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर …
Read More »माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आरपीएल ट्रॉफीचे अनावरण
पनवेल : रामप्रहर वृत्त ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल)च्या सौजन्याने आयोजित करण्यात येणार्या आरपीएल अर्थात रोटरी प्रीमियर लीगच्या ट्रॉफीचे अनावरण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 5) करण्यात आले. आरपीएलचे यंदाचे तिसरे पर्व आहे. ही स्पर्धा 1, 2, 3, 7, 8, 9 डिसेंबर रोजी पनवेल …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे यश ; विचुंबेत शेकापचा दारुण पराभव; न्हावे ग्रामपंचायतही युतीकडे
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने विरोधकांना धूळ चारली आहे. शेकापसह महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत भाजप महायुतीने बाजी मारली. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगडात शांततेत मतदान; सोमवारी मतमोजणी
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 5) 177 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाले. सदस्यपदाच्या 3395 व सरपंचपदाच्या 485 अशा एकूण 3880 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. मतमोजणी सोमवारी (दि. 6) होणार आहे. रायगडात 210 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी 33 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली, …
Read More »आर्थिक फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ करणार्या शेकापच्या पुरुषोत्तम भोईरवर गुन्हा दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्त विचुंबे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील सरपंचपदाचा उमेदवार असलेल्या पुरुषोत्तम भोईर याने जमिनीच्या व्यवहारांमध्ये आर्थिक फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे त्याच्यावर शुक्रवारी रात्री खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणूकप्रकरणी कलम 420 आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही पुरुषोत्तम …
Read More »पनवेलमध्ये अमृत टप्पा 2.0 योजनेंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन
विकासासाठी भाजप कटिबद्ध -परेश ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 3) विकासकामांच्या शुभारंभावेळी केले. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक …
Read More »महाड एमआयडीसीतील कंपनीत स्फोट; पाच कामगार जखमी
स्फोटामुळे कंपनीचे नुकसान महाड : प्रतिनिधी महाड एमआयडीसीमधील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात असलेल्या ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीत शुक्रवारी (दि.3) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये पाच कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना एमएमएसीइटीपी. हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत न्हावे ग्रामपंचायतीत प्रचार रॅली
मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात होणार्या ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्यात असून भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत न्हावे ग्रामपंचायत येथे उत्कर्ष ग्रामविकास मंडळाच्या उमेदवारांचा बुधवारी (दि. 2) प्रचार करण्यात आला. या प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. न्हावे ग्रामपंचायत निवडणुकीत उत्कर्ष …
Read More »प्रत्येक निवडणुकीत भूमिका बदलणार्या जयंत पाटलांनी पक्षनिष्ठा शिकवू नये -खा. सुनील तटकरे
अलिबाग : प्रतिनिधी नेतृत्व बदल झाला असला तरी मी कालही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो आणि आजही आहे. प्रत्येक निवडणुकीत आपली भूमिका बदलणार्यांनी मला पक्षनिष्ठा शिकवू नये, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांना लगावला आहे. खासदार सुनील तटकरे गुरुवारी (दि. 2) अलिबाग दौर्यावर आले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper