लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शाळेच्या नवीन इमारतीसाठी 50 लाखांची मदत जाहीर उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136वी जयंती आणि नूतनीकरण …
Read More »शूटिंगबॉल स्पर्धेत सीकेटी स्कूलचे यश
पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग व पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने खारघर येथील विश्वज्योत हायस्कूल या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. …
Read More »शूटिंगबॉल स्पर्धेत रामशेठ ठाकूर स्कूलचे यश
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाने पनवेल महापालिका जिल्हास्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत विद्यालयाच्या अकरावी आणि बारावी विज्ञान, वाणिज्य शाखेच्या मुलांनी 19 वर्षाखालील गटात सहभाग घेतला होता. कार्तिकगोपन, राजदीप धामी, अभय सिंग, रिहानगुडेकर, आनंदपराते, आर्यनभातुसे, हमजामुल्ला, दिग्विजय …
Read More »मॉडर्न स्कूलची आर्या सुर्वे थाय बॉक्सिंगमध्ये चॅम्पियन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्र्धेेमध्ये वाशी येथील मॉडर्न स्कूलची विद्यार्थिनी आर्या सुर्वे हिने सुवर्णपदक जिंकून यंदाची राष्ट्रीय थायबॉक्सिंग चॅम्पियनशिप मिळविली. या यशाबद्दल सर्व स्तरातून आर्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या या राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत देशातील सुमारे 26 राज्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये वाशी …
Read More »जिल्हास्तरीय शालेय वुशु स्पर्धेत ‘सीकेटी’चे खेळाडूही चमकले
पनवेल : राज्य क्रीडा व युवक संचालनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा कार्यालय आणि पनवेल महापालिका आयोजित जिल्हास्तरीय शालेय वुशु स्पर्धा खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालय या ठिकाणी झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. स्पर्धेत …
Read More »वुशु स्पर्धेत रामशेठ ठाकूर विद्यालयाचे वर्चस्व; 11 सुवर्णांसह एकूण 32 पदकांची कमाई
खारघर : रामप्रहर वृत्त राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग व पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने नुकतेच शालेय जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेचे आयोजन खारघरमधील रामशेठ ठाकूर महाविद्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर ओवेपेठ येथील रामशेठ ठाकूर माध्यमिक व उच्च …
Read More »रोह्यातील जादूटोणा प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक
आतापर्यंत एकूण नऊ आरोपी गजाआड रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील धामणसई येथील जादूटोणा प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी मागोवा घेत बुलढाणा येथून अटक केली आहे. गेल्या दीड महिन्यापासून हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता, मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला अटक केली. धामणसई येथील एका खासगी शाळेत 12 ऑगस्ट रोजी जादूटोणा करण्यासाठी प्रयत्न सुरू …
Read More »पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त जागांवर निवड केलेल्या उमेदवारांसाठी भारतीय डाक विभागाच्या पोस्ट मास्तर जनरल नवी मुंबई क्षेत्रातर्फे मंगळवारी (दि. 26) पनवेल येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या मेळाव्यात केंद्रीय …
Read More »जनता सुज्ञ असल्याने विरोधकांनी श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये!
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सल्ला पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली शहराच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी व त्या संदर्भातील पाठपुरावा कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केला होता. त्या अनुषंगाने कळंबोलीतील विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. याचे सर्व …
Read More »उरण जासई येथे 76 लाखांचे मद्य जप्त, तिघांना अटक
उरण : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उरण पथकाने दिव-दिमण येथून आलेले मद्याचे तीन ट्रेलर कंटनेर पकडले आहेत. यामध्ये 76 लाख रुपये किमतीचे दारूचे बॉक्स आढळले असून या प्रकरणी तीन जणांना अटक करून वाहने जप्त करण्यात आली आहेत. उरण तालुक्यातील जेएनपीए परिसरात दिव-दिमण येथून परदेशी दारू येणार असल्याची खबर राज्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper