Breaking News

Ramprahar Reporters

जनता सुज्ञ असल्याने विरोधकांनी श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये!

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सल्ला पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली शहराच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी व त्या संदर्भातील पाठपुरावा कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केला होता. त्या अनुषंगाने कळंबोलीतील विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. याचे सर्व …

Read More »

उरण जासई येथे 76 लाखांचे मद्य जप्त, तिघांना अटक

उरण : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उरण पथकाने दिव-दिमण येथून आलेले मद्याचे तीन ट्रेलर कंटनेर पकडले आहेत. यामध्ये 76 लाख रुपये किमतीचे दारूचे बॉक्स आढळले असून या प्रकरणी तीन जणांना अटक करून वाहने जप्त करण्यात आली आहेत. उरण तालुक्यातील जेएनपीए परिसरात दिव-दिमण येथून परदेशी दारू येणार असल्याची खबर राज्य …

Read More »

विद्यार्थ्यांनी यशाची उत्तुंग भरारी घ्यावी -लोकनेते रामशेठ ठाकूर

गव्हाण विद्यालयात कर्मवीर जयंती साजरी पनवेल : रामप्रहर वृत्त साधी राहणी व उच्च विचारसरणी हे तत्व अंगी बाणून विद्यार्थ्यांनी यशाची उत्तुंग भरारी घ्यावी, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 25) गव्हाण येथे केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण …

Read More »

माथाडी कामगार कायद्यात कोणतीही छेडछाड केली जाणार नाही -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई :  रामप्रहर वृत्त माथाडी समाजातील बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हे शासन वचनबद्ध आहे. माथाडी कामगारांचे नेते स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात आलेल्या माथाडी कायद्यात कोणत्याही परिस्थितीत छेडछाड केली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 25) येथे दिली. माथाडी कामगार युनियनच्या वतीने स्व. आमदार …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते एक हजार पुस्तकांचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या शिक्षणाचा आणि बुद्धिमत्तेचा उपयोग समाजासह देशाच्या उद्धारासाठी करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कळंबोली शहरात अभ्यासिका भवन सुरू झाले आहे. या अभ्यासिकेतून बहुजन समाजातील मुले मोठ्या हुद्द्यावर आणि उच्चपदस्थ अधिकारी व्हावी या दृष्टिकोनातून पनवेल तालुका भिमशक्ती संघटनेच्या वतीने एक हजार स्पर्धा पुस्तके उपलब्ध करून …

Read More »

श्रीरामपूरमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

अहमदनगर : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील स्व. सौ. साकरबेन करमशीभाई सोमैय्या प्राथमिक विद्यामंदिर व संस्कार केंद्रात साने गुरुजी मुक्तद्वार वाचनालय आणि अवकाश विज्ञान प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. त्यांचे उद्घाटन आणि बहुउद्देशीय सभागृहावरील दुसर्‍या मजल्याचे भूमिपूजन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते, …

Read More »

राजिपतर्फे पर्यावरणपूरक निर्मल गणेशोत्सव स्पर्धा

अलिबाग –  प्रतिनिधी गणेशोत्सव पर्यावरणस्नेही व आरोग्यदायी साजरा व्हावा या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागामार्फत ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण व्हावे, नागरिकांना मंगलमय वातावरणात सण साजरा करता यावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील …

Read More »

विमानतळ कृती समितीतर्फे गणेश आरास स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीतर्फे भव्य गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय व तालुकास्तरीय असलेली ही स्पर्धा सार्वजनिक व घरगुती अशी दोन विभागांत होणार आहे. प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे समाजासाठी योगदान, त्यांच्या नावासाठी विमानतळ नामकरणाचा लढा, …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर सुविधा केंद्राचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

अलिबाग : प्रतिनिधी कोकणात जाणारे गणेशभक्त तसेच चाकरमान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावर विविध ठिकाणी सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. यापैकी खारपाडा येथील सुविधा केंद्राचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 12) झाले. या सुविधा केंद्रांवर प्रथमोपचार केंद्र, शौचालय व्यवस्था तसेच चहाचा स्टॉल या सुविधा …

Read More »

उरण आवरे येथील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील आवरे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पनवेल येथे रविवारी (दि. 10) झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, उपाध्यक्ष मुकुंद गावंड, सुनील पाटील, आवरे गाव पक्षाध्यक्ष बाळा गावंड, …

Read More »