Breaking News

Ramprahar Reporters

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रांतील लोकप्रिय नेतृत्व असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसनिमित्त विविध सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आले होते. त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतील मान्यवरांनी तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, हितचिंतकांनी कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांना शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन केले. …

Read More »

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका पूर्ण होणार अलिबाग : प्रतिनिधी कोकणाच्या भविष्याची दिशा ठरविणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 5) मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे ते पनवेलपर्यंत रस्त्याची अधिकार्‍यांसह पाहणी करून आढावा घेतला. या वेळी मंत्री चव्हाण …

Read More »

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या

कर्जत : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ते ५८ वर्षांचे होते. प्राथमिक माहितीनुसार देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत ते दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलीस …

Read More »

जलजीवन मिशनसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी वेधले विधिमंडळात लक्ष

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांचा लाभ सर्व घटकांना मिळण्यासाठी आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या विषयावर शासनाचे लक्ष केंद्रित केले. राज्यात विशेषत: रायगड जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या जलजीवन मिशन …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्रातील 1000 मुलींना मिळणार सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ

आमदार प्रशांत ठाकूर स्वखर्चाने खाते उघडणार पनवेल : रामप्रहर वृत्त कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 2023मध्ये जन्मलेल्या एक हजार मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ देण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे ते स्वखर्चाने एक हजार रुपये भरून या बालिकांचे नवीन खाते उघडणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …

Read More »

एनडीआरएफचा बेस कॅम्प रायगड जिल्ह्यातच होणार

मुंबई : प्रतिनिधी नैसर्गिक आपत्तीत असणार्‍या प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहिल. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह सह्याद्रीच्या डोंगर परिसरात सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत आहेत. याचा विचार करून रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असणारा एनडीआरएफचा बेस कॅम्प याच जिल्ह्यातच होईल यासाठी राज्य सरकार लक्ष घालेल. त्याकरिता आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती …

Read More »

संयमी, संतुलित नेतृत्व..!

अनेक कारणांमुळे देवेंद्र आणि माझ्यात एक कौटुंबिक नाते तयार झाले आहे. देवेंद्रच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्याकडे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतो. दिलेली जबाबदारी कर्तव्य भावनेतून पार पाडण्याचा त्याचा स्वभाव आहे. जितका आज्ञाधारक, तितकाच न दुखावता स्पष्ट बोलणारा, आपलं म्हणणं ठोसपणे मांडणारा असा देवेंद्र आहे. संयमी, आज्ञाधारक, तितकाच …

Read More »

पनवेलमधील पूरबाधित गावांमध्ये आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील डोलघर, आपटा, दिघाटी, केळवणे व चिरनेर येथे मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीला पूर आल्याने पाणी शिरले होते, तसेच डोलघर गावाच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या ठिकाणी भूस्खलन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पनवेलचे आमदार तथा भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार …

Read More »

कर्नाळा बँकेचा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी पुन्हा मांडला विधिमंडळात

उर्वरित ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्याची कार्यवाही सुरू पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँक 17 ऑगस्ट 2021 रोजी अवसायनात घेतली आहे. अवसायन दिनांकास 51,624 ठेवीदारांच्या 553.32 कोटी रकमेच्या ठेवी आहेत. बँकेचा परवाना रद्द झाल्यानंतर 38 हजार 639 ठेवीदारांना केंद्र सरकारच्या डीआयसीजीसी माध्यमातून आजपर्यंत 377.71 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. …

Read More »

भाजपच्या उत्तर रायगड अध्यक्षपदी अविनाश कोळी, तर धैर्यशील पाटील दक्षिण जिल्हाध्यक्ष

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील 70 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा बुधवारी (दि. 19) प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. यामध्ये उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पनवेलचे अविनाश कोळी, तर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा समावेश आहे. अविनाश कोळी …

Read More »