Breaking News

Ramprahar Reporters

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही तर आत्मजागरण यात्रा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही तर आत्मजागरण यात्रा असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 9) पनवेलमध्ये या यात्रेच्या समारोपावेळी स्वांतत्र्यवीर सावरकर चौकात केले. पनवेलमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. चौकाचौकात पुष्पवृष्टी करण्यासाठी महिला आवर्जून उपस्थित होत्या. पनवेल परिसरात आमदार …

Read More »

पनवेल विभागात रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप-शिवसेना युतीतर्फे रविवारी (दि. 9) पनवेल विभागात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेची जोरदार तयारी केली गेली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी भाजप-शिवसेनेतर्फे राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आल्या. पनवेल परिसरात ही यात्रा गौरवरथाचा सहभाग घेऊन रविवारी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व ‘रयत’च्या कायम पाठीशी -खासदार शरद पवार

मोखाडा येथे नूतन इमारतीचे उद्घाटन व नामकरण; मान्यवरांची उपस्थिती मोखाडा : रामप्रहर वृत्त राजकारण बाजूला सारून सामाजिक हितासाठी सतत कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व ‘रयत’च्या पाठीशी कायम आहे, असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरद पवार यांनी आज मोखाडा येथे काढले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, …

Read More »

माणगावजळ अपघातात तिघांचा मृत्यू

माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर माणगावच्या इंदापूरजवळ शुक्रवारी (दि. 7) सकाळी 6.30च्या सुमारास मारुती इस्टीलो कार आणि आयशर टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात मुंबईच्या बोरीवली येथील तावडे कुटुंबातील आजीसह दोन नातवांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो (जीए 03 के 5990) म्हापसे (गोवा) …

Read More »

भाजप स्थापना दिनी कर्तृत्ववान ज्येष्ठांचा सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांनी देश प्रगती करतोय -आमदार प्रशांत ठाकूर महाड : प्रतिनिधी आज आपला भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळे प्रगती करीत आहे तसेच भारतीय जनता पक्षाला जगात एक स्थान निर्माण झाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाड येथे केले. भाजप स्थापना दिनानिमित्त …

Read More »

मोखाड्यात शनिवारी लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालय नूतन इमारत उदघाटन व नामकरण समारंभ

‘रयत’चे अध्यक्ष खासदार शरद पवार, मंत्री रवींद्र चव्हाण, चेअरमन डॉ. अनिल पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील आदी मान्यवरांची लाभणार उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे, दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त …

Read More »

पनवेल मनपा मालमत्ता कराविरोधातील खारघर सोसायटीज फेडरेशनची याचिका हायकोर्टाने फेटाळली

पनवेल : प्रतिनिधी खारघर कोपरेटिव्ह हौसिंग सोसायटीज फेडरेशन लि.च्या वतीने पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कराविरोधात दाखल केलेली रिट पिटीशन गुरुवारी (दि. 6) उच्च न्यायालयात न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठाने फेटाळली. ही याचिका कायद्यात किंवा तथ्यावर टिकू शकत नसल्याचे सांगत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना चपराक लगावली आहे. पनवेल …

Read More »

बामणडोंगरीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून खेळाडूंचा सन्मान; मंदिरासाठी पाच लाखांची देणगी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात हनुमान जन्मोत्सव गुरुवारी (दि. 6) मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त बामणडोंगरी येथील हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत हनुमानाचे मनोभावे दर्शन घेतले. …

Read More »

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि त्यानंतर स्वतः अशी देशहिताची विचारसरणी असलेल्या आणि त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन गुरुवारी (दि. 6) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पनवेल भाजपच्या वतीने शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात तालुकाध्यक्ष अरुणशेठ …

Read More »

शिवपुण्यतिथीनिमित्त हजारो शिवभक्तांचे किल्ले रायगडावर अभिवादन

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि परिसरातील प्रकल्पांसाठी शासन प्रयत्नशील -ना. मंगलप्रभात लोढा महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 343व्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर गुरुवारी (दि. 6) हजारो शिवभक्तांनी अभिवादन केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, …

Read More »