पनवेल : रामप्रहर वृत्त प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि त्यानंतर स्वतः अशी देशहिताची विचारसरणी असलेल्या आणि त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन गुरुवारी (दि. 6) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पनवेल भाजपच्या वतीने शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात तालुकाध्यक्ष अरुणशेठ …
Read More »शिवपुण्यतिथीनिमित्त हजारो शिवभक्तांचे किल्ले रायगडावर अभिवादन
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि परिसरातील प्रकल्पांसाठी शासन प्रयत्नशील -ना. मंगलप्रभात लोढा महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 343व्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर गुरुवारी (दि. 6) हजारो शिवभक्तांनी अभिवादन केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, …
Read More »लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा संकल्प करा
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन मुंबई : प्रतिनिधी पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती मिळून सर्वच्या सर्व 48 जागा जिंकण्याचा आणि विधानसभा निवडणुकीत 200पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा संकल्प करा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (दि. 6) केले. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना …
Read More »म्हसळ्यात कॅपिझ शेलचा अवैध साठा जप्त; पाच जण ताब्यात
अलिबाग : प्रतिनिधी वन विभागाच्या पथकाने म्हसळा तालुक्यातील देवघर येथे सुरू असलेल्या कॅपिझ शेल या सागरी वन्यजीवाच्या अवशेषांचा अवैध व्यापारावर मंगळवारी (दि. 4) धाड टाकली. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रोहा उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून देवघर येथील सर्व्हे क्रमांक 1/3 या ठिकाणी कॅपिझ शेलच्या …
Read More »राज्यात नवे रेती धोरण
अनधिकृत उत्खननाला आळा बसून स्वस्त दराने रेती मिळणार मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले असून बुधवारी (दि. 5) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. या धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व …
Read More »सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती!
राज्य सरकारचा शेतकर्यांना दिलासा मुंबई : प्रतिनिधी शिंदे-फडणवीस सरकारने शेतकर्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करून शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय बुधवारी (दि. 5) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकर्यांना मदत देण्यात येईल. अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली …
Read More »स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या अस्मितेचे प्रतीक
आमदार प्रशांत ठाकूर यांचे कर्जतमध्ये प्रतिपादन कर्जत : प्रतिनिधी सावरकर हे तुमच्या-आमच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेऊन बलिदान दिले, पण हल्लीच्या नवीन पिढीला बलिदान दिलेले हुतात्मे माहित नाहीत. त्यांच्यामुळेच आपण आत्ता आहोत, हे विसरता कामा नये. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी आपल्या आजीने सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढले, …
Read More »विनयभंगप्रकरणी पोलीस शिपाई संजय जाधवविरोधात गुन्हा दाखल
महाड : प्रतिनिधी महाड शहराच्या हद्दीत स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई संजय यशवंत जाधव याच्याविरोधात महाड पोलिसांनी अखेर दोन दिवसांनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे, मात्र अद्याप त्याला अटक केली नाही. संजय जाधव हे महाडमधील राष्ट्रवादीचे नेते वाय. सी. …
Read More »मोखाड्यात ‘रयत’चे लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालय; दिग्गजांच्या उपस्थितीत होणार नूतन इमारत उद्घाटन व नामकरण
पनवेल : प्रतिनिधी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात सदैव उल्लेखनिय कार्य करणारे, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त बांधण्यात आलेल्या पालघर जिह्यातील मोखाडा येथील महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामकरण …
Read More »चौक विभागातील ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांनी केले स्वागत चौक : प्रतिनिधी चौक परिसरातील उद्धव ठाकरे गटामधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 2) भाजप जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. या सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे दोन्ही आमदारांनी स्वागत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper