मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी (दि. 19) बैठक झाली. या बैठकीत शेतकर्यांना दिलासा देणारा आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकर्यांची दिवसा वीज मिळण्याची मागणी पूर्ण होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सोलर प्रोजेक्टसाठी काही खासगी आणि सरकारी …
Read More »राज्यात उष्णतेची लाट
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील तापमानात वाढ होत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40अंशांच्या आसपास गेला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही एक कृती आराखडा तयार केला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने या वर्षीच्या उन्हाळ्यापूर्वी जारी केलेल्या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी कृती आराखड्यात …
Read More »सीकेटी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये (स्वायत्त) पदवी आणि पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन मंगळवारी (दि. 18) करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »आमदार राजन साळवी यांची सहकुटुंब चौकशी
अलिबाग : प्रतिनिधी उद्धव ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची मंगळवारी (दि. 18) अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कार्यालयात सहकुटुंब चौकशी करण्यात आली. त्यांची बुधवारी (दि. 19)देखील चौकशी केली जाणार आहे. बेनामी मालमत्ता जमविल्याप्रकरणी आमदार साळवी यांची मागील काही महिन्यांपासून साळवी यांची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. यापूर्वी साळवी …
Read More »पनवेलमधील शिवकर, मोहो, पाली येथे रस्ते कामाचा शुभारंभ
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे शिवकर, मोहो, पाली येथील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून या कामांचे भूमिपूजन सोमवारी (दि. 17) भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य …
Read More »श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू अत्यंत क्लेषदायक
या घटनेचे राजकारण होऊ नये -डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल्या काही श्री सदस्यांचा दुर्दैवाने उष्माघातामुळे मृत्यू झाला. हे माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. आपल्याच कुटूंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे, पण या घटनेचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा …
Read More »कोर्लईत अनेक बोगस बंगले -किरीट सोमय्या
अलिबाग : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायतीमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीयांचेच 19 बोगस बंगले आहेत असे नाही. हे प्रकरण 19 बंगल्यांपुरते मर्यादित नाही, तर अनेक बोगस बंगले कोर्लईत सापडणार आहेत. महिनाभरात मोठे प्रकरण बाहेर येईल आणि यात अजून दोन जणांना अटक होईल, असा इशारा भाजप नेते माजी खासदार किरीट …
Read More »पनवेल महापालिका गरजूंना पुरवणार मोफत आरोग्य सुविधा
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना किरकोळ आजारांसाठी चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून तीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व तीन उपकेंद्र लवकरच सुरू होणार आहेत. त्यामध्ये गरोदर मातांसाठी मोफत सोनोग्राफी, मोफत रक्तपुरवठा, टीबी संशयित रुग्णांसाठी मोफत एक्सरेची सुविधा असणार आहे. महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना वास्तव्याचा पुरावा दिल्यावर या सुविधा मिळणार आहेत. …
Read More »पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी
मुंबई : राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (दि. 16) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा होणार आहे. या महासोहळ्याची जय्यत तयारी खारघर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. …
Read More »खंडाळा घाटातील अपघातात 12 जणांचा मृत्यू
28 जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून तातडीने अपघातस्थळी पाहणी खोपोली : प्रतिनिधी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात शनिवारी (दि. 15) पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 28 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जण गोरेगाव, मुंबई …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper