Breaking News

Ramprahar Reporters

राजकीय अस्थिरतेमुळे उद्धव ठाकरेंना उपरती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबा‘साहेबांचे नाव देण्यास तोंडी सहमती लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समिती आणि भूमिपुत्रांच्या संघर्षाला यश पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास …

Read More »

‘महाराष्ट्रात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार’

नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे. महाराष्ट्रात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार येईल, असा विश्वास ना. एकनाथ शिंदे समर्थक आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना आमदार केसरकर पुढे म्हणाले की, सध्या 10-12 आमदार वगळता सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय. आमच्यावर गद्दाराचे …

Read More »

मद्यप्राशन करणे बेतले जीवावर; मोरबे धरणात बुडून मुंबईच्या युवकाचा मृत्यू

खालापूर : प्रतिनिधी मद्यप्राशन करून खालापूर तालुक्यातील चौक येथील मोरबे धरणात उतरलेल्या ग्रुपमधील एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वैभव रामचंद्र गवांदे (वय 22, रा. साकिनाका, मुंबई) असे या मयत तरुणाचे नाव असून त्याचा मृतदेह सोमवारी (दि. 27) पाण्याबाहेर काढण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील साकिनाका-कुर्ला येथील …

Read More »

खारघरमधील आंदोलनप्रकरणी शिवसेना पदाधिकार्‍यांंवर गुन्हे दाखल

खारघर : प्रतिनिधी राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी आपल्या हद्दीत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत, मात्र त्यानंतरदेखील शिवसेनेच्या रायगड जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी बंडखोर शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांचे खारघर येथे पुतळे जाळून आंदोलन केले. त्यामुळे खारघर पोलिसांनी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे रायगड …

Read More »

‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेत पनवेलला तीन पारितोषिके

पुणे : प्रतिनिधी भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित ‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. 26) कोथरुडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाला. या स्पर्धेत पनवेल तालुक्यातील तीन संस्थांच्या लघुपटाला पारितोषिक मिळाले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीवर ‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेचे …

Read More »

खारघर उद्यानातील कामांचे मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीमध्ये सिडकोने उद्याने उभारली, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची दुर्दशा झाली आहे. सिडकोमार्फत महापालिकेकडे उद्याने हस्तांतरित केल्यानंतर या उद्यानांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्याकरिता भाजपच्या महापालिकेचे स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर, महिला बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, शत्रुघ्न काकडे यांनी पाठपुरावा केला होता. …

Read More »

सिडकोच्या ढीसाळ नियोजनामुळे करंजाडेमध्ये पाणीसंकट

आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून सिडकोने वसविलेल्या विविध वसाहतींमध्ये पाण्याचा प्रश्न उद्भवला असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. करंजाडे वसाहतीमध्येदेखील 7 जूनपासून जवळपास 50 टक्के पाणीकपात करण्यात आली असून पाणीबाणी निर्माण झाली आहे. याबाबत भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रविवारी …

Read More »

आमदार भरत गोगावलेंच्या समर्थनार्थ महाडमध्ये शिवसेना पदाधिकारी एकवटले

स्थानिक स्तरावर वाढता पाठिंबा महाड : प्रतिनिधी शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध केलेल्या बंडामध्ये महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले हेही सहभागी झाले आहेत. त्यांच्या समर्थक पदाधिकार्‍यांनी शनिवारी (दि. 25) घेतलेल्या बैठकीत आमचा पाठिंबा भरतशेठलाच, असा एकमुखी निर्धार केला. शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या शिवनेरी निवासस्थानी पदाधिकार्‍यांची …

Read More »

फणसाड अभयारण्यात शिकारीस आलेल्या सात जणांना पकडले

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात वन्यजीवांची शिकार करण्यासाठी आलेल्या सात जणांना पकडण्यात आले आहे. या सर्वांना मुरूड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुरूडपासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या फणसाड  अभयारण्यात  विविध वन्यजीव आणि वृक्षसंपदा आहे. येथे रात्रीच्या समयी वन्यजीवांची …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नवव्या स्मृतिदिनी शुक्रवारी (दि 24) आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात गायिका गीता सुभाष म्हात्रे व सीमा प्रकाश पराड (बडेकर) यांची भजन संध्या आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा प्रमुख पाहुणे माजी …

Read More »