पुणे ः प्रतिनिधीकोरोना महामारीमुळे सिंहगड पर्यटक व गडप्रेमींसाडी खुला करण्यात आलेला नसतानाही रविवारी (दि. 13) पहाटेपासून ते दुपारपर्यंत येथे कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवत पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. तसेच सुटीचे निमित्त साधत शनिवार-रविवारी लोणावळा, नवी मुंबईतील पारसिक हिल भागात अनेक जवळपासच्या पर्यटकांनी गर्दी केली होती. मुंबईकरांच्या वाटाही लोणावळ्याच्या दिशेने …
Read More »मानखुर्द उड्डाणपुलाच्या नावावरूनही शिवसेनेचे मतपेटीचे राजकारण
भाजपची सडकून टीका मुंबई ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला येथील प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांचे रणझुंझार नेते लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, या समस्त रायगडवासीयांसह बहुसंख्य जनतेच्या मागणीबाबत ठाकरे सरकार हटवादी भूमिका घेत आहे. आपल्या मागणीवर नवी मुंबई, रायगडमधील भूमिपुत्र ठाम असून टोकाचा संघर्ष करण्याच्या पवित्र्यात आहेत. आता घाटकोपर-मानखुर्द लिंक …
Read More »विंडीजचे पराभवाचे द्विशतक
दक्षिण आफ्रिकेचा डावाने दणदणीत विजय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थावेस्ट इंडिज संघाला घरच्याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून एक डाव आणि 63 धावांनी पराभव पत्करावा लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील त्यांचा हा 200वा पराभव ठरला. लुंगी एनगिडी, कागिसो राबाडा व अॅनरिच नॉर्ट्जे यांच्या भेदक मार्यासमोर विंडीजला दोन्ही डावांत तग धरता आला नाही. त्यांचा पहिला …
Read More »क्षेत्ररक्षणादरम्यान फाफ डू प्लेसिस जखमी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस पाकिस्तान सुपर लीग सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.क्वेटा ग्लेडिएटर्स विरुद्ध पेशावर जाल्मी यांच्यात पाकिस्तान सुपर लीगचा 19वा सामना सुरू होता. या सामन्यादरम्यान प्लेसिसची पेशावर जाल्मीचा खेळाडू मोहम्मद हसनैनशी धडक झाली. दोन्ही खेळाडू …
Read More »जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी टीम इंडियाचा कसून सराव
रिषभचे शतक, शुबमन गिलची फटकेबाजी; विराट कोहलीने केली गोलंदाजी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी भारतीय संघाचा कसून सराव सुरू आहे. न्यूझीलंडने यजमान इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळून स्वतःला तयार केले असले तरी त्यांना टक्कर देण्यासाठी भारतीय खेळाडूही समर्थ आहेत. लंडन दौर्यासाठी भारताच्या 20 सदस्यीय संघाने दोन …
Read More »शेतकर्यांच्या शौर्यशाली आंदोलनात दुसर्या दिवशी तिघांना हौतात्म्य
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…त्या दिवशी दास्तान फाट्याजवळ पोलीस व आंदोलक यांच्यात फार मोठा संघर्ष झाला.लाठीमार, अश्रूधूर, …
Read More »आपत्कालीन परिस्थितीत पत्रकारांचीही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतली दखल -रामदास आठवले
मुंबई ः प्रतिनिधीलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याबरोबर मी संसदेत काम केले. ते स्वच्छ अंत:करणाचे व सरळ मनाचे दानशूर नेते आहेत. मी त्यांना दीर्घ आयुरारोग्य चिंतितो, असे सांगून केेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, आपत्कालीन परिस्थितीत सामान्य माणूस आणि पत्रकार यांचीही त्यांनी दखल घेतली ही बाब महत्त्वाची आहे.कोरोना देवदूत पुरस्काराचे मानकरी माजी …
Read More »केंद्रीय पर्यावरण पथकाकडून साई रिसॉर्टची पाहणी
परिवहनमंत्री अनिल परब अडचणीत? रत्नागिरी ः प्रतिनिधीपरिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय पर्यावरण विभागाने परब यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आलिशान साई रिसॉर्टची शनिवारी(दि. 12) पाहणी केली. सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेत अनिल परब यांच्या …
Read More »मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरातील मंत्र्यांच्या गाड्या फोडणार
नरेंद्र पाटील यांची राज्य सरकारला तंबी सोलापूर ः प्रतिनिधीमराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही लढून केसेस अंगावर घ्यायला तयार आहोत, परंतु महाविकास आघाडी सरकारला झुकविल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता आरक्षणासाठी गुळगुळीत आंदोलन न करता राज्यभरात मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्या फोडण्यात येतील, अशी तंबी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शनिवारी …
Read More »राज्यातील आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा
पटोलेंच्या भूमिकेमुळे ‘मविआ’त खळबळ मुंबई ः प्रतिनिधीनुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची ठाम भूमिका मांडली आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper