Breaking News

Ramprahar Reporters

कळंबोली, खारघरमध्ये विकासपर्व

पनवेल महापालिकेकडून 22 कोटींच्या कामांना मंजुरी पनवेल ः रामप्रहर वृत्तमहापालिका हद्दीतील सिडको नोडमधील कळंबोली आणि खारघर येथील 22 कोटी रुपयांच्या विकासकामांना सोमवारी (दि. 22) महासभेत मंजुरी देण्यात आली. महापालिका स्थापन झाल्यापासून हस्तांतरणाअभावी सिडको नोडमधील कामे करता आली नव्हती. त्यामुळे सिडको नोडमधील कामांना पहिल्यांदाच मंजुरी देण्यात आली आहे.पनवेल महापालिकेची 18 मार्चची …

Read More »

देशमुख क्वारंटाइनमध्ये होते, तर मग ‘हे’ नेमके कोण?

देवेंद्र फडणवीसांचा सवाल मुंबई ः प्रतिनिधीमुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत त्या वेळी देशमुख क्वारंटाइनमध्ये होते, असे पवारांनी सांगितले. …

Read More »

सायकलपटू अ‍ॅड. गजानन डुकरे यांचा आणखी एक विक्रम

90 किमीचे अंतर साडेतीन तासांत पूर्ण कर्जत ः बातमीदारक्रीडापटू असलेले कर्जत तालुक्यातील अ‍ॅड. गजानन डुकरे यांनी 26 जानेवारी रोजी भारताचा तिरंगा झेंडा लावून सायकल चालवत एक विक्रम केला होता. त्यानंतर रविवारी (दि. 21) झालेल्या सायकालिंगच्या राजगुरू भगतसिंग सुखदेव इंडियन फ्लॅग साईड वर्ल्ड अट्टेम्प स्पर्धेत त्यांनी 90 किलोमीटर अंतर विक्रमी वेळेत …

Read More »

गोळीबार करणारा शेकापचा नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात

दोन साथीदारांसह कोठडीत रवानगी खोपोली ः प्रतिनिधीगोळीबार करून फरार झालेला खोपोली नगर परिषदेचा शेकापचा नगरसेवक प्रशांत कोठावले व त्याचे दोन साथीदार यांना अटक करण्यात अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याला यश आले आहे. या तिघांना खालापूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 15 मार्चला एका …

Read More »

सचिन वाझे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती

केंद्र सरकारने चौकशी करावी -राज ठाकरे मुंबई ः प्रतिनिधीदहशतवादी बॉम्ब ठेवतात अशा घटना आपण आजवर पाहत आलो, पण आता पोलीस बॉम्ब ठेवतात ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय धक्कादायक बाब आहे. बॉम्ब ठेवणारा सचिन वाझे हा उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारकडून योग्य पद्धतीने होणार नाही. …

Read More »

हे तर चोरांचे आणि खुन्यांचे सरकार -प्रकाश आंबेडकर

मुंबई ः प्रतिनिधीमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. हे चोरांचे आणि खुन्यांचे सरकार आहे. त्यामुळे ते बरखास्त …

Read More »

तेव्हा राज्य सरकार झोपले होते का?

फडणवीसांचा सवाल मुंबई ः प्रतिनिधीमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 21) …

Read More »

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या खंडणी वसुली कारभाराचा पनवेलमध्ये भाजपकडून जाहीर निषेध

पनवेल ः हरेश साठेपोलिसांना दरमहा 100 कोटी रुपये खंडणी वसुलीचे टार्गेट देऊन महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात पनवेल भाजपच्या वतीने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 21) जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची …

Read More »

अफगाणिस्तानच्या कर्णधाराने मोडला धोनीचा विश्वविक्रम

अबुधाबी ः वृत्तसंस्थाअफगाणिस्तानने तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना 47 धावांनी जिंकत झिम्बाब्वेला 3-0ने क्लीन स्वीप केले. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगान याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला.अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 183 धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाझ (18) याला मोठी खेळी करण्यात अपयश …

Read More »

कर्जतच्या बबन झोरेंची आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

कर्जत ः बातमीदारकेंद्र सरकारच्या क्रीडा विभागाकडून झारखंड येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील बबन बाबू झोरे यांनी दोन सुवर्णपदके पटकाविली असून, त्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.झारखंड येथे झालेल्या ऑल इंडिया पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत देशातील 28 घटक राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. …

Read More »