Breaking News

Ramprahar Reporters

सचिन वाझे आता पोलीस दलातून निलंबित

मुंबई ः प्रतिनिधीअंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणात संशयाच्या भोवर्‍यात अडकलेल्या सचिन वाझे यांना आणखी एक झटका बसला आहे. वाझे यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कोठडीत असलेल्या वाझे यांची कसून चौकशी सुरू आहे.या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी  पथकाकडे (एटीएस) …

Read More »

पोलीस अधिकारी ठरला ‘मास्टर महाराष्ट्र श्री’

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारींची कामगिरी पनवेल ः वार्ताहरमहाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या वतीने आणि इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशनच्या मान्यतेने खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या मास्टर महाराष्ट्र श्री 2021 शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करणारे सहाय्यक  निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकाविले. यामुळे नवी मुंबई पोलीस दलाचे नाव सुवर्णाक्षरात नोंदविले …

Read More »

पालीच्या अनुज सरनाईकने साकारली ‘सुवर्ण’ कामगिरी

पिंच्याक सिलाट राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत सुयश सुधागड ः प्रतिनिधीपिंच्याक सिलाट राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा रविवारी (दि. 14) कर्जत येथील वरणे येथे झाली. या स्पर्धेत 75 ते 80 वजनी गटात पालीतील अनुज सरनाईक याने सुवर्णपदक पटकाविलेे. त्यामुळे त्याची 24 ते 26 मार्चला श्रीनगर येथे होणार्‍या वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड …

Read More »

इशान किशनने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने

सामनावीर पुरस्कार प्रशिक्षकांच्या वडिलांना समर्पित मुंबई ः प्रतिनिधीइंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या टी-20 सामन्यात अर्थात स्वतःच्या पदार्पणाच्या सामन्यात आक्रमक अर्धशतक झळकावून यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने सामनावीर पुरस्कार पटकावला. किशनने आपल्या 32 चेंडूंमधील 56 धावांच्या दमदार खेळीत चौकार आणि षटकारांची बरसात करीत मैदानातील प्रेक्षकांची मने जिंकलीच, शिवाय सामन्यानंतर पुरस्कार सोहळ्यात आपल्या कृतीने असंख्य क्रिकेटप्रेमींच्याही …

Read More »

टीम इंडियाने काढला वचपा

इंग्लंडविरुद्ध दुसर्‍या टी-20 सामन्यात विजय; आज तिसरी लढत अहमदाबाद ः वृत्तसंस्थाभारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातील पराभवाचा वचपा काढला आहे. भारताने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार विराट कोहली (नाबाद 73) आणि पदार्पणाचा सामना खेळणार्‍या इशान किशनचे (56) …

Read More »

नामदेववाडीतील नागरिकांना नुकसानभरपाई तसेच योग्य पुनर्वसन करा

आमदार महेश बालदी यांची सिडकोकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तवडघर येथील नामदेववाडी येथे राहणार्‍या नागरिकांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या घरांचे योग्य पुनर्वसन करावे, अशी आग्रही मागणी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापक संचालकांकडे केली आहे.या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी सिडकोला …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वेदिकाला मदतीचा हात

वैद्यकीय उपचारार्थ 50 हजारांची आर्थिक मदत पनवेल ः रामप्रहर वृत्त’एसएमए टाईप 1’ या गंभीर आजाराशी झुंज घेत असलेल्या वेदिका सौरभ शिंदे या बालिकेच्या वैद्यकीय उपचारार्थ श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 50 हजार रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल …

Read More »

भाजप नगरसेवक नितीन पाटील यांच्या नगरसेवक निधीतून विविध विकासकामे

पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजप नगरसेवक नितीन पाटील यांच्या नगरसेवक निधीतून पायोनिअर विभागात बस थांबा, मिनी हायमास्ट तसेच तालुका पोलीस स्टेशनजवळ मिनी हायमास्ट व उपजिल्हा रुग्णालय ते ज्येष्ठ नागरिक हॉल येथे पथदिवे अशा विविध विकासकामांचे लोकार्पण शुक्रवारी (दि. 12) पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.  या कार्यक्रमास …

Read More »

एल अ‍ॅण्ड टी कोमास्तुकडून टीआयपीएलचा सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्तएल अ‍ॅण्ड टी कोमास्तु कंपनी आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे मागील दोन दशकांहून अधिक काळ कन्स्ट्रक्शन व्यवसायानिमित्त चांगले व दृढ नाते आहे. त्या अनुषंगाने एल अ‍ॅण्ड टी कोमास्तुने वर्षानुवर्षे आदरणीय व निष्ठावंत ग्राहक असल्याबद्दल ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान …

Read More »

नगरसेविका चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीतून विविध विकासकामे

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीतून अनेक विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यानुसार नवीन पनवेल पोदी क्रमांक 3 येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच सेक्टर 16मधील उद्यानात पाणपोई बसविण्यात आली. या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल …

Read More »