Breaking News

Ramprahar Reporters

मर्यादित वेळेसाठी लोकलसेवेचा निर्णय दिशाहीन आणि हास्यास्पद

भाजपची सडकून टीका मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाच्या संकटामुळे सुमारे 10 महिन्यांपूर्वी बंद झालेली व त्यानंतर मर्यादित प्रवाशांसाठी सुरू असलेली मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा येत्या 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होणार आहे, मात्र प्रवासाच्या वेळा मर्यादित असणार आहेत. तसे पत्र राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वेला लिहिले आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांना ठरावीक वेळेतच प्रवास …

Read More »

अटल करंडक स्पर्धेचा शानदार शुभारंभ

सिने-नाट्य कलाकारांची प्रमुख उपस्थिती; रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलमध्ये होत असलेल्या सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा शुक्रवारी (दि. 29) सिने-नाट्य कलाकारांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार शुभारंभ  झाला. या वेळी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोकण दौर्‍यावर

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढील महिन्यात कोकण दौर्‍यावर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात बांधलेल्या लाइफटाइम वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या दौर्‍याबाबत अनिश्चितता होती, मात्र आता अमित शाह यांचा दौरा नक्की झाल्याचे …

Read More »

मालिकेत एकतर्फी लढती होणार नाहीत

जोफ्रा आर्चरचा टीम इंडियाला इशारा चेन्नई ः वृत्तसंस्थाभारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचे काऊंटडाऊन आता सुरू झाले आहे. या मालिकेमधील पहिला सामना 5 फेब्रुवारीपासून चेन्नईत सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर याने यंदा चांगले पिच असेल. या पिचचा इंग्लंडच्या बॉलर्सना फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली …

Read More »

पुजाराकडून रोहित आणि गिलची प्रशंसा

मुंबई ः प्रतिनिधीभारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळविलेल्या ऐतिहासिक विजयात चेतेश्वर पुजाराचे मोठे योगदान आहे. रोहित व गिलने आक्रमक खेळ करीत टीम इंडियाला विजयाचा मार्ग दाखवला. हे दोघेही आक्रमक खेळाडू आहेत. मला त्यांची मदत होते. जोडीदार आक्रमक खेळत असेल तर मला माझा नैसर्गिक खेळ करता येतो, असे पुजाराने स्पष्ट केले. पुजाराने एका मुलाखतीमध्ये …

Read More »

टीम इंडियासाठी गुड न्यूज

कोरोना चाचणीत सर्व खेळाडू निगेटिव्ह; कुटुंबाचाही लाभणार सहवास नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या तडाख्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ घरच्या मैदानावर क्रिकेट मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरूद्ध 5 फेब्रुवारीपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. तत्पूर्वीच टीम इंडियासाठी दोन चांगल्या बातम्या आल्या आहेत. तीनपैकी पहिल्या कोरोना चाचणीत सर्व भारतीय खेळाडू निगेटिव्ह आले असून …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा महाअंतिम फेरीचे आज उद्घाटन

विजेत्या एकांकिकेला एक लाख आणि मानाचा ‘अटल करंडक’ पनवेल ः प्रतिनिधीश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा होत असून, स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला …

Read More »

रायगडातील 40 हजार मतदारांची नावे यादीतून वगळण्याचा प्रस्ताव

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात ज्यांचे मतदार यादीत फोटो नाहीत, दुबार नावे, स्थलांतरित, मृत्यू पावलेले असे 60 हजार मतदार आहेत. त्यातील 40 हजार मतदारांची नवे रायगड जिल्ह्यातील यादीतून वगळण्यात यावीत, असा प्रस्ताव रायगड जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली असून 16 हजार 298 मतदारांची नावे …

Read More »

पनवेल मनपा करणार खेळांच्या मैदानांचा विकास

खारघरमधील मैदानांची सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोने पनवेल महापालिका हद्दीतील उद्याने आणि खेळाची मैदाने पालिकेकडे हस्तांतरित केली आहेत. ही उद्याने आणि खेळाची मैदाने महापालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 28) खारघरमधील उद्याने आणि खेळाच्या …

Read More »

मॉर्निंग वॉकसाठी जाताना भीषण अपघात

एकाच कुटुंबातील तिघांवर काळाची झडप लोणंद ः प्रतिनिधीखंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळ गुरुवारी (दि. 28) मॉर्निंग वॉकला निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मृतांमध्ये वृद्ध दाम्पत्य आणि त्यांच्या सुनेचा समावेश आहे.लोणंद-खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळील घाडगे मळा परिसरात गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास बबन धायगुडे (70), शांताबाई धायगुडे (64) …

Read More »