Breaking News

Ramprahar Reporters

टी-20मध्ये भारताची बाजी

दुसर्‍या सामन्यासह मालिकाही खिशात सिडनी : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाविरुद्ध लागोपाठ दुसर्‍या टी-20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने धडाकेबाज खेळ करीत सहा गडी राखून बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शिखर धवन, विराट कोहली आणि मधल्या फळीत हार्दिक पांड्या-श्रेयस अय्यरच्या जोडीने फटकेबाजी करीत विजयाला गवसणी घातली. या विजयासह भारताने तीन …

Read More »

डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत घडवणार -पंतप्रधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना रविवारी (दि. 6) अभिवादन केले. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांना जो भारत अपेक्षित होता तो निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून म्हटले आहे.  लक्षावधी नागरिकांच्या आयुष्यात जो प्रगतीचा नंदादीप तेवला …

Read More »

लालबागमध्ये लग्नकार्य असलेल्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट

मुंबई : प्रतिनिधीमुंबईच्या लालबाग परिसरातील एका इमारतीत रविवारी (दि. 6) सकाळी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन 20 जण होरपळले आहेत. जखमींना केईएम व ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या घरात स्फोट झाला त्या घरामध्ये लग्नकार्य असल्याने पाहुणे मंडळी उपस्थित होती.लालबाग येथील साराभाई इमारतीत वास्तव्याला असणार्‍या राणे कुटुंबीयांच्या घरात ही …

Read More »

पोस्टर व वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर; विजेत्यांचा गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्तदीपावलीचे औचित्य साधून कोशिश फाऊंडेशनच्या वतीने पोस्टर स्पर्धा तसेच ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 6) गौरविण्यात आले.मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषेत आणि 7 वर्षाखालील, 8 ते 15 …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

ठाणे : प्रतिनिधीज्येष्ठ मराठी अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 84व्या वर्षी ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाट्य व सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.पटवर्धन यांनी गेली पन्नास वर्षे मराठी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले. दूरदर्शनवरच्या आमची माती आमची …

Read More »

काहीही झाले तरी कृषी कायदा रद्द होणार नाही!

शरद पवारांना भाजपचे प्रत्युत्तर मुंबई : प्रतिनिधीशेतकरी आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. यावर आता भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकर्‍यांना डोळ्यासमोर ठेवून कृषी कायद्यात सुधारणा केल्या आहेत. या कायद्याचा फायदा सर्व शेतकर्‍यांना होणार आहे. त्यामुळे काहीही झाले तरी कायदा रद्द होणार …

Read More »

कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही -‘डब्ल्यूएचओ’

न्यूयॉर्क : वृत्तसंस्थाअनेक देशांमध्ये कोरोना लशींवर काम सुरू आहे. काही ठिकाणी लशी तिसर्‍या टप्प्यातही आहेत. त्यांचे परिणाम पाहिले तर कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (यूनो) महासभेत त्यांनी हे वक्तव्य केले.घेब्रेयेसस पुढे म्हणाले …

Read More »

राज्यपाल कोश्यारी उद्या पनवेलमध्ये

कळंबोली : बातमीदारमहाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सोमवारी (दि. 7) एका खासगी कार्यक्रमानिमित्त पनवेलमध्ये येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे.राज्यपाल कोश्यारी सोमवारी सकाळी 11 वाजता नवीन पनवेलमधील शगुन मंगल कार्यालयात लग्नसोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.

Read More »

श्रीनिवास कोडरू जिल्हा संयोजकपदी

पनवेल : भाजप उत्तर रायगड जिल्हा अंतर्गत दक्षिण भारतीय सेलच्या जिल्हा संयोजकपदी श्रीनिवास कोडरू यांची भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नियुक्ती करून अभिनंदन केले. जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहेरे, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, जिल्हा चिटणीस रमेश नायर आदी या वेळी उपस्थित होते.

Read More »

रणजीतसिंह डिसले यांचा भाजपकडून सत्कार

विधान परिषदेसाठी शिफारस करू : दरेकर सोलापूर : प्रतिनिधीसोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झालेल्या ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी (दि. 5) सोलापूरमध्ये जाऊन डिसले यांचा सत्कार केला.इतर शिक्षकांनी आदर्श घ्यावा अशा …

Read More »