Breaking News

Ramprahar Reporters

कामोठे येथे बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी

पनवेल : वार्ताहरसायन-पनवेल महामार्गावरील कामोठे येथे एका खासगी बसला बुधवारी (दि. 18) पहाटे झालेल्या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कोल्हापूरवरून बदलापूरच्या दिशेने निघालेली खासगी बस (एमएच 08 ई 9287) बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कामोठे येथील पेट्रोल पंपाजवळील भुयारी मार्गाच्या कठड्यावर आदळली. या अपघातात बसमधील …

Read More »

शिवसेना हिंदुत्ववादी राहिलेली नाही

खासदार नारायण राणेंचा घणाघात मुंबई : प्रतिनिधीशिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही. गद्दारी करून ते सत्तेत गेले आहेत. उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाहीत. तडजोड करणारे, पदासाठी हवे ते करणारे आहेत. त्यामुळे हिंदुत्व विचार व शिवसेना हे समीकरण नाही, असा घणाघात भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर …

Read More »

ओएनजीसी-शिवकर रस्त्याच्या कामाची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे सातत्याने सुरू असतात. अशाच प्रकारे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ओएनजीसी ते शिवकर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम मंजूर करण्यात आले असून, हे काम सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी या …

Read More »

रोह्यात उद्या भाजपची बैठक

पेण, रोहा : प्रतिनिधीबिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश संपादन केल्यानंतर भाजपने महाराष्ट्रातील महानगरपालिका व नगरपालिकांवर लक्ष केंद्रित केले असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने रोहा नगरीत गुरुवारी (दि. 19) भाजपची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आमदार रविशेठ पाटील, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी …

Read More »

रायगड जिल्ह्यात लेप्टोची साथ

जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला मात्र गांभीर्य नाही अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे, मात्र जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीसचे रुग्ण वाढत आहेत. अलिबाग व पेण तालुक्यात लेप्टोमुळे काहींच्या मृत्यू झाला आहे. या साथीमुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, मात्र रायगड जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे …

Read More »

माथेरान पर्यटकांनी गजबजले

मिनीट्रेन शटल सेवेच्या फेर्‍यांमध्ये वाढ कर्जत : बातमीदारप्रसिद्ध माथेरान पर्यटनस्थळ पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजले आहे. लॉकडाऊननंतर आठ महिन्यांनी प्रथमच माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळाली. ऐन दिवाळीत पर्यटकांच्या आगमनाने माथेरानकर सुखावला आहे. दरम्यान, पर्यटकांसाठी मिनीट्रेनच्या शटल सेवेत वाढ करण्यात आली असून, 22 नोव्हेंबरपर्यंत शटल सेवेच्या आठ फेर्‍या असणार आहेत.दिवाळी हा माथेरानचा …

Read More »

पनवेलच्या विरुपाक्ष मंदिरात आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थितीत महाआरती

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनामुळे गेले सुमारे आठ महिने बंद असलेली राज्यातील धार्मिक स्थळे भाजप तसेच विविध संघटनांच्या मागणीनंतर दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अखेर खुली करण्यात आली. याचा आनंदोत्सव म्हणून सोमवारी (दि. 16) सायंकाळी पनवेल शहरातील विरूपाक्ष मंदिरात  महाआरती करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.राज्यात …

Read More »

साखरपुड्याच्या पार्टीसाठी बोलवून तरुणीवर मित्रांचा सामूहिक बलात्कार

मुंबई : प्रतिनिधीमैत्रिणीला साखरपुड्याच्या पार्टीसाठी म्हणून बोलवून तिच्यावर मित्रांनीच सामूहिक बलात्कार केल्याची घटना मुंबईतून समोर आली आहे. अंधेरी-कुर्ला रोडवरील एका हॉटेलमध्ये मागच्या आठवड्यात हा संतापजनक प्रकार घडला.पीडित तरुणीने 15 नोव्हेंबरला तीन आरोपींविरोधात तक्रार नोंदवली आहे. आरोपींनी मला व अन्य दोन महिलांना पार्टीसाठी निमंत्रित केले होते. त्यानंतर आरोपींनी माझ्यावर बलात्कार केला, …

Read More »

सत्तेसाठी नेते इटालियन काँग्रेसच्या मांडीवर बसले मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर कुठे बिघडले?

भाजप नेते अतुल भातखळकर यांचा टोला मुंबई : प्रतिनिधीलोकांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय बिघडले? पोलीसही हप्ते घेतातच ना असे वक्तव्य माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर अवैध दारूविक्री केल्याने कारवाई केली असून, त्यांची पाठराखण …

Read More »

वाढीव वीज बिलाबाबत राज्य सरकारचा यू-टर्न

ग्राहकांना सवलत मिळणार नाही : ऊर्जामंत्री मुंबई : प्रतिनिधीराज्यातील वीज ग्राहकांना वाढीव बिलातून दिलासा मिळणार नाही. मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिले ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते. त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे वीज बिल …

Read More »