Breaking News

Ramprahar Reporters

रो-रो बोट अखेर मांडवा बंदरात दाखल

अलिबाग : प्रतिनिधीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली बहुचर्चित मुंबई भाऊचा धक्का ते मांडवा रो-रो बोटसेवा गुरुवारी (दि. 20) सुरू झाली. 26 कार, नऊ दुचाकी आणि 206 प्रवासी घेऊन पहिली बोट भाऊचा धक्का येथून निघाली आणि व्यवस्थितपणे मांडवा टर्मिनल्स येथे पोहोचली.  केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत साकारल्या गेलेल्या या …

Read More »

ड्रग्ज प्रकरणातील आरोपीची क्वारंटाइन सेंटरमध्ये आत्महत्या

खारघर, पनवेल ः बातमीदारखारघरमध्ये क्वारंटाइन असलेल्या एका आरोपीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या महम्मद सुलेमान याने क्वारंटाइन सेंटरमध्ये गळफास घेतला. गेल्या काही महिन्यांतील आरोपींच्या आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. तळोजा जेलमधील कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी खारघरच्या गोखले हायस्कूलमध्ये विलगीकरण कक्ष …

Read More »

शासनाच्या सुचना पाळून गणोशोत्सव साजरा करा

अलिबाग ः प्रतिनिधीयंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आणि मोहरम साजरा केला जात आहे. शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करूनच हे उत्सव साजरे करावेत. गर्दी करू नका. मिरवणुका काढू नका. घरातच विसर्जन करा, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 20) जिल्हा प्रशासनाने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून …

Read More »

स्वच्छ भारत सर्वेक्षणात नवी मुंबईचा झेंडा; तिसर्‍या स्थानी झेप

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यात मध्य प्रदेशमधील इंदौर हे देशातील सर्वांत स्वच्छ शहर ठरले असून, सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. गुजरातमधील सूरत दुसर्‍या क्रमांकावर, तर महाराष्ट्रातील नवी मुंबईने तिसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. पंतप्रधान …

Read More »

रायगडात 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू; 422 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात 10 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 19) झाली असून, 422 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 416 रुग्ण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये अलिबाग तीन, पनवेल दोन, उरण, खालापूर, कर्जत, मुरूड व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल 238, अलिबाग 35, …

Read More »

पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळणार 18 हजार रुपये ठोक मानधन

पनवेल मनपा स्थायी समिती सभेत विविध विषयांना मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या बुधवारी (दि. 19) झालेल्या स्थायी समिती सभेत पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना 18 हजार रुपये ठोक मानधन देण्यास मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे कोविड योद्धा बनून कार्यरत असणार्‍यांना 300 रुपये प्रतिदिन भत्ता देण्यास मान्यता दिली गेली. या वेळी कोरोना उपाययोजनांवर …

Read More »

तांबडी बुद्रुक प्रकरणात पोलिसांनी आठ दिवसांत चार्जशीट दाखल करावी

आमदार विनायक मेटे यांची मागणी रोहे : प्रतिनिधीतांबडी बुद्रुक येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यातील आरोपींना फाशीची शिक्षा कशी मिळेल यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व त्याकरिता सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी. मी यासंबंधी निकम यांच्याशीही चर्चा केली असून, …

Read More »

कर्जतमध्ये शेतकर्‍यांचे उपोषण सुरू

रिलायन्स इथेन गॅस पाइपलाइनबाधितांना भाजपचा पाठिंबा कर्जत : बातमीदाररिलायन्स इथेन गॅस पाइपलाइनसाठी दिलेल्या जागेचा मोबदला अद्याप मिळाला नसल्याने कर्जत तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना कंपनी आणि प्रशासनाविरुद्ध कर्जत तहसील कार्यालयाबाहेर बुधवारी (दि. 19)पासून उपोषण सुरू केले आहे. शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला आहे.रिलायन्स कंपनीच्या दहेज ते नागोठणेदरम्यानच्या इथेन गॅस …

Read More »

कामगारांच्या पाठीशी भाजप उभा राहणार : प्रवीण दरेकर

धाटावमधील एलपी कंपनीच्या गेटसमोर आंदोलन   रोहे : प्रतिनिधीआमची भूमिका कारखाने बंद पाडण्याची नाही, परंतु कारखानदाराकडून स्थानिकांना न्याय मिळत नसेल, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर कारखानदारांना सांगावे लागेल की, हा कारखाना इथल्या लोकांसाठी आहे. ज्या ज्या ठिकाणी कामगारांवर अन्याय होत असेल त्या औद्योगिक क्षेत्रात भाजप कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल, …

Read More »

पनवेलमधील जनतेचा गणेशोत्सव होणार गोड

तब्बल 60 हजार कुटुंबांसाठी अन्नधान्य श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपचा स्तुत्य उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय …

Read More »