Breaking News

Ramprahar Reporters

खालापूरनंतर मुरूडमध्ये बिबट्या

नांदगाव समुद्रकिनार्‍यावर ठसे; वनविभागाकडून पाहणी मुरूड : प्रतिनिधी खालापूरनंतर आता मुरूड तालुक्यातील नांदगाव समुद्रकिनार्‍यावर बिबट्या येऊन गेल्याच्या पाऊलखुणा नागरिकांना दिसून आल्या आहेत. वनविभागानेही त्यास दुजोरा दिला आहे. फणसाड अभयारण्यातील एक बिबट्या अन्नाच्या शोधार्थ बुधवारी रात्री नांदगाव समुद्रकिनार्‍यावर आला होता. त्याच्या पावलांचे ठसे गावकर्‍यांना वाळूत दिसले. याची खबर ग्रामस्थांनी वनक्षेत्रपाल प्रशांत …

Read More »

चिवे आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील चिवे येथील अनुदानित आश्रमशाळेच्या दोन  विद्यार्थ्यांची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाली आहे. हे दोघेही डिसेंबर महिन्यात छत्तीसगड येथे होणार्‍या 65व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहेत. या निवडीमुळे चिवे आश्रमशाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. वाशीम येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी …

Read More »

ट्रेंट बोल्ट मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

मुंबई : प्रतिनिधी आयपीएलमधील गतविजेता संघ मुंबई इंडियन्स संघाने एक नवा खेळाडू आपल्या ताफ्यात सामील करून घेतला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याला नव्या मोसमासाठी मुंबईने आपल्या संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. मागील वर्षी बोल्ट हा दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळला होता. बोल्टने 2014मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. …

Read More »

पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी

हाँगकाँग : वृत्तसंस्था हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उत्तम कामगिरी करीत पी. व्ही. सिंधूने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूने 19व्या स्थानावर असलेल्या कोरिआच्या किम गा ऊन हिला 36 मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभूत केले. सिंधूने प्रतिस्पर्धी खेळाडूला 21-15, 21-16 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. त्याआधी सायना …

Read More »

बांगलादेशी फलंदाजांचे लोटांगण

पहिला डाव 150 धावांवर संपुष्टात; भारत 1 बाद 86 इंदूर : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार मोमिनुल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र पहिल्या डावात हा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्याचे दिसून आले. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्‍यापुढे बांगलादेशचा पहिला डाव केवळ 150 धावांत आटोपला. दरम्यान, …

Read More »

महाडमध्ये कार अपघात; एक ठार, दोघे जण जखमी

महाड : प्रतिनिधी महाड-रायगड मार्गावर नाते खिंड येथे झालेल्या कार अपघातात एक जण ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. एका पाण्याच्या डबक्यात कार उलटून मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास हा अपघात झाला. महाडमधील व्यावसायिक नितीन मणिलाल मेहता, बांधकाम व्यावसायिक योगेश कळमकर आणि महाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शैलेश सणस मंगळवारी …

Read More »

शिवसेनेचा दावा मान्य नाही!

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शहा यांची स्पष्टोक्ती नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सत्तापेचावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपली बाजू प्रथमच मांडली आहे. महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असे निवडणुकीपूर्वीच सांगण्यात आले आहे, मात्र निवडणूक निकालानंतर शिवसेना नव्या मागण्या घेऊन समोर आली, असा आरोप शहा यांनी केला. शिवसेनेसोबत मुख्यमंत्रिपद वाटून …

Read More »

वाकडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या वनिता चोरघे बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्त वाकडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्षाच्या वनिता चोरघे यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चोरघे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी वाकडीचे उपसरपंच विनोद भोपी, माजी सरपंच नरेश पाटील, नामदेव जमदाडे, कचेर पाटील, विलास चोरगे, ग्रामपंचायत …

Read More »

पनवेल, नवी मुंबईचे महापौरपद खुल्या वर्गातील महिलांसाठी राखीव

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिकसाठी महापौरपद खुल्या वर्गासाठी राखीव झाल्याने या शहरातील महापौरपदाकडे अनेक इच्छुकांच्या नजरा वळल्या आहेत. त्यामुळे महापौरपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी म्हणून नगरसेवकांकडून आतापासूनच हालचाली सुरू होणार आहेत, तर पनवेल आणि मुंबईचे महापौरपद खुल्या वर्गातील महिलांसाठी राखीव …

Read More »

स्केटिंग स्पर्धेत ‘गुरुकुल’चे यश

मोहोपाडा : प्रतिनिधी रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन याक पब्लिक स्कूल येथील स्केटिंग रिंकवर करण्यात आले होते. यामध्ये चौक येथील श्रीस्वामीनारायण गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. श्रीस्वामीनारायण गुरुकुलचा शेल सणस या विद्यार्थ्याने 17 वर्षांखालील क्वाड या गटात तीन रौप्यपदके, तर देव पटेल याने 14 …

Read More »