Breaking News

Ramprahar Reporters

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच म्हणतो, भारताला भारतात सहज हरवू शकतो!

सिडनी : वृत्तसंस्थाभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 14 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व अ‍ॅरोन फिंच याच्याकडे आहे. ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख खेळाडू मार्नस लाबूशेन याने भारतात भारताविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असल्याचे म्हटले असतानाच आस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघाचा कर्णधार फिंचने मात्र भारताला भारतात सहज पराभूत करू, असे म्हटले …

Read More »

‘तो’ प्रस्ताव म्हणजे मूर्खपणा : संदीप पाटील

मुंबई : प्रतिनिधीभारताचे माजी तडाखेबंद फलंदाज संदीप पाटील यांनी कसोटीच्या नव्या चारदिवसीय संकल्पनेला विरोध केला आहे. जेव्हा त्यांना या संकल्पनेविषयी मतप्रदर्शन करण्यास सांगितले तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया होती ’हा मूर्खपणा आहे.’ यावर सविस्तर बोलताना पाटील म्हणाले की, सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटची जी समर्पक व्याख्या केली आहे, तेच माझेही म्हणणे आहे. …

Read More »

सीकेटी विद्यालयात ‘कॅलिडोस्कोप’

वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्लिश मीडियम माध्यमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात मंगळवारी (दि. 7) झाले. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे शिक्षणतज्ज्ञ बेहराम मोहता आणि संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

पनवेल महानगरपालिका पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

भाजपच्या रूचिता लोंढे यांना अनुकूल वातावरण पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मध्ये गुरुवारी (दि. 9) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, भाजप-रिपाइं युतीच्या उमेदवार रूचिता लोंढे यांना या पोटनिवडणुकीत अनुकूल वातावरण दिसून येत आहे.प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मध्ये …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे काम अंतिम टप्प्यात

मान्यवरांकडून पाहणी सातारा : प्रतिनिधीरयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज या ठिकाणी लोकनेते रामशेठ ठाकूर भवन उभारण्यात येत आहे. या भवनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवरांनी या भवनाच्या कामाची …

Read More »

धुळ्यात भाजपची मुसंडी

पालघर, नंदुरबार, वाशिम त्रिशंकू; नागपूर आघाडीकडे मुंबई : प्रतिनिधीविदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी (दि. 8) लागला. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या धुळे जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. नागपूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला कौल मिळाला, तर पालघर, वाशिम, अकोला व नंदुरबार येथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली …

Read More »

‘एफपीएल’चे चौथे पर्व रंगणार

पनवेल : रामप्रहर वृत्तवेनम स्पोर्ट्सच्या वतीने आणि रायगड जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने चौथी फुटबॉल प्रीमियर लीग (एफपीएल) 11 व 12 जानेवारी रोजी पनवेलजवळील खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत 64 संघांचा सहभाग निश्चित झाला असून, यामध्ये मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, यवतमाळ, हुबळी …

Read More »

महाराष्ट्र-हैदराबाद सामना अनिर्णीत

स्वप्नील फुलपगारचे झुंजार त्रिशतक नागोठणे, अलिबाग : प्रतिनिधीसी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेंतर्गत रिलायन्स कंपनीच्या नागोठणे येथील मैदानावर खेळला गेलेला महाराष्ट्र आणि हैदराबाद संघांमधील चार दिवसीय साखळी सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. पुण्याच्या स्वप्नील फुलपगार या फलंदाजाने झुंजार त्रिशतकी (328 धावा) खेळी केल्याने महाराष्ट्राने हैदराबादची 653 धावांची आघाडी मोडत 7 बाद …

Read More »

नेरळमधील कराटेपटूंचे सुयश

कर्जत : नेरळ येथील बुडाकॉन कराटे असोसिएशनच्या कराटेपटूंनी मुंबई बोरिवली येथे झालेल्या कराटे स्पर्धेत सुयश मिळविले. त्यांचे कौतुक होत आहे.नेरळ येथील कराटेपटू नाविन्या श्रीकृष्ण डुकरे आणि दक्षता संतोष डुकरे या दोघींनी स्पर्धेत दोन सुवर्ण आणि दोन रौप्यपदके पटकाविली. या कराटेपटूंना बुडोकोन कराटे असोसिएशनच्या कोचकडून मार्गदर्शन मिळत असून यातील एका कराटेपटूचे …

Read More »

पनवेलच्या महापौर, उपमहापौरपदांकरिता भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

डॉ. कविता चौतमोल, जगदिश गायकवाड यांच्या विजयाची केवळ औपचारिकता पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाकरिता डॉ. कविता चौतमोल यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दर्शविला आहे, तर उपमहापौरपदासाठी आरपीआयचे जगदिश गायकवाड यांना संधी देण्यात आली. दोघांनी आपले अर्ज मंगळवारी (दि. 7) पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक-नगरसेविकांच्या उपस्थितीत दाखल केले.पनवेल महापालिकेची स्थापना …

Read More »