अलिबाग : प्रतिनिधी खिरापतीसारख्या देण्यात येणार्या रायगडभूषण पुरस्काराची निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणे, निवृत्तीवेतन धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पाहिल्या मंगळवारी पेन्शनर आदालत भरविणे, असे दोन महत्त्वाचे निर्णय शुक्रवारी (दि. 15) झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या सभेत एकमताने घेण्यात आले. नियोजन भवन येथे ही सभा झाली. रायगडभूषण पुरस्कार एकाच व्यक्तीला दोनवेळा …
Read More »बाईक न दिल्याने विद्यार्थ्याने शाळेत पेटवून घेतले
पनवेल, कळंबोली : प्रतिनिधी, बातमीदार, शाळेत जायला वडिलांनी मोटरसायकल न दिल्याने एका अकरावीच्या विद्यार्थ्याने कळंबोली येथील सुधागड हायस्कूलच्या बाथरूममध्ये स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 15) घडली. शिवम दीपक यादव (17) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो गंभीररीत्या भाजला आहे. त्याला ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. …
Read More »नुकसानग्रस्त शेतकर्यांना तत्काळ मदतनिधी द्यावा
देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांकडे मागणी मुंबई : प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 15) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीची मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी या भेटीदरम्यान फडणवीस यांनी केली. त्यावर राज्यपाल …
Read More »माणगावमध्ये कंपनीत स्फोट : 18 कर्मचारी भाजले; पाच जण गंभीर
माणगाव : माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात क्रिप्टझो कंपनीत शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी स्फोट होऊन लागलेल्या आगीत 18 कर्मचारी भाजले आहेत. जखमींना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. क्रिप्टझो कंपनी फायर ब्रिगेडसाठी आग विझवण्याची सिस्टीम बनविण्याचे काम …
Read More »स्वप्नील सोनावणेची शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड
पनवेल ः वार्ताहर नवीन पनवेल येथील मेनन जिमचा शरीरसौष्ठवपटू स्वप्नील सोनावणे याची डायमंड श्री या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी इंडियन फेडरेशन बॉडी बिल्डिंग संघातून 60 किलो वजन गटात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा औरंगाबाद येथे 16 व 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेकरिता आशिया खंडातील जवळपास सर्व देशांतील खेळाडू …
Read More »वीर वाजेकर कॉलेजचे अॅेथेलॅटिक्समध्ये सुयश
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन अॅथेलॅटिक्स स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळविले आहे. ही स्पर्धा मरीन लाईन्स येथील क्रीडा संकुलात झाली. फुंडे महाविद्यालयातील अमृता महादेव पाटील या विद्यार्थिनीने हॅप्टेथॅलॉन प्रकारात प्रथम क्रमांक मिळवित चॅम्पियन ट्रॉफी पटकाविली. …
Read More »मयांकचे धडाकेबाज द्विशतक
दुसर्या दिवसअखेर भारत 6 बाद 493 धावा इंदूर : वृत्तसंस्था मयांक अग्रवालच्या धडाकेबाज द्विशतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसर्या दिवसअखेर 6 बाद 493 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. त्यानंतर दुसर्या दिवशी 1 बाद 86 या धावसंख्येवरून शुक्रवारी (दि. 15) भारताने डावाला सुरुवात केली होती. …
Read More »राफेल करार योग्यच!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राफेल विमान खरेदीतील निर्णय प्रक्रिया स्पष्ट आहे. त्यात संशयाला कुठलाही वाव नाही. त्यामुळे त्याच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची गरज नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त करीत या विरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. फ्रान्सच्या दसॉल्ट अॅव्हीएशन कंपनीकडून ही विमाने खरेदी करण्याच्या करारात पूर्वीच्या कराराच्या तुलनेत जास्त रक्कम खर्च …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे गोळाफेक, थाळीफेकमध्ये यश
हर्षल शर्माची दुहेरी कामगिरी खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)चा विद्यार्थी हर्षल हेमंत शर्मा (इयत्ता आठवी) याने गोळाफेक आणि थाळीफेक स्पर्धेत यश संपादन केले आहे. त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे. सीबीएसई बोर्डाची राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धा नुकतीच कोल्हापूर येथील संजय घोडावत …
Read More »कर्नाळा बँकेचे चेअरमन विवेक पाटलांनी फसवणूक केली
महाड : प्रतिनिधी आर्थिक संकटात सापडलेल्या कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांनी बुधवारी (दि. 13) बँकेच्या महाड शाखेत जाऊन अधिकार्यांना घेराव घातला आणि आपल्या ठेवी परत देण्याची मागणी केली. जर ठेवी परत दिल्या नाहीत, तर सर्व ग्राहकांना एकत्र करून बँकेविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. ‘आम्ही बँकेच्या सप्टेंबरमधील वार्षिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper