Breaking News

Ramprahar Reporters

भारतीय खेळाडूची बांगलादेशच्या बॅटिंग सल्लागारपदी निवड

मुंबई : प्रतिनिधी बांगलादेशच्या बॅटिंग सल्लागारपदी भारतीय क्रिकेटपटूची निवड झाली आहे. वसीम जाफरची बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मिरपूरमधल्या आपल्या अ‍ॅकेडमीमध्ये बॅटिंग सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने गुरुवारी ही माहिती दिली. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अधिकारी कैसर अहमद म्हणाले, ‘जाफरशी मिरपूरमध्ये बीसीबी अ‍ॅकेडमीचा बॅटिंग सल्लागार म्हणून मेपासून …

Read More »

केदार जाधव फिट!

मुंबई : प्रतिनिधी वर्ल्डकपच्या 12 दिवसाआधी टीम इंडियासाठी एक खूशखबरी आहे. आयपीएलमध्ये दुखापत झालेला भारतीय खेळाडू केदार जाधव आता फिट झाला आहे. टीम इंडियासोबत 22 मेला तो लंडनला जाणार आहे. वर्ल्डकपमध्ये दुखापत झाल्यामुळे तो खेळणार की नाही याबाबत शंका होती. त्यामुळे चौथ्या जागी कोणत्या खेळाडूला खेळवायचं याचा देखील प्रश्न उपस्थित …

Read More »

वर्ल्ड कप विजेत्यांना मिळणार सुमारे 28 कोटी!

दुबई : वृत्तसंस्था क्रिकेट वर्ल्ड कप 2019ला अवघा काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. याआधी आयसीसीने यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या बक्षिसे जाहीर केली आहेत. आयसीसीने ठरवलेल्या बक्षिसामुळे वर्ल्ड कप जिंकणारी आणि उपविजेता टीम मालामाल होणार आहे. आयसीसीने वर्ल्ड कप विजेत्या टीमला 40 लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं आहे. 40 लाख अमेरिकन …

Read More »

नवीन पनवेलमधील भुयारी मार्गाला महावितरणच्या टॉवरचा अडथळा

पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमधून जुन्या पनवेलमध्ये (तक्का) जाण्यासाठी रेल्वेचे सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वास येत असताना त्याला महावितरणच्या टॉवरमुळे अडथळा निर्माण झाला आहे. सदर टॉवर बाजूला करण्यात येईपर्यंत भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करता येणार नसल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांकडून मिळाली आहे. त्यामुळे नवीन पनवेलसह विचुंबे, उसर्ली परिसरातील नागरिकांना वाहतूक …

Read More »

दोन महिन्यांसाठी खोल समुद्रात मासेमारी बंदी

अलिबाग ः प्रतिनिधी  येत्या 1 जून ते 31 जुलै या कालावधीत यंत्रिकी नौकांद्वारे खोल समुद्रात मासेमारी करण्यास शासनाने बंदी घातली आहे. पावसाळ्यात खोल समुद्रात मुसळधार लाटा आणि वारा सुरू असतो, तसेच याच काळात सुरुवातीच्या महिन्यात समुद्री मासे प्रजनन करतात. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांसाठी सागरी किनार्‍यापासून 12 सागरी मैलापर्यंत  खोल …

Read More »

मी जय श्रीराम म्हणणारच, हिंमत असेल तर ममतादीदींनी अटक करावी : शहा

जॉयनगर ः वृत्तसंस्था बंगालमध्ये कुणीही जय श्रीराम म्हणायचे नाही, अशी सक्त ताकीद ममता बॅनर्जी यांनी दिली आहे, मात्र मी जय श्रीराम म्हणणारच. हिंमत असेल तर ममतादीदींनी मला अटक करून दाखवावी, असे थेट आव्हानच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांना दिले आहे. अमित शहा यांच्या सभेला जावेदपूर या ठिकाणी …

Read More »

टंचाईचा सामना करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज

अलिबाग ः प्रतिनिधी दुष्काळाचा सामना करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील गाव तलावांतील गाळ काढणे, विंधन विहिरींची कामेही त्वरित हाती घेऊन पूर्णत्वास न्यावीत, तसेच जलयुक्त शिवाराची कामे मेअखेर पूर्ण करावीत, असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

निवृत्तीच्या प्रश्नावर धोनी काय म्हणाला?

हैदराबाद : वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या सत्रातील जेतेपदाचा मान रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने पटकावला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या चेन्नईला यंदा मुंबईविरुद्ध एकही विजय मिळवता आला नाही आणि अंतिम फेरीतही त्यांनी अपयशाचाच पाढा गिरवला. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या जेतेपदाबरोबरच धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला सुरुवात झाली. सामना संपल्यानंतर धोनीला पुढील आयपीएलमध्ये खेळणार …

Read More »

आयसीसी म्हणतं त्यानं बॉल टॅम्परिंग केलंच नाही

लंडन : वृत्तसंस्था इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसर्‍या वन डे सामन्यात बॉल टॅम्परिंगचा प्रकार घडल्याची चर्चा होती. इंग्लंडचा गोलंदाज लिअ‍ॅम प्लंकेटने चेंडू कुरतडण्याचा आरोप करण्यात आला होता, मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्लंकेटनं असं काहीच चुकीचं केलं नसून त्याला क्लिन चीट दिली आहे. इंग्लंडच्या जोस बटलरने 55 चेंडूंत 9 षटकार …

Read More »

मुंबईचा विजयाचा ‘चौकार’

हैदराबाद : वृत्तसंस्था आयपीएलच्या 12 व्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या एका धावेने पराभव करून आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. हैदराबादच्या रणांगणातल्या या सामन्यात मुंबईने चेन्नईला विजयासाठी 150 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईचा संघ केवळ 148 …

Read More »