मंत्री रवींद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर यांची लाभणार प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले आहे. त्या अनुषंगाने उत्तर रायगड जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 11) सायंकाळी 5 वाजता राज्याचे सार्वजनिक …
Read More »कोपर येथील स्मशानभूमी तोडायला आलेल्या सिडकोच्या पथकाला रोखले
लोकनेते रामशेठ ठाकूर व ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा उलवे नोड : रामप्रहर वृत्त उलवे नोड ः रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील कोपर येथील गावकीची स्मशानभूमी तोडण्यासाठी सिडकोचे पथक गुरुवारी (दि. 9) आले होते, मात्र ही स्मशानभूमी पूर्वापार असून ती तोडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व …
Read More »कर्नाळा बँकेची जप्त केलेली मालमत्ता ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करा
जिल्हाधिकार्यांचे आदेश; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीची दखल अलिबाग : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याकरिता या बँकेच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता प्रशासनाच्या ताब्यात घेण्यासाठीची कायदेशीर कार्यवाही तातडीने सुरू करा, असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी गुरुवारी (दि. 9) संबंधित अधिकार्यांना दिले. कर्नाळा बँकतील …
Read More »पनवेलमध्ये शनिवारी सुरेल ’दिवाळी पहाट’
प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरच्या गाण्यांची मैफिल पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे शनिवारी (दि. 11) पहाटे 5.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. …
Read More »राज्यातील सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन
प्रथम क्रमांकास एक लाख रुपये तर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास 40 हजारांचे बक्षीस पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षिणक, सामाजिक, कला. क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर …
Read More »माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आरपीएल ट्रॉफीचे अनावरण
पनवेल : रामप्रहर वृत्त ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल)च्या सौजन्याने आयोजित करण्यात येणार्या आरपीएल अर्थात रोटरी प्रीमियर लीगच्या ट्रॉफीचे अनावरण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 5) करण्यात आले. आरपीएलचे यंदाचे तिसरे पर्व आहे. ही स्पर्धा 1, 2, 3, 7, 8, 9 डिसेंबर रोजी पनवेल …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे यश ; विचुंबेत शेकापचा दारुण पराभव; न्हावे ग्रामपंचायतही युतीकडे
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने विरोधकांना धूळ चारली आहे. शेकापसह महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत भाजप महायुतीने बाजी मारली. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगडात शांततेत मतदान; सोमवारी मतमोजणी
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 5) 177 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाले. सदस्यपदाच्या 3395 व सरपंचपदाच्या 485 अशा एकूण 3880 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. मतमोजणी सोमवारी (दि. 6) होणार आहे. रायगडात 210 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी 33 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली, …
Read More »आर्थिक फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ करणार्या शेकापच्या पुरुषोत्तम भोईरवर गुन्हा दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्त विचुंबे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील सरपंचपदाचा उमेदवार असलेल्या पुरुषोत्तम भोईर याने जमिनीच्या व्यवहारांमध्ये आर्थिक फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे त्याच्यावर शुक्रवारी रात्री खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणूकप्रकरणी कलम 420 आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही पुरुषोत्तम …
Read More »पनवेलमध्ये अमृत टप्पा 2.0 योजनेंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन
विकासासाठी भाजप कटिबद्ध -परेश ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 3) विकासकामांच्या शुभारंभावेळी केले. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper