Breaking News

Pravin Gaikar

पनवेल मनपा हद्दीतील खाजगी रुग्णालयांचे होणार लेखापरीक्षण

पनवेल : प्रतिनिधी – पब्लिक ट्रस्ट म्हणून नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांना रुग्णांना बिल आकारणीबाबत व रुग्ण सेवेबाबत काही निर्देश दिले आहेत. शासनाच्या आरोग्य विषयक विविध योजना अंतर्गत रुग्णांना लाभ दिले जात असून असे लाभ संबंधित रुग्णास देण्याबाबतही रुग्णालयांवर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. ती जबाबदारी खाजगी रुग्णालये पूर्ण करीत आहेत का नाही …

Read More »

डॉक्टर्स डेनिमित्त डॉक्टरांचा सत्कार

मुरूड ः प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी शोअरने डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून अलिबागमधील मान्यवर डॉक्टरांचा तसेच अलिबाग जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णांची सुश्रुषा करण्यात महत्त्वाचा वाटा असणार्‍या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कामगारांचा सत्कार केला. गेली 40-45 वर्षे अलिबाग व जिल्ह्यातील रुग्णांना अविरत सेवा देणार्‍या फिजिशियन डॉ. जॉर्ज मथाई, …

Read More »

रायगड चाइल्ड लाइनकडून आदिवासींना मदतीचा हात

कर्जत ः बातमीदार – केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या मान्यतेने आणि दिशा केंद्र सामाजिक संस्थेच्या समन्वयाने रायगड जिल्ह्यात कार्यरत रायगड चाइल्ड लाइन 1098 या प्रकल्पाच्या वतीने कर्जत तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. त्या अनुषंगाने बीड (बू)वाडी व खाणीच्या वाडीतील आदिवासी कुटुंबांना धान्याचे वाटप करीत त्यांनी सामाजिक बांधिलकी …

Read More »

माणगाव शहरात जनता कर्फ्यूला नागरिकांचा प्रतिसाद

माणगाव ः प्रतिनिधी – माणगाव नगरपंचायत हद्दीत कोरोना रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीकडे गांभीर्याने लक्ष देत नगरपंचायत हद्दीतील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, व्यापारी तसेच ग्रामस्थांनी एकत्रित येऊन 29 जून ते 3 जुलैपर्यंत जनता कर्फ्यूचा एकमुखी निर्णय घेतला आहे. या जनता कर्फ्यूला सलग चौथ्या दिवशी गुरुवारी नागरिक आणि व्यापार्‍यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या …

Read More »

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कुंडलज वांजळे येथील कुटुंबाला मिळाला न्याय कर्जत ः बातमीदार – बाळंतपणासाठी आलेल्या गरोदर महिलेचे बाळ मृत अवस्थेत जन्मल्यानंतर महिलेला झालेला रक्तस्त्राव रोखण्यात कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर अयशस्वी ठरले होते. त्यात दोघांचे बळी गेल्याने डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली होती. दरम्यान, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला असून दोन महिन्यांनी सदर …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चार दिवसांत आठ अपघात

खोपोली : प्रतिनिधी – कोरोनाचे महाभयानक संकट, त्यादृष्टीने असलेला देशव्यापी लॉकडाऊन काळातही मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वरील वाहनांची गर्दी कमी नाही. येथे दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघातांची मालिकाच थांबता थांबत नसल्याने मदत कार्यात व जखमींवर  उपचारासाठी ही अडचणी निर्माण होत आहेत. रविवारपासून ते बुधवारपर्यंत चार दिवस एक्सप्रेस वे वर दररोज मल्टिपल …

Read More »

‘पंचमवेद’कडून विठूरायाचा ऑनलाइन गजर

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – संगीत व नाट्यक्षेत्रात अग्रगण्य नाव असलेल्या ’पंचमवेद’ या संस्थेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाचा गजर ऑनलाइन पद्धतीने झाला. ’मोगरा फुलला’ या शीर्षकाखाली झालेल्या एका  दृकश्राव्य कार्यक्रमात सहभागी कलाकारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या घरातूनच सादरीकरण केले. पंचमवेद संस्थेचे निर्माता व प्रसिद्ध व्हायोलीनवादक विजय मनोहर यांच्या संकल्पनेतून या …

Read More »

सावरसई येथील कोविड केअर सेंटरची आ. रविशेठ पाटील यांच्याकडून पाहणी

पेण : प्रतिनिधी – पेणमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाच्या वतीने सावरसई आश्रमशाळा येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. यावेळी आमदार रवीशेठ पाटील यांनी सावरसई येथे जाऊन कोविड सेंटरची पाहणी केली. पेण तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून या रुग्णांना पुढील उपचारासाठी अलिबाग, पनवेल मुंबई याठिकाणी न्यावे …

Read More »

भाजपतर्फे खारघरमध्ये डॉक्टर्सचा सत्कार

खारघर : रामप्रहर वृत्त – जागतिक डॉक्टर दिनाच्या निमित्ताने खारघर शहरातील डॉक्टरांनी कोरोना बाधितांसाठी हॉस्पिटलमध्ये करत असलेल्या कामगिरीबद्दल व त्यांच्या सेवेबद्दल आदर व्यक्त करण्यात आला. या वेळी त्यांना प्रमाणपत्र देत सन्मानित करण्यात आले. डॉक्टर सर्वच आहेत परंतु सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या जीवाची तसेच कुटुंबातील सदस्यांची पर्वा न करत आपण घेतलेले …

Read More »

एसबीआयच्या वडखळ शाखेत चोरीचा प्रयत्न

पेण : प्रतिनिधी – वडखळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरट्याचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला आहे. याबाबत माहिती अशी कि, वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत सोमवारी (दि. 29) सायंकाळी 7.15 वाजता ते मंगळवारी (दि. 30) 7.15 वाजण्याच्या दरम्यान  अज्ञात व्यक्तीने बँकेच्या उजवे बाजुला असलेल्या भिंतीचे …

Read More »