स्वतंत्र कोविड हॉस्पिटलसंदर्भात सर्वपक्षीय बैठक खोपोली : प्रतिनिधी – खोपोली नगर परिषद क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. येणार्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर संक्रमण होण्याचा धोका आहे. अशा स्थितीत शहरातील नागरिकांवर शहरातच उपचार होण्यासाठी स्वतंत्र कोविड-19 उपचार रुग्णालय निर्माण होण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात शहरातील डॉक्टर व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार …
Read More »कासाडी नदीत रसायनमिश्रित पाणी
कळंबोली : प्रतिनिधी – तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून सोडण्यात येणार्या विघातक आणि दर्पयुक्त रसायनमिश्रित पाण्याने कासाडी नदीच्या पाण्याला लाल रंग आल्याने परिसरातील नागरिकांत घबराघटीचे वातावरण पसरले आहे. या विभागातील कारखान्याच्या विघातक प्रदुषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांचे जीवन उध्वस्त झाले आहे. संबंधित कारखान्यांवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांतून …
Read More »पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; दोन पोलीस कर्मचारी जखमी
खोपोली : बातमीदार – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाहन ताफ्यातील एक वाहन उलटल्याची घटना सोमवारी (दि. 29) सकाळी मुंबई-पूणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाखाली घडली. अपघातात पोलीस गाडीतील चालकासह एक जण जखमी झाला आहे. शरद पवार सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ त्यांच्या …
Read More »पनवेल तालुक्यात 181 जणांना कोरोनाची लागण
चौघांचा मृत्यू; 68 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 29) कोरोनाचे तब्बल 181 रुग्ण आढळले असून हा आतापर्यंतचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा सर्वात मोठा आकडा आहे. तर दिवसभरात 68 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पनवेल पालिका हद्दीत 131 कोरोनाबाधित …
Read More »राज्य गोंधळात, राज्यकर्ते सुशेगात
महाराष्ट्रातील कमालीच्या गोंधळलेल्या आणि गोंधळ घालणार्या तीन चाकी आघाडी सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’ अशी आंग्ल भाषिक घोषणा करीत अखेर 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी समाजमाध्यमांद्वारे जनतेशी प्रदीर्घ संवाद साधताना कोणतीही ठोस माहिती न दिल्यामुळे सामान्य जनांमधील गोंधळ कायम असून जनतेच्या हालअपेष्टांमध्ये वाढच झाली आहे. अनलॉक …
Read More »वैद्यकीय अधिकार्यांमार्फत ऑनलाईन शंकांचे निरसन
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक चिंतेत आहेत. त्यात केंद्र शासनाच्या सतत बदलणार्या विविध नियमांचव पालिकेला अंमलबजावणी करावी लागत आहे. या नव्या नियमांमुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला असून नागरिकांचे शंका निरसन व्हावे या उद्दिष्टानुसार थेट वैद्यकीय अधिकार्यांनीच नागरिकांचे ऑनलाइन शंकानिरसन केले. स्थानिक माजी नगरसेवक …
Read More »भाजपतर्फे धुतूम गावात जंतुनाशक फवारणी
उरण : वार्ताहर – दिवसेंदिवस उरण तालुक्यात कोरोना संसर्ग प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर नियंत्रण व्हावे, त्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सहकार्याने व भाजप उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील धुतुम गावातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने गावात रविवारी (दि. 28) जंतुनाशक फवारणी करवून घेतली. या कामी …
Read More »कामोठ्यातील मोेकळ्या प्लॉटची साफसफाई
नागरिकांच्या समस्येचे भाजप नगरसेवकांकडून निवारण कामोठे : रामप्रहर वृत्त – कामोठे सेक्टर 34 येथील रिकाम्या प्लॉटवर खड्डे व झाडी, झुडपे वाढली आहेत. त्यामुळे तेथे दुर्गंधी तसेच साप देखील बाहेर येत असतात. परिसरातील सोसायटींच्या पदाधिकार्यांनी या संदर्भात स्थानिक भाजप नगरसेवक विकास घरत व डॉ. अरुणकुमार भगत यांच्याकडे समस्या मांडली. त्यावेळी भाजपच्या …
Read More »नेरूळ-उरण रेल्वेमार्गाचा दुसरा टप्पा रखडला
सिडकोच्या दिरंगाईमुळे करावी लागणार प्रतीक्षा उरण : प्रतिनिधी – नवी मुंबईतील नेरूळ-उरण या सुरू असलेल्या महत्त्वाच्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी वन विभागाकडून सिडकोला तब्बल 50 वर्षांच्या प्रयत्नानंतरही वनखात्याकडून आवश्यक असलेली चार किमी अंतरावरील आवश्यक जागा भुसंपादन करता आलेली नाही. त्यामुळे सुमारे 27 किमी लांबीच्या रेल्वे मार्गावर 50 वर्षात फक्त 12.4 किमी …
Read More »गृहनिर्माण सोसायट्यांमधील थकीत मेंटेनन्सवर व्याजमाफी द्यावी
आमदार निरंजन डावखरे यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी – कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांच्या सदनिकांच्या थकीत मेंटेनन्सवर किमान सहा महिन्यांसाठी व्याज आकारणी करू नये. सोसायटीला तूर्त राखीव निधी खर्च करण्यासाठी राज्याच्या सहकार विभागाने आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे सहकारमंत्री …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper