Breaking News

Pravin Gaikar

लॉकडाऊनचा मार्गच योग्य

भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या विकसनशील देशासाठी हा निर्णय सोपा नव्हता. आर्थिक दृष्टीने पाहिले तर आपण खूप मोठी किंमत मोजली आहे, परंतु देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, हे मोदींनी स्पष्ट केले. गेले काही दिवस ते सातत्याने देशभरातील मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत. परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊनच आपण निवडलेला लॉकडाऊनचा मार्ग योग्यच होता, …

Read More »

कोरानाविरोधातील लढाईत स्वदेस फाऊंडेशनचा पुढाकार

उपयुक्त साहित्य जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द अलिबाग ः जिमाका – स्वदेस फाऊंडेशनच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयाला एक लाख ट्रिपल लेयर मास्क, पाच हजार एन 95 मास्क, दोन हजार 500 पी. पी. ई. किट, दोन थर्मल स्कॅनरचे …

Read More »

कर्जत भाजप तालुकाध्यक्षांकडून धान्यवाटप

कर्जत ः बातमीदार  – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुका भाजप अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी 200हून अधिक गरीब, गरजू तसेच मजूर कुटुंबांना धान्य वाटप केले. या वेळी तालुक्यातील वेगवेगळ्या भागात असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या माध्यमातून गोरगरीब जनतेला मदत करावी, असे आवाहन त्यांनी  केले. पायरमाळ, गणेशनगर, समाधाननगर, चिंचआळी भागातील गरजूंच्या घरी जाऊन त्यांनी …

Read More »

एसटी कर्मचार्यांच्या पगाराचा तिढा सुटला

मुरूड ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी वाहतूक गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने एसटी महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाहतूक सुरू असेल तर आर्थिक स्त्रोत प्राप्त करणार्‍या एसटीला मात्र बंदकाळात कर्मचारी वृंदाचे पगार करणे खूप कठीण जात होते. प्रत्येक महिन्याच्या 1 व 7 तारखेला कर्मचार्‍यांचे पगार होत असत, परंतु …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोहा पोलीस सतर्क

सर्वच प्रवेशद्वारांवर कसून चौकशी ; अन्य यंत्रणाही सोबतीला रोहे ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोहा पोलिसांच्या वतीने गस्त घालणे, वाहनांची कसून चौकशी करणे, विनाकारण फिरणार्‍या गाड्यांवर कारवाई यांसह संचारबंदीच्या काळात शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये सर्वांत जास्त ताण पोलिसांवर …

Read More »

नागरिकांनी घरात राहावे -पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे

मोहोपाडा : प्रतिनिधी – रसायनी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी लॉकडाऊन काळात नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने रसायनी परिसरात कोरोनाची घुसखोरी होवू नये म्हणून रसायनी पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मण रेषेवरील आपटा चेक बुथ, सावले …

Read More »

अनाथ बालिकांना मदतीचा हात

रेवदंडा पोलिसांचा स्तुत्य उपक्रम रेवदंडा ः प्रतिनिधी – कोरोनाच्या संकटकाळात रेवदंडा पोलिसांनी अनाथांचे नाथ बनून कोर्लई आश्रमातील अनाथ बालिकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांना गरजेचे आठ दिवसांचे अन्नधान्य व खाद्यवस्तूंचे वाटप करण्यात आले. रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील मुरूड तालुक्यात कोर्लई येथे शांतीवन बालिका आश्रम आहे. या आश्रमात 30 मुली …

Read More »

उरणमध्ये निर्जंतुक फवारणी

उरण : प्रतिनिधी – कोरोना संसर्ग विषाणूचा वाढत चाललेला  फैलाव रोखण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर  संस्कार फाऊंडेशन, पंचायत समिती उरण आणि तालुक्यातील ग्रामपंचायती यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण उरण तालुक्यात गावागावात निर्जंतुकीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच उरण नगरपरिषदे मार्फत संपूर्ण शहरात निर्जंतुकीकरण केले जात …

Read More »

सिडको देणार शासनाला आर्थिक मदत

पनवेल : बातमीदार – राज्य शासनाला कोरोनाविरोधात लढण्यासाठी श्रीमंत महामंडळ असलेले सिडको महामंडळ आर्थिक मदत करणार आहे. यासाठी टाळेबंदी उठल्यानंतर संचालक मंडळाची तातडीची बैठक घेऊन याबाबत निर्णय होणारआहे. सिडकोच्या तिजोरीत ठेवी रूपात नऊ हजार कोटी रुपयांची रक्कम पडून आहे. पन्नास वर्षांपूर्वी राज्य शासनाने दिलेल्या चार कोटींच्या आर्थिक भाग भांडवलानंतरच सिडको …

Read More »

‘सीएसआर कायदा काँग्रेसच्या काळातला, तरीही लोक राजकारण करताहेत’

मुंबई : प्रतिनिधी – कोरोना संकटाला रोखण्यासाठी राज्य सरकारला योग्य व्यवस्थापन आणि कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सीएसआर फंड हा कायदा काँग्रेस सरकारने तयार केला आहे. काही लोकांना फक्त राजकारण करायचे आहे, म्हणून असे आरोप केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते …

Read More »