कोरोनाचा आता आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर फैलाव होऊ लागला आहे. त्यामुळेच उच्चस्तरावर झालेल्या बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुकूलता दर्शविली. त्याचबरोबर पुढच्या काळात आपल्याला ‘जान भी है और जहान भी है’ तत्त्वावर या संकटात काम करायचे आहे, असा मूलमंत्र दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण …
Read More »पत्रकारांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप
पनवेल : वार्ताहर – सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असले तरी गेल्या 15 दिवसापासून या संदर्भात माहिती घेण्यासाठी महत्वाच्या गोष्टींचे चित्रीकरण करण्यासाठी पत्रकार दिवस रात्र एक करून घराबाहेर आहेत. या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी म्हणून पनवेलमधील सुप्रसिद्ध अशा सामाजिक बांधिलकीमध्ये कार्यरत असणार्या श्री साई नारायणबाबा मंदिराच्या वतीने पत्रकारांच्या आरोग्याच्या …
Read More »मिळेनासा झाला ‘एक घास काऊचा’
पनवेल : वार्ताहर – कावळा असा पक्षी आहे की शहरात असो नाहीतर गावात कावळा सगळीकडे आढळतो. त्यामुळेच लहान मुलांना घास भरवताना प्रत्येक आई एक घास काऊचा, एक घास चिऊचा म्हणत भरवत असते. पण लॉकडाऊनमुळे या काऊलाच घास मिळेनासा झालेले दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे शहरात लॉक डाऊन असल्याने हॉटेल, खाद्य …
Read More »न्हावे ग्रामपंचायतीच्या वतीने 85 ग्रामस्थांना धान्याचे वाटप
उरण : प्रतिनिधी – न्हावे ग्रामपंचायतीच्या वतीने 85 ग्रामस्थांना शनिवारी (दि. 11) न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच जितेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते धान्याचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या संचारबंदी, लॉकडाऊन दरम्यानच्या पार्श्वभूमीवर न्हावा येथील रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलजवळ ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. यामध्ये पाच किलो …
Read More »घरात राहा, सुरक्षित राहा! -रजनी कोळी
उरण : वार्ताहर – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरण तालुक्यात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर उरण शहरातील नागरिकांनी घरात राहा, आणि सुरक्षित राहा, असे आवाहन उरण नगर परिषदेच्या आरोग्य सभापती तथा नगरसेविका रजनी सुनील कोळी यांनी नागरिकांना केले आहे. तसेच रजनी कोळी पुढे म्हणाल्या की, उरण नगर परिषदेकडून कोरोना …
Read More »सोशल डिस्टन्सिंग पाळून कामोठ्यात भाजीवाटप
पनवेल : वार्ताहर – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर, काही नियम आणि अटी शासनाकडून घालण्यात आले आहे. त्यापैकी एक सोशल डिस्टन्सिंग. या सोशल डिस्टन्सिंगमुळे या आजारावर नक्की अंकुश ठेवला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याच नियमाचे पालन करून शनिवारी (दि. 11) कामोठे वसाहतीमधील समाजसेवक सखाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंना …
Read More »उरण येथे तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज
तालुका आरोग्य अधिकार्यांची माहिती; कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणा अहोरात्र कार्यरत उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात कोरोना संसर्गजन्य विषाणूचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा 24 तास अहोरात्र कार्यरत आहेत. उरण तालुक्याची लोकसंख्या लक्षात घेता आणखी तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची आवश्यकता आहे. मागील कित्येक वर्षांपासून येथील आवश्यकतेनुसार रायगड जिल्हा परिषदेकडून उरण तालुक्यासाठी …
Read More »पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजले कर्नाळा अभयारण्य
उरण : प्रतिनिधी – लॉकडाऊन, संचारबंदीदरम्यान घालण्यात आलेल्या बंदीमुळे येथील कर्नाळा अभयारण्यात कधी नव्हे ती निरव शांतता पसरली आहे. या शांततेत अभयारण्यात विविध पक्षांचा मंजुळ आवाजाचा किलबिलाट वाढला आहेच. त्याशिवाय अभयारण्यात क्वचितच पाहायला मिळणार्या आणि सर्वकाळ खाद्यासाठी रस्त्यांवरच ठाण मांडून बसणारे सुमारे 80 टक्के कावळे आणि माकडांनी आता आपला मोर्चा …
Read More »चिमुकलीची गोरगरिबांना मदत
कर्जत ः बातमीदार – कर्जत शहरातील दिनेश कडू यांची कन्या ध्रुवी तिसरीत शिकत असून तिने पालकांनी खाऊसाठी दिलेले पैसे सायकल घेण्यासाठी पिग्मी बँकेत ठेवले होते. ते पैसे या लहानशा मुलीने कोरोनामुळे संकटात सापडलेल्या गोरगरीब जनतेला बिस्किटे घेण्यासाठी खर्च केले आहेत. आपली पिग्मी बँक फोडून ध्रुवी सायकल घेणार होती, मात्र कोरोनामुळे …
Read More »मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनकडून मदतीचा हात
माणगाव ः प्रतिनिधी – कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी माणगावमधील सेवाभावी संघटना मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनकडून अध्यक्ष मौलाना सरफराज जालगावकर, मुस्लिम समाज नेते अस्लमभाई राऊत, इकबाल धनसे, मोर्बा गाव मुस्लिम समाज अध्यक्ष नजीर धनसे यांनी मुस्लिम समाजाच्या पवित्र दिवशी शुक्रवारी (दि. 10) मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता एक लाखाचा धनादेश तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांच्याकडे …
Read More »