Breaking News

Pravin Gaikar

पनवेल परिसरात वाहनचालकांवर वॉच

महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे जाळे पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोली-सायन-पनवेल एक्सप्रेसवर नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवणार्‍या वाहन चालकांना चाप लावण्यासाठी खारघर रेल्वे स्थानक समोरील ओव्हर ब्रिजवर सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तर कळंबोली-गोवा महामार्गावर चार सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही यंत्रणा कार्यान्वित होईल, अशी …

Read More »

काँग्रेस ः बुडते जहाज

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी दोन दिवसांपूर्वी प्राथमिक सदस्यत्वासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. आझाद यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून 48 तास उलटत नाही तोच गांधी घराण्याचे युवराज राहुलबाबांच्या नेतृत्वावर टीका करीत तेलंगणामधील काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते एम. ए. खान यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये चाललंय …

Read More »

गणेशभक्तांच्या निर्विघ्न प्रवासासाठी रायगड पोलीस सज्ज

मुंबई-गोवा महामार्गावर बंदोबस्तात वाढ अलिबाग ः प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्नपणे व्हावा यासाठी रायगड पोलीस सज्ज सज्ज झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. महामार्गावर आठ ठिकाणी अठरा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून प्रवाशांच्या मदतीसाठी 10 मदत केंद्रही स्थापन करण्यात येणार आहेत. बंदोबस्तासाठी सात उपविभागीय …

Read More »

दुर्दैवी युती

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये उभी फूट पाडत 40 आमदारांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षासोबत राज्यात सरकार स्थापन केले. महाराष्ट्रातील या अभूतपूर्व सत्तांतरानंतर गेल्या दोन महिन्यांत शिवसेनेला गळतीच लागलेली पहायला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शुक्रवारी केलेली संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीची घोषणा शिवसेनेचा दुर्दैवी दुबळेपणाच अधोरेखित करते. दादर येथील …

Read More »

दहिवली येथील धाडसी घरफोडी उघडकीस

तीन आरोपी जेरबंद, नऊ लाख 55 हजारांचा मुद्देमाल हस्तगत, रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील गोरेगाव जवळील दहीवली येथील धाडसी घरफोडीचा गुन्हा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे. अलेक्झांडर मरियाराज …

Read More »

 भाजप तर्फे  मुरूडमध्ये गणपती सजावट स्पर्धा

मुरूड : प्रतिनिधी  भाजपच्या मुरुड तालुका युवती मोर्चा तर्फे गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत गणरायाच्या सभोवताली केलेल्या सर्वोत्तम सजावटीस बक्षीस देण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना भाजप  जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. मुरूड शहरातील नागरिकांसाठी ही स्पर्धा असून …

Read More »

नेरळ ग्रामपंचायत मधील अतिरिक्त कामगार कपात करण्याचे जिल्हा परिषदेचे आदेश

कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीमध्ये शंभरहुन अधिक कामगार काम करीत आहेत. शासनाच्या आकृतिबंधानुसार ग्रामपंचायतीमध्ये अतिरिक्त कामगार भरण्यात आले आहेत. या अतिरिक्त कामगारांना कमी करण्यात यावे, असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकार्‍यांनी  नेरळ ग्रामपंचायतीला दिले आहेत. मुंबईचे उपनगर म्हणून नेरळ विकसित होत आहे. शहरीकरणाकडे झुकलेल्या या गावातील नागरी समस्या सोडविण्याचा …

Read More »

नवघर-मानकिवली रस्ता गेला खड्ड्यात

ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यामधील माणकिवली गावातील रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, पावसामुळे रस्त्याला डबक्याचे स्वरूप आले आहे. हा रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. माणकिवली ते नवघर, चिंचवली रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला गेला आहे. या रस्त्याची …

Read More »

कळंबोलीतील भाजपच्या कोरोना लसीकरण शिबिरास प्रतिसाद

कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी (दि. 25)  कोरोना प्रतिबंधात्मक पहिला, दुसरा व बूस्टर डोस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत लसीकरण शिबिरात परिसरातील 122 नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. या वेळी भाजप कलंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ चरू पाटील,  माजी नगरसेवक बबन मुकादम, …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात सामंजस्य करार

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात गुरुवारी (दि. 25) अकाऊन्ट व फायनन्स विभागाच्या वतीने (सत्यम टॅक्स अकाऊंन्ट इन्स्टिट्यूट) मुंबईसोबत (एमओयू) सामजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सत्यम टॅक्स अकाऊन्ट इन्टीटूटचे संदीप मालुसरे हे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे …

Read More »