कर्जत : रामप्रहर वृत्त तालुक्यातील भात पिकांमध्ये खोडकिड्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. भगत यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या पथकाने वदप आणि कुंडलज गावातील शेतावर जाऊन पाहणी केली असता त्यांना भात पिकामध्ये खोडकिड्याची लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी वदप …
Read More »पेणमधील नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी
पेण, अलिबाग : प्रतिनिधी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीसह पुरामुळे पेण तालुक्यात झालेल्या जीवित व आर्थिक नुकसानीची केंद्रीय पथकाने शुक्रवारी (दि. 30) पाहणी करून माहिती जाणून घेतली. या वेळी कणे येथील ग्रामस्थांनी खारभूमी संरक्षक बंधार्याच्या मजबुतीकरणासाठी केंद्र शासनाने विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली. या पथकात चित्तरंजन दास, मिलिंद …
Read More »पावसाने उमेदवार टेन्शनमध्ये…..
नेरळमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीवर आपला झेंडा रोवण्यासाठी जोरदार चुरस दिसून येत आहे, मात्र शुक्रवार सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे आज सकाळी मतदार मतदानासाठी बाहेर निघत नव्हते. त्यामुळे निवडणूक लढविणार्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे, मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने चांगले मतदान झाले. या वेळी पोलीस दलाने चोख …
Read More »धूतपापेश्वर आयोजित आरोग्य शिबिरांना अभूतपूर्व प्रतिसाद
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिनांक 22 ते 25 ऑगस्ट 2019 दरम्यान सिडको एक्झिबिशन सेंटर, नवी मुंबई येथे ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात 1872 पासून शास्त्रोक्त, मानकीकृत सुरक्षित आणि उपयुक्त औषध निर्माण करणार्या श्री धूतपापेश्वर लिमिटेडने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. आयुर्वेदाशी संबंधित …
Read More »डॉ. अनिल पाटील यांचे प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुयश
मोहोपाडा : वार्ताहर रसायनी वाशिवली येथील डॉ. ए. आर. पाटील यांनी ‘रस्ता सुरक्षा अभियान’अंतर्गत आपले जीवन सेवेसाठी राबविण्यात येणार्या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन महाप्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल नवी मुंबई पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन ए. आर. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र …
Read More »तंदुरुस्त भारत अभियानामध्ये सीकेटी महाविद्यालयाचा सक्रीय सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राष्ट्रीय क्रीडा दिनी केलेल्या तंदुरुस्त भारत अभियानामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. देशातील जनतेला तंदुरुस्त राहण्यासाठी चालू झालेल्या या अभियानामध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी …
Read More »रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे सुयश
पनवेल : रामप्रहर वृत्त शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा अधिकारी कार्यालय रायगड आयोजित ‘युवा जागर महाराष्ट्रावर बोलू काही’ राज्यामध्ये युवा संसद या कार्यक्रमाच्या अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धा विद्यालयीन स्तरावर आयोजित केल्या होत्या. या …
Read More »आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल कोळीवाडा येथील जरीमरी मंदिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवारी (दि. 29) करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते आणि नगरसेविका दर्शना भोईर यांच्या …
Read More »सिडको गृहनिर्माण योजनेची पात्रता यादी जाहीर
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको महागृहनिर्माण योजना 2018 च्या अपील प्रक्रियेमधील पात्र व अपात्र अर्जदारांची अंतिम यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र अर्जदारांना सिडकोतर्फे अपिल करण्यासाठी 30 जुलै ते 13 ऑगस्ट 2019 अशी 15 दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार पात्र व अपात्र अर्जदारांची अंतिम यादी …
Read More »रेल्वे पोलिसांनी महिलेची पर्स केली परत
पनवेल : बातमीदार लोकल पकडण्याच्या घाई गडबडीत पनवेल रेल्वे स्थानकावर एका महिलेची पर्स विसरली. पनवेल रेल्वे पोलीस कुलदीप सिंग यांनी बंदोबस्तात असताना पर्स ताब्यात घेऊन पर्सची तपासणी केली असता त्यामध्ये मोबाईल, रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख 10 हजार रुपयांचा ऐवज होता. पोलिसांनी महिलेची पर्स तिच्या नातेवाईकाकडे सुपूर्द …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper