देशात शेतीखालोखाल रोजगाराची संधी बांधकाम क्षेत्रात मिळत असल्याने देशभरातील ग्रामीण भागातील नडलेले, अशिक्षित, गरीब मजूर मोठ्या संख्येने कामाच्या शोधात शहरी भागांकडे स्थलांतर करीत असतात. त्यांची संख्या मोठी असल्यामुळेच त्यांच्या मजुरीच्या दरावरही परिणाम होतो. कामाच्या अनिश्चिततेमुळे व असंघटित असल्याने मिळेल त्या रोजगारावर हे मजूर काम करत राहतात. त्यांच्यासोबत त्यांचा कुटुंबकबिलाही भटक्यांचे …
Read More »पेपरलेस कारभार एक भ्रम…
गेली काही वर्षे आपण पेपरलेसच्या गोष्टी ऐकतोय व त्याच्या गप्पाही मारतोय. संगणकीकरण, डिजिटलायजेशन वगैरेमुळे पेपर्स वापरण्याचे प्रमाण कमी होईल असे खरंच वाटत होते. मलाही बरे वाटले होते. पर्यावरण, झाडे वगैरे वाचतील हा विचार नंतरचा, पण टाईप केलेल्या कागदांचे ओझे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेणे वाचेल म्हणून मला जास्त आनंद होत …
Read More »अमेरिकेने चिंता करू नये!
अमेरिकेचे धार्मिक स्वातंत्र्य या विषयावरचे जे ताजे प्रतिवृत्त प्रसिद्ध झाले आहे, त्यात भारतात धार्मिक अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत, अशी टिप्पणी करण्यात आली आहे. गायीवरून मुसलमानांच्या हत्या होत आहेत. नगरांची मुसलमानी नावे बदलण्यात येत आहेत आणि एकंदरीत मुसलमानांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच होईल अशी धोरणे भारत सरकार राबवत आहे, असे मत व्यक्त करण्यात …
Read More »उलवे नदीच्या परिवर्तीत चॅनलची सिडकोच्या उपाध्यक्षांनी केली पाहणी
सिडको वृत्त – आज (दि. 29) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील उलवे नदीच्या परिवर्तीत चॅनलची सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी पाहणी केली. उलवे नदीच्या 3.2 कि.मी. लांबीच्या परिवर्तित केलेल्या चॅनेलचे कार्यान्वयन कशाप्रकारे होत आहे, याची पाहणी लोकेश चंद्र यांनी यावेळी केली. उलवे नदीचा प्रवाह वळविण्याचे काम …
Read More »जेएनपीटीचा ‘चौकार’; चौथ्यांदा पटकाविला उत्कृष्ट बंदर पुरस्कार
उरण : प्रतिनिधी – देशातील पहिल्या क्रमांकाचे बंदर असलेल्या जेएनपीटीने चौथ्या इंडिया मेरीटाईम पुरस्कार समारंभात या वर्षीचा उत्कृष्ट बंदर पुरस्कार पटकावून मानाचा तुरा शिरपेचात रोवला आहे. या श्रेणीमध्ये देशातील उत्तम बंदरांना नामांकन मिळाले असून, जेएनपीटीने हा पुरस्कार जिंकला. उत्कृष्ट बंदर पुरस्कार श्रेणीमध्ये मालाची हाताळणी, वार्षिक वाढ, विस्तार योजना, नवीन पुढाकार, …
Read More »सर्वांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे; नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांचे आवाहन
उरण : वार्ताहर – आरोग्य निरोगी राखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण सुदृढ राहू, असे प्रतिपादन उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी केले. उरण नगर परिषद आणि लाईफ लाईन हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने …
Read More »कराडे खुर्द ग्रामपंचायतीतील काँग्रेसच्या सदस्यांसह कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश
पनवेल ः रामप्रहर वृत्त – भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार्यांचा ओघ कायम आहे. कराडे खुर्द ग्रामपंचायतीतील काँग्रेसचे नवनिर्वाचीत सदस्य मुकेश पाटील यांच्यासह अनेकांनी काल शनिवारी (दि. 29) पक्ष प्रवेश केला आहे. भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले. हा प्रवेश सोहळा माजी खासदार लोकनेते …
Read More »सिडको वसाहतींमध्ये यांत्रिक झाडू?
स्वयंचलित यंत्राद्वारे रस्ते चकाचक करण्याचे नियोजन पनवेल ः बातमीदार- सिडकोने उभारलेल्या वसाहतींमधील प्रशस्त रस्त्यांची स्वच्छता स्वयंचलित यंत्राद्वारे करण्याचे पनवेल महापालिकेचे नियोजन आहे. यासाठी पालिका आयुक्तांनी नवी मुंबई, पुणे व इतर पालिकांमध्ये होणार्या रस्ते स्वच्छतेचा आढावा घेतला असून दोन यंत्रे घेण्याचा विचार करीत आहेत. या यंत्रांमुळे तासाला 10 किलो मीटरचा रस्ता …
Read More »पर्यावरणप्रेमी योगेश पगडे यांना कासाडी नदीच्या स्वच्छतेसाठी होडी भेट
रसायनी ः वार्ताहर – पर्यावरणप्रेमी योगेश पगडे हा स्वयंप्रेरणेने कासाडी नदीचे पात्र स्वत: मेहनत करून वर्षभर स्वच्छ करीत असतो. स्वतःजवळ होडी व आवश्यक साधनसामग्री नसताना केवळ पर्यावरण संवर्धनासाठी तो हे काम करतो. त्याच्या कार्याची दखल तळोजा पर्यावरण विभागाचे सुनिल भोईर यांनी घेऊन एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीकडे होडीची मागणी केली. …
Read More »पनवेल बार असोसिएशनकडून चव्हाण यांना श्रद्धांजली
पनवेल ः रामप्रहर वृत्त – ज्येष्ठ विधीतज्ज्ञ स्व. ई. ए. चव्हाण यांचे नुकतेच 73व्या वर्षी निधन झाले. पनवेल बार असोसिएशनच्या वतीने येथील बार रुममध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायाधिश रावसाहेब, भााकरे, पाठक, मुजावर, स्वामी तसेच बार असोसिएशानचे अध्यक्ष मनोज भुजबळ व अन्य वकील उपस्थित होते. यावेळी ई. ए. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper