अलिबाग : प्रतिनिधी शहरातील ब्राम्हण आळीमधील दत्त मंदिराजवळील लक्ष्मीव्हीला इमारतीमधील एका निवासी सदनिकेमध्ये रविवारी (दि. 26) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत सदनिकेतील साहित्य जवळून खाक झाले. सुदैवाने घरी कोणी नसल्याने जीवितहानी टळली. आगीचे वृत्त समजताच अलिबाग नगरपालिकेचे बंब आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. तत्पुर्वी लक्ष्मीव्हीला …
Read More »सहा कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त
एका महिलेसह सहा जणांना अटक माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कडापूर गावाच्या हद्दीत माणगाव पोलिसांनी शनिवारी (दि. 25) दुपारी सुमारे पाच कोटी 80 लाख रुपये किमतीची पाच किलो 800 ग्राम वजनाची व्हेल माशाची उलटी हस्तगत केली असून, या प्रकरणी एका महिलेसह सहाजणांना सापळा रचून पकडले आहे. …
Read More »पनवेल मनपाकडून खारघरमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
पनवेल : वार्ताहर खारघरमधील सेक्टर 34, 35, 36, 37मध्ये शुक्रवारी (दि. 24) अनधिकृत ढाबे, गाड्या सर्व्हिसींग दुकाने, झोपड्या, भंगार दुकाने यांच्यावरती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली. दुपारी 4 वाजेपर्यंत चार भंगार दुकाने, एक गाडी सर्व्हिसिंग दुकान, पाच झोपड्या, तीन ढाबे अशी एकुण 13 अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई …
Read More »हरकती-सूचनांच्या सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचना होणार जाहीर
पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिकेच्या होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचना आराखड्यावर अवघ्या 33 हरकती आल्या आहेत. महापालिकेच्या दुसर्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा आराखडा 13 जून रोजी जाहीर करण्यात आला. हरकती-सूचनांच्या सुनावणीनंतर प्रभाग रचना अंतिम केल्या जाणार आहेत, अशी माहिती उपायुक्त विठ्ठल डाके यांनी दिली आहे. पनवेल महापालिकेच्या …
Read More »कळंबोलीत होणार सुरळीत पाणीपुरवठा
जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात कळंबोली : बातमीदार कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 4 मधील काही सोसायट्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत येथील नगरसेवक बबन मुकादम यांनी सिडको व महापालिकेकडे पाठपुरावा केल्याने सहा इंच व्यासाची जलवाहिनी टाकून पाण्याचा पुरवठा करण्यासाठी काम सुरू केले आहे. …
Read More »ज्येष्ठ पत्रकार अशोक जालनावाला यांना आदरांजली
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ठाणे व रायगड जिह्यातील पत्रकारिता क्षेत्रात दादा म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय अशोक जालनावाला यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त गुरुवारी (दि. 23) वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात त्यांना आदरांजली वाहण्यासाठी स्वर सुमनांजलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहताना त्यांच्या पत्रकारितेतील कार्यकर्तृत्वाला उजाळा …
Read More »वाचनाने माणूस समृद्ध होतो
-रोहिदास पोटे, कवी/गझलकार/समीक्षक तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही काय करता? म्हणजे आपण वाचू लागलो आणि वाचत राहिलो तर आपल्या अस्तित्त्वामध्ये कोणते बदल होतात? एक तर, तुमची आतली कवाडं उघडलेली असतात. ही कवाडं बाहेरून आत उघडणारी-स्वागतशील अशी असतात. बाहेरून काहीतरी त्या दरवाजाने आत, मेंदूपर्यंत, मनापर्यंत-कदाचित आत्म्यापर्यंत येऊ शकतं. आता ही आत येणारी …
Read More »दीर्घ लढाईची तयारी
शहर, गावे व खेड्यांमधले मतदार राजकीय पक्षाचे उमेदवार निवडून देतात, त्याचेच पुढे विधिमंडळ पक्षात रूपांतर होते. संसदीय लोकशाहीच्या लेखी हा विधिमंडळ पक्षच महत्त्वाचा असतो. आजतरी तो पक्ष एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे. भावनिक राजकारण करून इथे काहीही साध्य होण्यासारखे नाही याची जाणीव शिवसेनेतील सुजाण नेत्यांना असेलच. भावनेचे राजकारण करून एक …
Read More »नवी मुंबईतील 64 हजार 999 बालकांनी घेतला पोलिओचा डोस
नवी मुंबई : बातमीदार पालिका आरोग्य विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 19) उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम महानगरपालिका क्षेत्रात प्रभावी रितीने राबविण्यात आली. नवी मुंबई महापालिकेच्या 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो, महत्वाचे नाके अशा …
Read More »गव्हाण विद्यालयाच्या सुनील गावंड यांची मुख्याध्यापकपदी बढती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजचे उपशिक्षक सुनील गावंड यांची बढतीने संस्थेच्या दक्षिण विभागातील म्हाप्रळ, (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथे मुख्याध्यापकपदी बढती झाली आहे. याबद्दल त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper