Breaking News

Pravin Gaikar

उमंग संस्थेला सोलर सिस्टीम भेट

कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथे वर्ल्ड चिल्ड्रेन वेल्फेअर ट्रस्टची उमंग ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेकडून गेल्या 10 वर्षांपासून मूकबधिर व अनाथांचा सांभाळ करून त्यांना सक्षम करण्यासाठी शिकवण दिली जाते. संस्थेचे विश्वस्त कृष्णन रामानुजम यांच्या प्रयत्नाने व एल्कॅम साऊथ आशिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने उमंग …

Read More »

पेणमध्ये रक्तदान शिबिर

पेण : प्रतिनिधी शिवजयंतीचे औचित्य साधून येथील सिद्धेश्वर मित्र मंडळाने पेणमधील महात्मा गांधी वाचनालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात एकूण 77 तरुणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक समीर म्हात्रे, वाचनालयाचे अरविंद वनगे, शिवसंग्राम पक्षाचे तालुका अध्यक्ष आप्पा सत्वे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मंडळाचे कार्यकर्ते जयेश म्हात्रे यांनी …

Read More »

नवमतदारांनी नाव नोंदणी करून घ्यावी

तहसीलदार अजय पाटणे यांचे आवाहन पेण : प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन पेण तहसीलदार अजय पाटणे यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 23-24 फेब्रुवारी रोजी दोन दिवस विशेष नावनोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या वेळी मतदार यादीत नाव …

Read More »

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे चित्ररथाद्वारे जिल्ह्यामध्ये प्रसारण

अलिबाग : जिमाका सामाजिक न्याय विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत योजनांच्या संदेशाचे प्रसारण जिल्ह्यामध्ये चित्ररथाद्वारे करण्याच्या कामाचा शुभारंभ बुधवारी (दि. 20) जात प्रमाणपत्र पडताळणी विभागाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना ह्या मागासवर्गीय घटकांच्या कल्याणासाठी …

Read More »

दहशतवादी हल्ल्याचा निषेध सुरूच

नेरळमध्ये पाकिस्तानी झेंड्याचे दहन कर्जत : पुलवामामधील हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी नेरळकर शनिवारी रस्त्यावर उतरले. शहरातील शिवाजी महाराज चौकात सर्व जातीधर्माचे लोक आणि देशप्रेमी नागरिकांनी पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी गर्दी केली होती.शिवसेना शाखेमधून कॅण्डल मार्च काढून शिवसैनिक शिवाजी महाराज चौकात पोहचले. त्यानंतर तेथे अनेक …

Read More »

वाकण हद्दीत पाणी साठवण टाक्यांचे लोकार्पण

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील वाकण ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मुरावाडी आणि धामणीचीवाडी येथे उभारण्यात आलेल्या पाणी साठवण टाक्यांचे  लोकार्पण आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कुंभळवणे ते मुरेवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, युवा सेना अधिकारी संजय कळंबे, उपसरपंच तानाजी जाधव, विभागप्रमुख …

Read More »

गोमांसाची वाहतूक करणार्या दोघांना अटक

मुरुड : प्रतिनिधी मोटारसायकलवरून गोमांस विकण्यासाठी चाललेल्या विहूर येथील एका इसमास मुरुड पोलिसांनी बुधवारी (दि. 20) अटक केली असून, त्याने दिलेल्या माहितीवरून त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. मनानं पांगारकर असे अटक केलेल्या इसमाचे नाव असून, जावेद वाळवटकर असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे. या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

दिघाटी (ता. पनवेल) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी सरपंच अमित पाटील, शिवसेना शाखाप्रमुख कमलाकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य स्मिता ठाकूर, शिवसेना कार्यकर्ता लक्ष्मण ठाकूर, भाजप कार्यकर्ता राजेश ठाकूर, नारायण ठाकूर, भाजप बुथ कमिटी सदस्य सुबोध ठाकूर, नरेंद्र पाटील, संगम गावंड, मयूर ठाकूर, …

Read More »

105 वर्षीय वृद्धावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

पनवेल : बातमीदार पनवेलच्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटमध्ये बिहारमधील 105 वर्षीय व्यक्तीवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. इतक्या वर्षांच्या वयोवृद्धावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करणे ही बाब दुर्मिळ असून, ती घटना पहिलीच असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बिहारमधील पाटणा विधानसभा मतदारसंघातून 1962 आणि 1967मध्ये आमदार झालेले बद्री राम महारा त्यांच्या पणतूसोबत …

Read More »

कारच्या धडकेत तिघे जखमी

पनवेल : बातमीदार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एका भरधाव कारने दुसर्‍या कारला दिलेल्या धडकेत आरोपीसह अन्य दोघे जखमी झाले आहेत. अतुल प्रदीप एप्तवाल (22, हरियाना), अकुलसिंग धर्मेंद्र सिंग गोत खुब्बड (18, हरियाना) अशी जखमींची नावे आहेत. यात चालक अमन चौधरीही जखमी झाले आहेत.अमन हरदीपसिंग चौधरी हा आपली ब्रिजा कार (एचआर 85-8761) …

Read More »