Breaking News

Pravin Gaikar

विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देणार्‍या एलएईएस शाळेची मान्यता रद्द करावी

सम्यक विद्यार्थी परिषदेची मागणी कर्जत : बातमीदार शाळेची फी न भरल्यामुळे एलएइएस शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणार्‍या नेरळ येथील एलएइएस शाळेवर कारवाई करावी आणि त्यांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. कैलास मोरे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. कोविड …

Read More »

महाड, कर्जत, रोह्यात भाजपचा विजयी जल्लोष

महाड : प्रतिनिधी चार राज्यांतील विजयानंतर देशभरात भाजपचा विजयी जल्लोष होत असताना, महाडमध्येदेखील भाजपने विजयी जल्लोष साजरा केला. भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा विधानसभा …

Read More »

विधवा महिलांना मिळवून दिले आर्थिक सहाय्य

भाजपच्या शर्मिला सत्वेंची सामाजिक बांधिलकी माणगाव : प्रतिनिधी भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा शर्मिला सत्वे यांच्या प्रयत्नाने माणगाव तालुक्यातील ज्योती महादेव खाडे (रा. बामणोली), सावित्री रोंगु काटकर (रा. खांदाड)  पार्वती चंदर हिलम या विधवा महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून प्रत्येकी 20 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळाले आहे. या महिलांना जिल्हाधिकारी …

Read More »

महाडमध्ये आढळल्या एकच नंबरच्या 500 रुपयांच्या दोन नोटा

महाड : प्रतिनिधी शहरामधील दोन दुकानांमधून एकाच नंबरच्या पाचशे रुपयांच्या दोन नोटा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या छबिना उत्सवात बनावट नोटांचा वापर झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे. महाडमधील एका हॉटेल व्यावसायिकाकडे आलेली पाचशे रुपयाची नोट बनावट असल्याचा संशय आल्याने तो समोरच असलेल्या एका पानटपरीवर नोट दाखवण्यास …

Read More »

खांदा कॉलनीत बांधले अनधिकृत मंदिर

पनवेल ः प्रतिनिधी महापालिका हद्दीतील खांदा कॉलनीत सेक्टर 9 मध्ये  शिवसेना शाखेच्या बाजूला दोन दिवसांच्या सुट्टीचा फायदा घेऊन अनधिकृत मंदिर बांधल्याची तक्रार नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे केली आहे. खांदा कॉलनीत सेक्टर 9 मध्ये रेल्वे लाईनलगत शिवसेना शाखेचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाजूला शनिवार- रविवार सुट्टीच्या दिवशी कोणाच्या …

Read More »

मच्छीमार संस्थांना 100 टक्के डिझेल परतावा द्यावा

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची शासनाकडे मागणी तारांकित प्रश्नाद्वारे वेधले शासनाचे लक्ष पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्त राज्यातील 160 मच्छीमार सहकारी संस्थामधील 9,646 यांत्रिकी नौकांना शासनाकडून मंजूर करण्यात येत असलेल्या डिझेल कोट्यामधील खर्चाच्या परताव्याची 186 कोटी थकीत रक्कम मच्छिमारांना उपलब्ध करून दिली नसल्याचे निदर्शनास असून त्यांना तसेच …

Read More »

खोट्या तक्रारींचा शिमगा

गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील राजकारण आरोप-प्रत्यारोपांच्या शिमग्याने ढवळून निघाले आहे. राजकीय प्रगल्भता आणि सुसंस्कृतपणासाठी हा महाराष्ट्र एकेकाळी प्रसिद्ध होता, यावर आता कोणाचाही विश्वास बसणार नाही. हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र आहे, याचा विसर पडू देऊ नका, अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी दिल्या होत्या. पण त्यांच्याच महाविकास आघाडीतील …

Read More »

खारघर येथे महिलांसाठी भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त 5 ते 9 मार्च दरम्यान सेक्टर 12, गावदेवी मैदानावर महिला बचतगट वैयक्तिक महिला उद्योजिकांच्या माध्यमातून विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी …

Read More »

भाजपचे कार्य वंचित घटकांपर्यंत पोहचवा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे पदाधिकार्‍यांना आवाहन भटके-विमुक्त आघाडीच्या महिला पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र पनवेल ः वार्ताहर उत्तर रायगडमधील भटके-विमुक्त आघाडीच्या महिला पदाधिकार्‍यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 6) नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांना भारतीय जनता पक्षाचे कार्य प्रत्येक वंचित घटकांपपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. या वेळी भाजपा भटके-विमुक्त …

Read More »

पनवेल तालुक्यात 91 कुष्ठरुग्ण झाले बरे

2021 मध्ये 178 पैकी 64 रुग्णांवर उपचार सुरू पनवेल ः वार्ताहर कुष्ठरुग्ण इतर रोगांपेक्षा थोडा वेगळा असला, तरी लवकर निदान आणि योग्य उपाययोजना करून रोग बरा करणे शक्य आहे. यासाठी शासन स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. 2021 मध्ये पनवेल तालुक्यात आरोग्य विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 178 कुष्ठरुग्ण …

Read More »