Breaking News

Pravin Gaikar

कामोठ्यातील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याची मागणी

कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठ्यामधील सर्व रस्त्यांवरील गतिरोधकांवर काळे पांढरे पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी भाजप भटके विमुक्त सेलच्या उत्तर रायगड महिला जिल्हाध्यक्ष विद्या तामखडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सिडकोच्या कामोठे येथील कार्यकारी अभियंता बाबूराव रामोड यांना निवेदन दिले आहे. कामोठ्यातील गतिरोधकावर पट्टे नाहीत. त्यामुळे समोर गतिरोधक आहे हे …

Read More »

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पनवेल मनपातर्फे विविध कार्यक्रम

पनवेल : प्रतिनिधी महापालिकेच्या निवडणूक विभागाच्यावतीने मंगळवारी (दि. 25) राष्ट्रीय मतदार दिन निमित्ताने मतदार अधिकार, कर्तव्य व निवडणूक याविषयी जाणीव, जनजागृती निर्माण करण्यासाठी, तसेच लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबधीत प्रतिज्ञा शपथ घेण्याचा कार्यक्रम व नियमितपणे मतदानाचा हक्क बजावणार्‍या युवा व ज्येष्ठ मतदारांचा सन्मान कार्यक्रम पालिका मुख्यालय, कामोठे, खारघर, कळंबोली, पनवेल येथे घेण्यात …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

सिद्धार्थ आणि ओमचे मान्यवरांकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी चकमदार कामगिरी करून भारतीय संघात उत्तुंग झेप घेतली आहे. सिद्धार्थ मिश्रा आणि ओम झावरे यांची बॉक्स लंगडी या खेळामध्ये भारतीय संघात राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. या खेळाडूंचे आणि त्यांच्या …

Read More »

एनएमएमटीमुळे रिक्षाव्यवसाय तोट्यात

नेरे येथून बसफेर्‍या कमी करण्याची चालकांची मागणी भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केली अधिकार्‍यांशी चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्त नेरे येथून एनएमएमटी बसेसच्या फेर्‍या कमी करण्यात याव्या, जेणेकरून येथील रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही. या मागणीसंदर्भात भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आसुडगाव येथील एनएमएमटी डेपोच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. नेरे …

Read More »

भांडवल वृद्धीसाठी नेमके काय केले पाहिजे?

-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com मागील तेवीस वर्षांत, व्यवसायाच्या निमित्तानं अनेक लोकांशी व्यवसायिक संबंध आले. अनेक लोकांचं संपत्ती व्यवस्थापन करताना काही गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या त्याच आज लेखाच्या स्वरूपात मांडत आहे. कमावलेली संपत्ती म्हणजे वेल्थ असं गृहीत धरल्यास त्यात त्या मालकाच्या बाजूनं अनेक पैलू येतात. ज्या गोष्टींना सर्वसामान्य लोक ’खर्च’ असं संबोधतात …

Read More »

भारताला नव्या संधी प्रदान करणारा ‘प्रजासत्ताक’

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com प्रजासत्ताक दिन दरवर्षी येत असला तरी तो प्रत्येकवर्षी वेगळा असतो. तो अनेक आव्हाने घेऊन येतो तसेच अनेक संधींची पेरणी करून जातो. कोरोना साथीने जगासमोर उभे केलेले आव्हान आणि त्यातून भारताला अनेक क्षेत्रात मिळत असलेली संधी, ही काळ्या ढगांना असलेली सोनेरी किनार आहे. अर्थात, तिचे महत्त्व देशातील प्रत्येक …

Read More »

पनवेल प्रभाग क्रमांक 19मध्ये राबविली स्वच्छता मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 21) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका क्षेत्रात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. यासोबतच स्वच्छ सर्वेक्षण 2022मध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून चांगले काम करून स्वच्छ पनवेल …

Read More »

पनवेल महापालिका हद्दीतही सर्व शाळा 24 जानेवारीपासून सुरू

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचे वर्ग 24 जानेवारीपासून सुरक्षितपणे सुरू होणार आहेत. यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 21) काढला असल्याने पनवेल महापालिका हद्दीतील सर्व शाळांची घंटा 24 जानेवारीला वाजणार आहे. पनवेल महापालिका हद्दीत कोरोना …

Read More »

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा

भाजप वाहतुक सेलची तक्रार पोलादपूर : प्रतिनिधी मुंबइ-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक करताना फेरीवाल्यांचा अडथळा होत असल्याची तक्रार भाजप वाहतूक सेल पोलादपूर तालुका प्रमुख विश्वास नलावडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलादपूर नगर पंचायतीमध्ये भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन ही लेखी तक्रार सादर केली आहे. पोलादपूर शहरातून अंडरपास जाणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय …

Read More »

मोहोपाडा परिसरात कोरोनाचा वेगाने फैलाव

मोहोपाडा : प्रतिनिधी नव्या वर्षात वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद विभागात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रानचा शिरकाव आणि परिसरात झपाट्याने वाढू लागलेली कोरोना रुग्णसंख्या नागरिकांसमोर संकट बनले आहे. अनेकांनी कोरोना आजारावर यशस्वी मात केली आहे. तरीही सध्या वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद विभागात मिळालेल्या आकडेवारीवरून …

Read More »