Breaking News

Pravin Gaikar

‘नवलाईफ जेनेरिक्स’च्या आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे येथे नवलाईफ जेनेरिक्स व डॉक्टर राहूल वडके क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने तर शर्मिला एस. यांच्यातर्फे रविवारी (दि.13) आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबिरात रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, वजन, उंच अशा प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा परिसरातील …

Read More »

सी-लिंकबाधित मच्छीमारांच्या हाती पुन्हा निराशाच

नुकसानभरपाई देण्याबाबतच्या दुसर्‍या बैठकीतही निर्णय नाही उरण : प्रतिनिधी न्हावा-शिवडी सी-लिंकमुळे बाधित झालेल्या न्हावा गावातील 789 मच्छीमारांच्या नुकसान भरपाईच्या मुद्यावर सोमवारी (दि. 14) बोलवण्यात आली होती, मात्र या बैठकीतही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आणखी 15 एप्रिलपर्यंत मुदत मागितली आहे. न्हावा ग्रामपंचायतीच्या …

Read More »

कामोठ्यातील पाणीप्रश्नी भाजप आक्रमक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडकोवर काढणार मोर्चा पनवेल ः वार्ताहर कामोठे वसाहतीला कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने तेथील रहिवाशी संतप्त झाले आहेत. या पाणी प्रश्नावरून सोमवारी (दि.14) भाजप नगरसेवक विजय घरत, विजय चिपळेकर व सहकारी कामोठे वसाहतीमधील सिडको कार्यालयात आक्रमक झाले. पाण्याचा प्रश्न तातडीने न सोडवल्यास आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

पनवेलमध्ये होळीसाठी शेणींना मोठ्या प्रमाणात मागणी

कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर येणार पहिलाच सण होळीचा आहे. पनवेलमध्ये होळीमध्ये जाळण्यासाठी लाकडाबरोबरच लागणार्‍या शेणींना मोठ्या प्रमाणात मागणी आली असल्याची माहिती करंजाडे येथील तबेल्याचे मालक भरवाड कुटुंबियांनी दिली. त्यामुळे झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा हा उद्देश या वेळी साध्य होताना दिसत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा …

Read More »

भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष विनोद घरत यांच्याकडून विद्यार्थ्यांना वह्या वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचे आदेश दिले.जि. प. च्या इनामपुरी गावातील शालेय गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व बिस्किटांचे वाटप भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष विनोद घरत यांच्या माध्यमातून करण्यात आले. मागील दोन वर्षांपासून कोरोना संक्रमण काळात देशातील सर्व शाळा बंद होत्या. …

Read More »

ग्रेस फुल हँड्स संस्थेतर्फे महिला दिन उत्साहात

पनवेल ः वार्ताहर ग्रेस फुल हँड्स सामाजिक संस्थेतर्फे महिला दिन शनिवारी (दि. 12) रोजी खांदा कॉलनी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास श्वेेता शेट्टी, स्मिता चतुर्वेदी, मानसी ठक्कर, डॉ. मेघना जाधव, सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आणि कोरिओग्राफर निधी प्रभू व त्यांच्या विद्यार्थिनी प्रज्ञा पेंडसे, शीतल गायकवाड, प्रेमा भोपी, डॉ. शेलार, …

Read More »

पमपाकडून मालमत्ता करावर पाच टक्के सवलत

ऑनलाइन कर भरल्यास मिळणार दोन टक्के वाढीव सूट पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील मालमत्तधारकांना आता 31 मार्चपर्यंत मालमत्ता करावर पाच टक्के सूट देण्यात येणार असून ऑनलाइन कर भरल्यास वाढीव दोन टक्के सूटही देण्यात येणार आहे. यासाठी संगणक प्रणाली विकसित करून देण्यात आली असून या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन …

Read More »

राज्य सरकार बलात्कार्‍यांना पाठीशी घालतेय

भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप कामोठ्यात महिला दिन कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती पनवेल ः वार्ताहर ज्या मुलींना न्याय मिळत नाही, अशा मुलींना आत्महत्या करावी लागते, या गोष्टीची लाज वाटते. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांविरोधात बलात्काराचे गुन्हे दाखल होऊनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे हे सरकार बलात्कार्‍यांना पाठीशी घालते, …

Read More »

कळसूत्री आणि पंचसूत्री

कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रीभूत मानून महाराष्ट्राचा तथाकथित विकास गतिमान करणारा यंदाचा अर्थसंकल्प शुक्रवारी विधिमंडळात सादर करण्यात आला. विकासाची ही पंचसूत्री आहे, असे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितले. अर्थसंकल्पाचे अवघे वर्णन लक्षवेधी आणि आश्वासक वाटत असले तरी प्रत्यक्षात हा एक पोकळ …

Read More »

गावठी कट्टा विक्रीस घेऊन जाणार्‍या त्रिकुटाला अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कर्जत येथे कारवाई अलिबाग, नेरळ : प्रतिनिधी, बातमीदार गावठी कट्टा विक्रीस घेऊन जाणार्‍या कर्जतमधील तीन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे. रवींद्र आनंद वैद्य (वय 35), सौरभ सुनील नवले (वय 26), सुनील त्र्यंबक वाठोरे (वय 36, सर्व रा. कर्जत) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची …

Read More »