अलिबाग : प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जे नागरिक मतदार यादीत आपले नाव नोंदवू शकले नाहीत त्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. 23 व 24 फेब्रुवारी असे दोन दिवस मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व 2693 मतदार केंद्रांवर या …
Read More »भाजपच्या उमेदवारांना विजयी करा
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन कडाव : प्रतिनिधी मागील अनेक वर्ष विकासापासून वंचित असलेल्या गावखेड्यासह आदिवासी वाड्यांचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे. येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपप्रणीत आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले. कर्जत तालुक्यातील किरवली व …
Read More »विषारी दारूमुळे 17 जणांचा मृत्यू
गुवाहाटी ः वृत्तसंस्था आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (21 फेब्रुवारी) दारू प्यायल्यानंतर काही जण आजारी पडले होते. दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने गोलाघाट येथील शहीद कुशल कंवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषारी दारू प्यायल्याने 21 …
Read More »धास्तावलेल्या पाकची बचावासाठी भागमभाग!
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जास्तीत जास्त रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी सज्ज राहा. काही जागा सैनिकांसाठी राखीव ठेवा. जखमी सैनिकांचे वेळीच उपचार होतील याची काळजी घ्या, अशा आशयाची पत्रं पाकिस्तान लष्करानं देशभरातील सर्व रुग्णालयांना लिहिली आहेत. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर राहणार्या नागरिकांना दक्षता बाळगण्याचा इशाराही दिला आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध …
Read More »राज्य सरकारकडून शेतकर्यांसाठी 4,500 कोटींची तरतूद?
मुंबई ः प्रतिनिधी दुष्काळ, नापिकी, तसेच आर्थिक गर्तेत अडकलेल्या राज्यभरातील शेतकर्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने दिलासा दिल्यानंतर आता राज्यातील भाजप सरकारनेही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत शेतकर्यांसाठी नवी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजने’साठी पात्र नसलेल्या शेतकर्यांसाठी ही …
Read More »ज्येष्ठांतर्फे शिवजयंती, वर्धापन दिन साजरा
पनवेल : वार्ताहर भारतीय धनगर परिषद व अमोल ज्येष्ठ नागरिक सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी येथील अमोल ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात शिवजयंती व विरंगुळा केंद्राचा वर्धापन दिन थाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दलित-मित्र श्रीरंग वळकुंडे होते. ते आपल्या भाषणात म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांच्या …
Read More »यूईएस स्कूलमध्ये शिवजयंती साजरी
उरण : वार्ताहर येथील यूईएस स्कूल अॅण्ड कॉलेजमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विमला तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याजवळ विद्यार्थी व पालकगण पारंपरिक वेषभूषेत जमले होते. यूईएस संस्थेच्या विश्वस्त, पदाधिकार्यांनी शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ढोल-ताशा व लेझीमच्या लयबद्ध वाद्यवृंदासह शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक …
Read More »अभिनेता सलमान खान बिईंग ह्युमन ट्रस्टच्या वतीने मदतीचा धनादेश
पनवेल : अभिनेता सलमान खान बिईंग ह्युमन ट्रस्टच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून संदीप टेमकर यांना वैद्यकीय उपचारार्थ 20 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. टेमकर हे नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार घेत असल्याने मदतीचा धनादेश नगरसेवक राजू सोनी यांनी भाजप शहर उपाध्यक्ष भीमराव पोवार यांच्याकडे सुपूर्द केला.
Read More »उसर्ली पेस सेंटर येथे प्रमाणपत्र वितरण
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील उसर्ली येथील प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन पेस सेंटरमध्ये इलेक्ट्रिकल व ऑटोमोटिव्ह या कौशल्य विकासाचे प्रशिक्षण पूर्ण करणार्या युवक-युवतींना नुकतेच प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. पेस सेंटरमध्ये दोन कोर्सचे निवासी प्रशिक्षण दिले जाते. या कोर्ससाठी होल्टास कंपनी सहकार्य करीत आहे. यामध्ये केवळ प्रशिक्षण न देता त्यांना नोकरीसाठी सहकार्य …
Read More »कर्नाळा किल्ल्यावर अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका
पनवेल : बातमीदार कर्नाळा किल्ल्यावर अडकून पडलेल्या चौघांना तालुका पोलीस, वन विभाग आणि निसर्ग मित्र सह्याद्री प्रतिष्ठान ट्रेकर्सच्या मदतीने सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे. हे चौघेही एका कार्यालयात काम करीत होते. बापू चव्हाण (कामोठे), सायली जाधव (ऐरोली), श्रुती कदम (मुंबई सेंट्रल), कीर्ती पुरोहित (खारघर) अशी या चौघांची नावे आहेत. कर्नाळा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper