Breaking News

Monthly Archives: June 2019

जलयुक्त शिवारचा मुख्य हेतू असफल

कर्जत तालुक्यात यावर्षी जलयुक्त शिवार अभियानाचा हेतू असफल झालेला दिसून येत आहे. तालुक्यातील आठ गावात जलयुक्त शिवार अभियानचे माध्यमातून जलसंधारणाच्या नावाखाली कामे झाली आहेत. मात्र जलसंधारण म्हणजे शेत तयार करणे नाही त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश बाजूला पडला असून गतवर्षी खुद्द या तालुक्याचे आमदार सुरेश लाड यांनी जलयुक्त शिवारवर …

Read More »

ममता-डॉक्टर संघर्ष सुरूच

डॉक्टरांवर हल्ला करणार्‍या व्यक्तींवर ठोस कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतली आहे. नेमक्या याच बाबतीत ममता बॅनर्जी कमी पडल्या. हल्ल्याने संतप्त झालेल्या डॉक्टरांना चुचकारण्याऐवजी त्यांनी संपाबद्दल डॉक्टरांनाच फैलावर घेतले. वरचेवर संपाचे हत्यार उगारणार्‍या डॉक्टरांमुळे सर्वसामान्य जनता भरडली जाते हे वास्तव कुणीही नाकारणार नाही. परंतु या समस्येकडे …

Read More »

उरण येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात

उरण : वार्ताहर उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी (दि. 16) रायगड जिल्ह्यात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या चार तालुक्यांत राबविण्यात आली. उरण शहरात 13 ठिकाणी पल्स पोलिओ बुथवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत या केंद्रावर उरण येथे बालकांना पोलिओ …

Read More »

काळुंद्रे पूल वाहतुकीस खुला ; ओएनजीसीजवळील वाहतूक कोंडी सुटणार

खारघर : प्रतिनिधी सायन पनवेल महामार्गावरील काळुंद्रे येथील नव्या पुलाचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते. या ठिकाणी असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरूनच दोन्ही मार्गाची वाहतूक सुरू होती. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागत होत्या. मागील वर्षभरापासून या ठिकाणची वाहतूक कोंडी ही प्रवाशांना मनस्ताप ठरत होती. शुक्रवारी नवीन पूल वाहतुकीस सुरू …

Read More »

लोधिवलीतील अंबानी हॉस्पिटलसाठी ग्रामसभेत ठराव

रसायनी : प्रतिनिधी लोधिवली येथिल धिरूभाई अंबानी हास्पिटल बंद न करता सुरळीत चालू राहण्यासाठी लोधिवली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायत परिसरात सर्व नागरिक एकत्र येऊन ग्रामपंचायतीमार्फत धिरुभाई अंबानी हास्पिटल बंद होऊ नये, असा ठराव बहुमताने पास करून घेतला. कै. धिरुभाई अंबानी यांनी लोधिवली येथील शेतकर्‍यांच्या जमिनी खरेदी …

Read More »

तन्वी गावंड हिचे संगणक विज्ञान अभियांत्रिकी शाखेत सुयश

उरण : प्रतिनिधी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनने  घेतलेल्या परीक्षेचे अभियांत्रिकी शाखेच्या तिसर्‍या वर्षाचे निकाल जाहीर झाले. या तिसर्‍या वर्षात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, पेण महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स या डिपार्टमेंटमध्ये सलग तीन वर्ष तन्वी विलास गावंड या विद्यार्थिनीने 83.50 टक्के  गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवण्याचा बहुमान मिळविला आहे.  तन्वीच्या या यशाबद्दल …

Read More »

सोमवारी उरणमधील दवाखाने बंद

इमर्जन्सी सेवा सुरू उरण : बातमीदार कोलकाता येथील रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 17) डॉक्टरांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्याला पाठिंबा म्हणून उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनही उरणमधील दवाखाने बंद ठेवणार असून फक्त इमर्जन्सी सेवा सुरू ठेवणार असल्याची माहिती प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे. कलकत्ता …

Read More »

रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा -पालकमंत्री

रसायनी : प्रतिनिधी रसायनी परिसरातील बारा गावांतील शेतकर्‍यांची सोळाशे एकर जमीन सातशे ते आठशे रुपये एकरी या भावाने 1860 रोजी भारत सरकारने घेतली. यातील काही जमीन औद्योगिकीकरणासाठी वापरली, तर काही पडून आहे. याअगोदर हिंदुस्थान ऑरगेनिक केमिकल कंपनीच्या ताब्यातील जमीन इस्त्रो व बीपीसीएल प्रकल्पाला देण्यात आली असताना शेतकर्‍यांच्या प्रलंबित मागण्या विचाराधीन …

Read More »

उरणच्या पाच वर्षीय चिमुरडीने केले कळसुबाई ‘सर’

उरणः प्रतिनिधी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे उरण तालुक्यातील भेंडखळ गावची हर्षिती भोईर या पावणेपाच वर्षांच्या चिमुरडीने महाराष्ट्रातील सर्वात उंच असणार्‍या कळसुबाई शिखराला 7 जूनला गवसणी घालत हे अंतर अवघ्या साडेतीन तासांत पार  केले आहे. आता ती माऊंट  एव्हरेस्ट सर करण्याच्या तयारीत आहे. हर्षितीच्या या पराक्रमामुळे उरणसह भेंडखळ गावाचे नाव …

Read More »

जिल्हा नियोजन भवनाचे मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन

अलिबाग ः प्रतिनिधी येथील जिल्हा नियोजन भवन या नवीन इमारतीचे शनिवारी (दि.15) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  थाटात ई-उद्घाटन करण्यात आले.  या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ संदेश पाठवून रायगड जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या. तसेच अलिबाग येथे जिल्हा प्रशासनाची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीच्या रु.50 कोटी रुपायांच्या प्रस्तावास …

Read More »