पोलादपूर : प्रतिनिधी मुंबईतील मित्रांसोबत वर्षासहलीची मजा लुटण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील कुडपण बुद्रुक येथे आलेल्या राजेंद्र विश्राम शेलार याचा शनिवारी ओढासदृश नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरा ओढ्यातील दगडांमध्ये अडकलेला त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात महाड येथील गिर्यारोहक आणि धाडसी तरुणांना यश आले. मूळचा कुडपण येथील राजेंद्र शेलार हा मुंबईतील सांताक्रूझ येथे …
Read More »Monthly Archives: July 2019
झुगरेवाडीमध्ये आदिवासीचे घर कोसळले
कर्जत : बातमीदार तालुक्यातील झुगरेवाडीमधील शंकर गोमा झुगरे यांचे राहते घर शनिवारी वादळी वार्यात कोसळले. त्या वेळी शंकर झुगरे घरात झोपले होते, मात्र किमान तासभर गावातील लोकांना त्याबाबत काहीही माहिती नव्हती. शेवटी घराची कोसळलेली कौले उचलत असताना स्थानिकांना त्याबाबत माहिती झाली आणि झोपलेल्या झुगरे यांना बाहेर काढण्यात आले. त्यांच्या घराच्या …
Read More »महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना कर्जत रेल्वे पॅसेंजर असो. सदस्यांची मदत
कर्जत : बातमीदार वांगणी-बदलापूर दरम्यान अडकून पडलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शनिवारी अनेकांचे हात पुढे आले होते. त्यात कर्जत पॅसेंजर असोसिएशनचे अनेक सदस्य या मोहिमेत सहभागी झाले होते. राजाभाऊ कोठारी यांनी आपल्या सहकार्यांसह मोहीम राबवून अनेकांना सुखरूप बाहेर काढले. वांगणी ते बदलापूर दरम्यान चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील …
Read More »दहिवली पुलावरून सलग 33 तास पाणी
45 वर्षांत प्रथमच इतके पाणी कर्जत : बातमीदार नेरळ-कळंब रस्त्यावर उल्हास नदीवर असलेल्या दहिवली-मालेगाव या पुलाची शनिवार (दि. 27)च्या पावसाने बिकट स्थिती केली आहे. या पुलावरून सलग 33 तास पाणी गेले आहे. मागील 45 वर्षात प्रथमच एवढे तास पुलावरून पाणी गेले आहे, त्यामुळे पुलावरील डांबर वाहून गेले असून, नव्याने अधिक …
Read More »कर्जत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक सुजाता तानवडे यांना निरोप
कर्जत : प्रतिनिधी येथील पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ निरीक्षक सुजाता तानवडे यांची रसायनी पोलीस ठाण्यात बदली झाली. त्यांना कर्जतमधील पोलीस कर्मचार्यांच्या वतीने निरोप देण्यात आला. सुजाता तानवडे यांनी 30 मार्च 2017 रोजी कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याअगोदर त्या पुणे येथे सीबीआयमध्ये कार्यरत होत्या. कर्जत …
Read More »नेरळ हंबरपाडामध्ये अडकलेल्या 21 जणांची सुखरूप सुटका
कर्जत : बातमीदार मुसळधार पावसाने शनिवारी कर्जत तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आला. सखल भागात पाणीच पाणी झाले होते. नेरळजवळ असलेल्या हंबरपाडा येथील रामाबाग सोसायटीमधील बेंद्रे फार्मच्या आजूबाजूला पाणी भरल्याने तेथे पर्यटनासाठी आलेले 27 जण अडकून पडले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात स्थानिक यंत्रणांना यश आले. शनिवारी …
Read More »बसस्थानकातील शौचालयाचा मैला रस्त्यावर
प्रवाशांसह रोह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात रोहे ः प्रतिनिधी तालुक्याचे ठिकाण असलेल्या रोहा एसटी बसस्थानकातील शौचालयाची टाकी भरून त्यातील मैला बसस्थानकाच्या आवारात व रस्त्यावर आला आहे. त्यामुळे प्रवाशांचे व रोह्यातील नागरिकांचेे आरोग्य धोक्यात आले आहे. रोहा शहरातील एसटी बसस्थानक खासगीकरणातून बांधले आहे. या स्थानकात मुतारी व शौचालये आहेत. या शौचालयाचा वापर …
Read More »अलिबागमधील मुस्लिम बांधवांचा भाजपमध्ये प्रवेश
अलिबाग : प्रतिनिधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या उपस्थितीत अलिबाग शहरातील मुस्लिम बांधवानी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यातील इब्राहिम हसन खान यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या अलिबाग शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर यांनी त्यांना …
Read More »शेकापने पेण तालुक्याचा विकास केला नाही -रविशेठ पाटील
पेण : प्रतिनिधी मागील 40 वर्षे पेणमध्ये शेकापचा आमदार आहे, मात्र त्यांनी तालुक्याचा विकास न करता येथील जनतेची फक्त फसवणूक केली आहे, मात्र सर्वांना सर्वकाळ फसवता येत नाही, हे शेकाप नेत्यांनी लक्षात ठेवावे, अशी टीका माजी मंत्री तथा भाजप नेते रविशेठ पाटील यांनी येथे केली. पेणमधील आगरी समाज हॉलमध्ये झालेल्या …
Read More »रायगडात अतिवृष्टी; जनजीवन विस्कळीत
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला शनिवारी (दि. 27) सलग दुसर्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे सावित्री, कुंडलिका, अंबा, उल्हास, पातळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड, रोहा, नागोठणे, कर्जत या शहरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. रस्ते रेल्वे, वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला. पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. पावसामुळे …
Read More »