कर्जत : बातमीदार नेरळ-माथेरान घाटरस्त्यात गुरुवारी (दि. 25) दुपारी शेकडो वर्षांपूर्वींचे झाड रस्त्यावरच कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु दोन तास वाहतूक ठप्प होती. त्यामुळे घाटरस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वन विभागाच्या सहाकार्याने दोन तासांनंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. आठवडाभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा बरसण्यास सुरुवात केली …
Read More »Monthly Archives: July 2019
समाधानकारक पावसामुळे बळीराजा सुखावला ; रायगडात 85 टक्के भात लावणी पूर्ण
अलिबाग : प्रतिनिधी सर्वत्र पाऊस समाधानकारक पडत असल्यामुळे रायगड जिल्ह्यात भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात भात लावणीची 85 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. रायगड जिल्ह्यात एक लाख 23 हजार हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. यापैकी यंदा एक लाख चार हजार हेक्टरवर भात लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. …
Read More »हुसेन जमाली नवीन अध्यक्ष
कर्जत : बातमीदार येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणून हुसेन जमाली यांची निवड करण्यात आली. कर्जतच्या सीबीसी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हुसेन जमाली व क्लबच्या नवीन पदाधिकार्यांनी पदभार स्वीकारला. पदग्रहण सोहळ्यात विविध क्षेत्रांत काम करणार्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सुरुवातीस मावळते अध्यक्ष रामदास घरत यांच्याकडून हुसेन जमाली यांनी रोटरी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. …
Read More »डॉ. धर्माधिकारी महाविद्यालयात युवा माहितीदूत कार्यक्रम
रोहा ः प्रतिनिधी कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात सोमवारी (दि. 22) युवा माहितीदूत हे अॅप डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. युवा माहितीदूत अॅपमध्ये राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आहे. युवकांना माहितीदूत म्हणून काम करण्यासाठी हे अॅप महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक कांतीलाल पाटील यांनी या वेळी केले. …
Read More »पाली बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवासी त्रस्त
पाली : प्रतिनिधी परिवहन महामंडळाचे पाली (ता. सुधागड) येथील बसस्थानक समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. धोकादायक इमारत दुरुस्तीचा प्रश्न सतावत असतानाच पावसाळ्यात बसस्थानक आवारात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे बसस्थानकात येणार्या-जाणार्या प्रवासी-विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. संबंधित प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिक करीत आहेत. पाली …
Read More »पनवेलमध्ये पर्यावरणपूरक कागदाच्या गणेशमूर्ती
पनवेल ः बातमीदार गणेशोत्सवाला 2 सप्टेंबरपासून सुरुवात होत असून गणेशमूर्ती बाजारात दाखल होऊ लागल्या आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी होत असलेल्या जनजागृतीमुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची मागणी वाढत आहे. त्यामुळे या वर्षी शाडूच्या मूर्तीबरोबर कागदी लगद्यापासून बनविलेल्या मूर्ती बाजारात आल्या आहेत. या पूर्णपणे पर्यावरणपूरक मूर्ती असल्याचा दावा मूर्तिकारांनी केला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सरकारकडून वारंवार …
Read More »नेरूळ ते भाऊचा धक्का जलप्रवास मार्चपासून
उरण ः रामप्रहर वृत्त रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून जलवाहतुकीवर शासनाने भर दिला असून नेरूळ ते भाऊचा धक्का जलप्रवास दृष्टिक्षेपात आला आहे. नेरूळ जेट्टीचे निम्मे काम पूर्ण झाले असून मार्च 2020 पर्यंत जलप्रवासासाठी जेट्टी तयार असेल, असा विश्वास सिडकोने दाखविला आहे. त्यामुळे पुढील वर्षांत नवी मुंबई ते मुंबई हा प्रवास फक्त …
Read More »मासेमारीला होणार 1 ऑगस्टपासून सुरुवात
उरण ः रामप्रहर वृत्त शासनाच्या खोल समुद्रातील 60 दिवसांच्या पावसाळी मासेमारी बंदीच्या आदेशानंतर 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होणार आहे. फक्त 12 दिवसांचाच अवधी उरल्याने पर्सिसीयन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारातील सुरू होणार्या मासेमारीसाठी करंजा-मोरा-कसारा, ससूनडॉक बंदरात मच्छीमारांची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू झाली आहे. खोल समुद्रातील मासेमारी …
Read More »वर्गमित्रावर चोरी करण्यासाठी दबाव?
पनवेल : कामोठे सेक्टर 34 येथील एका कॉन्व्हेंट शाळेत नववीत शिकणार्या दोन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्राला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याला त्याच्याच घरात चोरी करण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. गेल्या दोन वर्षांत अशाप्रकारे या पीडित विद्यार्थ्यांने आपल्या घरातून दोन लाख 90 हजार रुपयांची रोख रक्कम व ऐवज चोरी …
Read More »कळंबोलीकरांचा वळसा वाचवण्यासाठी भाजपचा पाठपुरावा
महामार्ग, सर्व्हिस रोडला जोड रस्ता करा; कळंबोली शहर भाजपचे सिडको अध्यक्षांना साकडे पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे, तसेच पनवेल-सायन महामार्गावरून कळंबोलीत जाण्याकरिता थेट शिवसेना शाखेजवळील मार्गाचा वापर करावा लागतो. यामुळे दीड ते दोन किमी वळसा घालावा लागत आहे. दोन्ही वसाहतीतील रहिवाशांची गैरसोय टळावी याकरिता कळंबोली भाजपकडून पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात …
Read More »