बंगळुरू : वृत्तसंस्था टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. देशसेवा करण्याच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने धोनीने उचललेलेे हे महत्त्वाचे पाऊल आहे. भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटच्या बंगळुरू येथील मुख्यालयात धोनी बुधवारी (दि. 24) दाखल झाला. लष्कराचे प्रशिक्षण मिळावे म्हणून धोनीने भारतीय क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडिज …
Read More »Monthly Archives: July 2019
टीम इंडियाच्या जर्सीवर झळकणार नव्या कंपनीचे नाव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था वेस्ट इंडिज दौर्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीमध्ये बदल होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात भगवी जर्सी घातली होती, पण आता या जर्सीमध्ये होणारा बदल हा रंगासंबंधी नसून नावासंबंधी असणार आहे. भारतीय संघ सध्या परिधान करीत असलेल्या जर्सीवर ओप्पो असा …
Read More »विश्वचषक पात्रता सामन्यातून मेस्सी निलंबित
असुन्सिऑन (पॅराग्वे) : वृत्तसंस्था अर्जेंटिनाचा नामांकित फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला 2022च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पुढील वर्षी होणार्या पहिल्या पात्रता सामन्यातून निलंबित करण्यात आले. 6 जुलैच्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील चिलीविरुद्धच्या सामन्यात मेस्सीला लाल कार्ड दाखवल्यामुळेच पात्रता सामन्यासाठी निलंबित करण्यात आल्याचे द. अमेरिकन फुटबॉल महासंघाने जाहीर केले. निलंबनामागे मेस्सीने अंतिम सामन्यानंतर केलेले …
Read More »तेलगू टायटन्सच्या पराभवाची हॅट्ट्रिक
इंदूर : वृत्तसंस्था प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात तेलगू टायटन्सच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना तेलगू टायटन्सने बुधवारी (दि. 24) आपल्या पराभवाची हॅट्ट्रिक नोंदवली. अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या सामन्यात दबंग दिल्ली संघाने तेलगू टायटन्सवर 34-33 अशा एका गुणाच्या फरकाने मात केली. कोल्हापूरच्या सूरज आणि सिद्धार्थ देसाई या बंधूंनी या सामन्यात …
Read More »शोषणाला अटकाव
आजच्या घडीला बालकांवरील बलात्कारांसोबतच लैंगिक शोषणाच्या असंख्य घटना देशभरात शहरी, ग्रामीण सर्व भागांत नोंदल्या जाताना दिसत आहेत. अर्थातच वाढत्या जागरुकतेमुळेही ही संख्या वाढलेली दिसते आहे. केंद्र सरकारने जमवलेल्या माहितीमध्ये देशभरात असे तब्बल सहा लाख 20 हजार गुन्हेगार वावरत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्या गुन्हेगारांना …
Read More »धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईतील डोंगरी येथे चार मजली इमारत कोसळली. त्यात 14 लोकांचे जीव गेले. 40 जणांपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई, ठाणे, कल्याण, कळवा, मुंब्रा आदी परिसरात इमारत कोसळून जीवित व वित्तहानी होत असते. एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्याबद्दल चर्चा होते. …
Read More »नवीन पनवेलमधील पाणीपुरवठा सुरळीत करा
महापौरांचे निर्देश पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील सिडको नोडमधील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने लवकरात लवकर उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी बुधवारी (दि. 24) दिले. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि सिडको अधिकार्यांची बैठक महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी बुधवारी दुपारी 2 वाजता महापालिका मुख्यालयात बोलावली …
Read More »पावसाचे पुनरागमन
रायगड जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागांत बुधवारी (दि. 24) पर्जन्यवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अलिबाग, महाड, माणगाव, रोहा, सुधागड या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. मंगळवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सकाळी दोन तास त्याने विश्रांती घेतली. त्यानंतर धुवाँधार …
Read More »शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे अधिकार्यांना आदेश अलिबाग : जिमाका शहरी व ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासन अनेक लोकाभिमुख योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे आदेश रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकारिवर्गाला दिले. ते बुधवारी (दि. 24) काशिद येथील प्रकृती रिसॉर्ट येथे …
Read More »‘सावधान’ चित्रपट उद्या होणार प्रदर्शित
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त एनसीजी एंटरटेंमेंटची निर्मिती असलेला ‘सावधान-एक अद्भुत कहानी’ हा हॉरर हिंदी चित्रपट शुक्रवारी (दि. 26) प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने नवीन पनवेल येथील ओरियन मॉलमध्ये प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार …
Read More »