Breaking News

Monthly Archives: July 2019

रेवदंडा पोलीस कर्मचारी वसाहतीची दुरवस्था

रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा पोलीस कर्मचारी वसाहत दुरवस्थेत असून अवघ्या 32 वर्षांत इमारत पडीक झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जाते. रेवदंडा पोलीस ठाणेनजीकच सन 1987 साली पोलीस कर्मचारी वसाहतीचा शुभारंभ झाला. या पोलीस कर्मचारी वसाहतीमध्ये काही वर्षांत रेवदंडा पोलीस ठाणे कर्मचारीवर्गाने राहण्यासाठी उपभोग घेतला, परंतु कालांतराने या इमारतीच्या स्लॅबमधून पाणी …

Read More »

उमरोलीत डासांचा त्रास

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रापंचायत हद्दीत अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग दिसून येत आहेत. घंटागाडी नियमित येत नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणूनदेखील याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून डासांमुळे स्थानिक हैराण झाले आहेत. …

Read More »

सुधागडला पावसाने झोडपले

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी पाली-बेणसे ः प्रतिनिधी सुधागडसह संपूर्ण रायगड जिल्ह्याला सलग चार दिवस पावसाने चांगलेच झोडपले. परिणामी मुसळधार पर्जन्यवृष्टीने जनजीवन विस्कळीत केले आहे. अशातच मंगळवारी  (दि. 23) रात्रीपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने सकाळी पाली, जांभूळपाड्यासह सुधागडात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. सलग कोसळणार्‍या पावसामुळे 1989च्या प्रलयकारी महापुराच्या आठवणी …

Read More »

‘त्या’ गाडीचालकाला रुग्णालयातून अटक

पनवेल : बातमीदार कामोठ्यात बेदरकार गाडी चालवून अपघात करणार्‍या चालकास मंगळवारी (दि. 23) पनवेल शहरातील लाइफलाइन रुग्णालयातून अटक करण्यात आली. हरबिंदर सिंग माटारू (वय 75) असे त्याचे नाव असून, अपघातानंतर तो फरार होऊन रुग्णालयात दाखल झाला होता. कामोठे सेक्टर 6 येथील मुख्य रस्त्यावर रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात घडला …

Read More »

सारडे प्राथमिक शाळेत साकारले शैक्षणिक संग्रहालय

उरण : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारडे मधील उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकूर त्यांच्या संकल्पनेतून व मुख्याध्यापिका ऊर्मिला म्हात्रे, समद्धी वर्‍हाड, सुनील नर्वे यांनी रायगड जिल्ह्यातील पहिल्या शालेय शैक्षणिक संग्रहालयाची निर्मिती केली आहे. जिल्हा परिषदेच्या सारडे शाळेत रायगड जिल्ह्यातील पहिल्या शालेय शैक्षणिक संग्रहालयाचे उद्घाटन उरणच्या गटशिक्षण अधिकारी दीपा परब …

Read More »

गव्हाणमध्ये गुरुकुल पालक मेळावा

गव्हाण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये इयत्ता 5 वी ते 10 वीमधील विद्यार्थ्यांच्या पालकांचा  गुरुकुल पालक मेळावा बुधवारी (दि. 24) झाला. स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत हे अध्यक्षस्थानी होते. …

Read More »

अरविंद मोरे यांचा वाढदिवस बालग्रामच्या ‘सुपर 30’सोबत

पनवेल : बातमीदार पूर्वीपासूनच मानवाच्या आनंद व्यक्त करण्याच्या तर्‍हा ह्या भिन्न भिन्न आहेत. हल्ली वाढदिवस साजरे करण्याला एक नवीनच क्रेझ प्राप्त झाली आहे. काही जण मात्र या पारंपरिक वाढदिवस साजरा करण्याला बगल देऊन वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. ते इतरांपेक्षा काही वेगळा विचार करतात. जे समाजापासून दूर आहेत, ज्यांना कुठलाही आधार …

Read More »

बेपत्ता रिक्षाचालकाचा मृतदेह सापडला

पनवेल : बातमीदार नेरूळ सेक्टर 18 मधील तलावात रविवारी दुपारी बुडालेल्या नामदेव सखाराम देवघरे या रिक्षाचालकाचा मृतदेह अखेर सोमवारी सकाळी तलावात सापडला. रविवारी दुपारी देवघरे हे तलावात पोहण्यासाठी उतरले असताना, ते बुडाले होते. देवघरे यांना चांगले पोहता येत होते. त्यामुळे तलावात पोहण्यासाठी उतरल्यानंतर ते तलावातील गाळात रुतले असावेत. त्यामुळे त्यांचा …

Read More »

पनवेलमध्ये तीन, तर घणसोलीत दोन वीज उपकेंद्र ; महावितरणचे स्तुत्य पाऊल

पनवेल : बातमीदार पनवेल शहर व आजूबाजूच्या परिसरात महावितरणच्या ग्राहकांना योग्य दाबाचा व अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण व महापारेषणातर्फे विविध कामे करण्यात येत आहेत. यामध्ये महापारेषणतर्फे 220 केव्ही टिंबरमार्केट उपकेंद्र, पनवेल शहर येथे, तसेच महावितरणतर्फे 33 केव्ही टपालनाका उपकेंद्र व 33 केव्ही सुकापूर उपकेंद्र नवीन पनवेल या भागामध्ये उभारण्यात येत …

Read More »

नवीन पनवेलमधील धोकादायक केबल भूमिगत करण्याची मागणी

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील धोकादायक पद्धतीने घरावर टांगलेल्या वीज केबलमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने त्या भूमिगत करण्याची मागणी नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी महावितरणच्या पनवेल येथील मुख्य अभियंत्यांकडे केली आहे. नवीन पनवेलमधील सेक्टर 12, 13, 14 आणि 18 मध्ये महावितरणच्या अनेक वीज वाहक केबल उघड्या आहेत किंवा त्या घरावर धोकादायक …

Read More »