Breaking News

Monthly Archives: July 2019

माजी नगरसेविकेला मोबाईलद्वारे तलाक ; नवर्याविरुद्ध मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा

मुरूड : प्रतिनिधी मुरूड येथील माजी नगरसेविका नादीया ढाकम यांना तिच्या पतीने भ्रमणध्वनीद्वारे ट्रिपल तलाक दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पती ताबिश इब्राहिम ढाकम याच्या विरोधात मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरूडमध्ये प्रथमच ट्रिपल तलाकची केस समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ताबिश ढाकम याचा पहिला विवाह …

Read More »

माणगावमध्ये विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

अलिबाग : जिमाका माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (दि. 13) करण्यात आले. माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या सहकार्यातून अशोकदादा साबळे विद्यालयाची नूतन इमारत साकारली आहे. आमदार भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास भाजप नेते कृष्णा कोबनाक, …

Read More »

बिरवाडीतील चोर्यांमागे मध्य प्रदेशची टोळी ; पळून जाणार्या दोघांना खेडमध्ये पकडले, एक जण फरारी

महाड : प्रतिनिधी महाडच्या बिरवाडी व काळीज परिसरात धुमाकूळ घालत साडेपाच लाखांचा ऐवज लुटून गेलेल्या चोरट्यांपैकी दोघांना खेड पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान पकडले आहे. महाड पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असून, परिसरात चोर्‍या करणारी ही टोळी मध्य प्रदेशातील असल्याचे उघड झाले आहे. महाड शहर, बिरवाडी, तसेच औद्योगिक परिसरात गेल्या महिनाभरापासून सातत्याने चोर्‍या, …

Read More »

आरोग्य महाशिबिराच्या नियोजनासाठी आज बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाशिबिराच्या नियोजनासंदर्भात सोमवारी (दि. 15) सायंकाळी 5.30 वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस …

Read More »

राज्याचे मुख्यमंत्रीपद दूरच, 50चा आकडा तरी पार करून दाखवा ; गिरीश महाजन यांचे काँग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान

नाशिक : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने 288पैकी 50चा आकडा पार करून दाखवावा, असे आव्हान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी  दिले आहे. नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना आमच्या शुभेच्छा, पण मुख्यमंत्री आघाडीचा होणे हा फार दूरचा विषय, …

Read More »

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवरही तोडगा -मुख्यमंत्री

मुंबई : विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा अधिकच्या जागा वाढवून क्षती भरून काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ’सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’चळवळीच्या शिष्टमंडळाशी सह्याद्री अतिथीगृह येथे चर्चा करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, या आरक्षणामुळे खुल्या गटातील ज्या …

Read More »

गजल ग्रुपतर्फे ए. के. शेख यांचा पनवेलमध्ये सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील गजल ग्रुपतर्फे ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख यांचा शनिवारी (दि. 13) सत्कार करण्यात आला. शेख सरांचा ‘गजलवेदना’ या गजलसंग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एमए (फर्स्ट पार्ट) मराठीच्या नवीन अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचा सर्व स्तरातून सन्मान होत आहे. पनवेल येथील शासकीय बीएड …

Read More »

सागरी सुरक्षा जनजागृती अभियान

मोरा पोलीस ठाण्याच्या वतीने मार्गदर्शन पनवेल ः वार्ताहर मोरा सागरी पोलीस ठाणे यांच्या वतीने मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माणकेश्वर मंदिर केगाव येथे सागरी सुरक्षा जनजागृती अभियान याविषयी नुकतीच मिटिंग घेण्यात आली. समुद्रातील अनोळखी बोट, समुद्र किनारी इतरत्र अनोळखी फिरणारी व्यक्ती यांची माहिती मोरा …

Read More »

लाकडाने मारहाण, एक जखमी

पनवेल ः जय मल्हार हॉटेलसमोर उभे केलेली शेड काढत असताना संग्राम भोपी याने ताई तुकाराम ढोकळ (वय 60) या महिलेला लाकडाच्या सहाय्याने मारहाण केली. शहर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरढोण येथील ताई तुकाराम ढोकळ शिरढोण गावचे बस स्टॉपजवळ जय मल्हार हॉटेलसमोर जागा आहे. या ठिकाणी गावातील …

Read More »

‘पदपथावर दुचाकी उभी करणार्यांवर कारवाई करा’

पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमध्ये रस्त्याने चालण्यासाठी जागा नसताना आता दुचाकीवाले आपल्या गाड्या पदपथावर उभ्या करू लागल्याने आता चालायचे कोठून, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वाहतूक पोलिसांनी अशा दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. नवीन पनवेलमध्ये रेल्वे स्टेशन समोरील रस्त्याच्या कोणत्याही बाजूला जागा मिळेल तिथे रिक्षा स्टँड …

Read More »