लंडन : वृत्तसंस्था दोलायमान सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने दुसर्या मानांकित रॉजर फेडररला पराभूत करीत पाचव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकाविले. सुमारे चार तास 55 मिनिटे चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात जोकोविचने फेडररला 7-6, 1-6, 7-6, 4-6, 13-12 अशा सेटने पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सर्व्हिस राखली. फेडररलाच 2-1 या स्कोअरवर एक ब्रेकपॉइंट …
Read More »Monthly Archives: July 2019
‘त्या’साठी मी आयुष्यभर न्यूझीलंडची माफी मागेन : स्टोक्स
लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णायक क्षणी इंग्लंडला मिळालेल्या चार अतिरिक्त धावांबाबत विजयाचा शिल्पकार बेन स्टोक्सने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तशा प्रकारे धावा मिळविण्याचा माझा हेतू नव्हता. चेंडू माझ्या बॅटला लागून सीमारेषेपार गेला. त्यासाठी मी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची माफी मागितली. मी केनला म्हणालो की, या घटनेसाठी …
Read More »इंग्लंड नवा विश्वविजेता
रोमहर्षक अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ‘सुपर’ विजय लॉर्ड्स : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. न्यूझीलंडने 50 षटकांत 241 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील 241 धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकारांच्या निकषावर …
Read More »द्रोणागिरी हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धेसह शार्क संवर्धन दिन साजरा
करंजा : रामप्रहर वृत्त द्रोणागिरी हायस्कूल करंजा येथे रविवारी (दि. 14) जागतिक शार्क संवर्धन दिनानिमित्त वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेने संरक्षित सागरी जीव बचाव करण्यासाठी कार्यशाळेचे व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या वेळी सागरी जीव संशोधन करणारे स्वप्नील तांडेल यांनी शार्क माशांच्या संवर्धनासाठी मार्गदर्शन केले. या वेळी …
Read More »शेतीकामासाठी बळीराजाची लगबग
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त गेले काही दिवस पावसाचे अगमन मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतीची कामे पूर्णपणे खोळंबली होती, मात्र पाऊस क्षणभर विश्रांती घेत असल्यामुळे आता बळीराजा लावणीत गुंतला असून गीत गात शेतातील कामे करीत आहे. सध्या पाऊस येत असून आणि लगेच जात असल्याने या वेळेत शेतीची कामे करण्यास शेतकर्यांची लगबग …
Read More »बांधकाम व्यावसायिकाने केली 18 लाखांची फसवणूक
पनवेल : बातमीदार सिडकोच्या मंजूर प्लॅनपेक्षा वेगळा असा खोटा व बनावट नकाशा तयार करून, कागदपत्रांमध्ये जोडून, तो खरा आहे असे भासवून बांधकाम व्यावसायिकाने एका ग्राहकाची 18 लाखांची फसवणूक केली आहे. खारघर कोपरा येथील सेकटर 10 मध्ये राहणारे शिवराम प्रभाकर सुतार (वय 31 वर्ष) यांनी कोपरा, सेक्टर 10 येथील एकता कन्स्ट्रक्शनच्या …
Read More »खारघर हिलसाठी रहिवासी सरसावले
खारघर : प्रतिनिधी खारघर शहराला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झालेले आहे. सिडकोने या परिसराचा विकास केला आहे, मात्र विकासाच्या नावाखाली शहराच्या नैसर्गिक साधनसंपदेचे जतन होणे गरजेचे आहे. या हेतूने शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन रविवारी खारघर हिल परिसरात बंधारे बांधण्यास सुरुवात केली आहे. आय नेचर ऑच या संस्थेमार्फत दगडाचे बांध …
Read More »विद्यार्थ्यांनो, चांगले नागरिक बना : दत्तात्रेय नवले; सीकेटी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव
पनवेल : रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन उच्चपदस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि भविष्यात देशाचे चांगले नागरिक बनावे, असे आवाहन पनवेलचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी केले. ते खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर …
Read More »काँग्रेसच्या प्रमोद केणे यांनीही हाती घेतले ‘कमळ’
उलवे नोड : रसायनी परिसरातील तुराडे येथील काँग्रेसचे कार्यकर्ते प्रमोद केणे यांनी त्यांच्या समर्थकांसह रविवारी (दि. 14) भाजपमध्ये प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या कार्यक्रमास भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष व पं. …
Read More »भाजपमध्ये वाढता ओघ ; कामगार संघटनेच्या पदाधिकार्यांचा पक्षप्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्यांचा ओघ सातत्याने वाढत आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून पनवेल येथील लक्ष्मी वसाहतीमधील कर्नाटकी ऐक्य कामगार संघटनेच्या असंख्य पदाधिकारी व सदस्यांनी रविवारी (दि. 14) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper