कर्जत ः बातमीदार नवी मुंबई येथून सहा ट्रेकर्सची टीम पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आली होती, परंतु त्यातील एकाचा पाय घसरून तो 500 फूट दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस व माथेरान येथील सह्याद्री रेस्क्यू टीम यांनी अथक प्रयत्न करून या पर्यटकाचे प्राण वाचवले आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत माथेरानजवळ शिवकालीन पेब किल्ला …
Read More »Monthly Archives: September 2019
प्रवासी शेड दुरुस्त करण्याची मागणी
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड नगर परिषद हद्दीतील गणेश पाखाडीजवळील प्रवासी शेड मोडकळीस आली असून असंख्य प्रवासी व विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून मुरूड नगर परिषदेने या प्रवासी शेडची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी केली आहे. गणेश पाखाडीमधील असणार्या प्रवासी …
Read More »कर्जफेडीसाठी सहकार्य करा -कौसल्या पाटील
पाटणेश्वर अर्बन बँकेच्या वार्षिक सभेत कर्जदारांना आवाहन पेण ः प्रतिनिधी श्री. पाटणेश्वर अर्बन को-ऑप बँकेच्या कर्जदारांनी कर्ज फेडण्यासाठी बँकेला सहकार्य करून कर्जाची फेड मुदतीत करावी, असे आवाहन बँकेच्या अध्यक्षा कौसल्या पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केले. श्री. पाटणेश्वर अर्बन को-ऑप बँक लि. बँकेची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. …
Read More »दिवाळीआधी निवडणुकीचा बार
महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान नवी दिल्ली : वृत्तसंस्था सर्वांना उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा अखेर झाली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून, दोन्ही निवडणुकांचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी म्हणजेच दिवाळीपूर्वीच जाहीर केला जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शनिवारी (दि. …
Read More »कळंबोलीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन कळंबोली कातकरी वाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 20) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे माजी स्थायी सभापती व विद्यमान नगरसेवक अमर पाटील, भाजप कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, नगरसेविका …
Read More »रायगडात विसावल्या परराज्यांतील होड्या
खराब हवामानाचा फटका मुरूड : प्रतिनिधी खराब हवामानामुळे महाराष्ट्रासह परराज्यांतील शेकडो मच्छीमारी होड्या सध्या रायगड जिल्ह्यातील विविध किनार्यांवर विसावल्या आहेत. सप्टेंबर महिन्याच्या 2 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात कधी जोरदार वार्यांचा मारा, तर कधी मुसळधार पावसामुळे मासेमारी करून उदरनिर्वाह करणार्या कोळी समाजावर नैसर्गिक संकट कोसळले आहे. त्यामुळे मासेमारीसाठी कोकणात आलेल्या रत्नागिरी, पालघर …
Read More »राष्ट्रवादीच्या यात्रेमुळे महाडमध्ये वाहतूक कोंडी
महाड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेची शनिवारी (दि. 21) किल्ले रायगड येथे सांगता झाली. त्यानंतर महाडमध्ये आलेल्या या यात्रेमुळे नागरिकांना पाच तास वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. या वेळी उपस्थित नेत्यांनी व्यासपीठावरून भारतमाता की जयच्या घोषणा देऊन भाजपच्या देश-धर्मप्रेमाची कॉपी केल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा …
Read More »पनवेल मनपा हद्दीत विकासकामे
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीमध्ये अनेक विकासकामे करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत धानसर, करवले, नावडे, किरवले, सागाचीवाडी, वाघाचीवाडी, टेंभोडे येथील विविध कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 20) करण्यात आले. पनवेल …
Read More »लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा -मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी लोकशाहीच्या उत्सवात महाराष्ट्रातील प्रत्येक बंधू- भगिनीने सहभागी व्हावे. आपले मत ही विकास प्रक्रियेतील फार मोठी शक्ती आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर जनतेला आवाहन केले आहे. दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला, तसेच भाजप-शिवसेना एकत्र लढणार असल्याचेही …
Read More »महाराष्ट्राचा महासंग्राम
महाराष्ट्राच्या महासंग्रामाचे अर्थात विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले. महिनाभर हा निवडणुकोत्सव रंगणार आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या वेगवेगळ्या निवडणुका असो की विधिमंडळ सभागृहातील कामकाज; सत्ताधारी सरस आणि विरोधक निष्प्रभ असेच चित्र राज्यात पाहावयास मिळाले. सद्यस्थिती पाहता होऊ घातलेल्या निवडणुकीतूनही वेगळा कल समोर येईल, अशी शक्यता दिसत नाही. केंद्रात सत्ताधारी भाजपचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper