Breaking News

Monthly Archives: December 2019

नीलची जलतरण स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

पेण ः प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने 15 डिसेंबर रोजी चिवला बीच, मालवण येथे 10व्या खुल्या जलतरण स्पर्धा 2019 आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत दोन किलोमीटरमध्ये 11-12 वर्षे वयोगटात कुमार नील योगेश वैद्य याने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर नाव कोरून चषक पटकाविला. नील वैद्य पेण नगरपालिकेच्या मामा वास्कर जलतरण …

Read More »

राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल, महाविकास आघाडीवर शरसंधान

नागपूर : प्रतिनिधी नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. दोन अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी महापौरांच्या वाहनावर देशी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यातून महापौर जोशी थोडक्यात बचावले. नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा …

Read More »

श्रीराम लागू यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार, ‘नटसम्राटा’ला मान्यवरांची श्रद्धांजली

मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी (दि. 17) रात्री वृद्धत्वाने निधन झाले. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने रंगभूमी व सिनेसृष्टीतून शोक व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी डॉ. लागू यांच्याप्रति आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. डॉ. श्रीराम …

Read More »

नागपूर : पनवेल महापालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर यांना वाढदिवसानिमित्त भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरसेवक दिलीप पाटील, विकास घरत आदी उपस्थित होते.

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रंगला क्रीडा महोत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन बुधवारी (दि. 18) करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा आजपासून पनवेलमध्ये प्राथमिक फेरी

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या पनवेल येथील प्राथमिक फेरीला गुरुवार (दि. 19)पासून प्रारंभ होत आहे.  या स्पर्धेची पुणे येथील प्राथमिक …

Read More »

उरण, पेण पालिकेच्या विविध सभापतींची निवड

उरण : वार्ताहर येथील नगर परिषदेच्या स्थायी समिती व विविध विषय समित्यांच्या सभापतींची बुधवारी (दि. 18) बिनविरोध निवड झाली. पालिका सभागृहात झालेल्या या निवडीवेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हा अधिकारी अश्विनी पाटील यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सहकार्य केले. पदसिद्ध असलेल्या स्थायी समिती सभापतिपदी नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, …

Read More »

निर्भयाच्या आरोपीची फाशी कायम, सुप्रीम कोर्टाने फेरविचार याचिका फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींपैकी एक असलेल्या अक्षयकुमार सिंह याची फाशीची शिक्षा कायम राहणार आहे. शिक्षेविरोधात त्याने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 18) फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी प्रत्येकी अर्ध्या तासाची वेळ दिली होती. आरोपीच्या वकिलांनी या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित …

Read More »

रेशनवर मिळणार अंडी, मटण आणि चिकन?

नवी दिल्ली : सध्या रेशन दुकानावर गरिबांना गहू, तांदूळ, कडधान्ये, साखर, तेल या वस्तू कमी किमतीत वा सवलतीच्या दरात मिळतात. लवकरच अन्नधान्याबरोबरच स्वस्त दरात पोषणयुक्त मांसाहारी पदार्थदेखील रेशन दुकानावर मिळण्याची शक्यता आहे. एका वृत्तानुसार रेशन दुकानातून गरिबांना स्वस्त दरात चिकन, मटण आणि अंडी उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. …

Read More »

उरणमध्ये जनआरोग्य ई-कार्ड शिबिर

उरण : वार्ताहर उरण नगरपरिषदेवतीने व कॉमन सर्व्हिस सेंटर कोप्रोली (सी.एस.सी)च्या स्मिता म्हात्रे यांच्या सहकार्याने आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत ई-कार्ड उपलब्ध करून घेण्याकामी निवड झालेल्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी सोमवारी (दि. 16) व मंगळवारी (दि. 17) या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष …

Read More »