Breaking News

Yearly Archives: 2019

पनवेल ः रवीन हॉटेल दी पॅलेस ऑफ दी वाइंड्सद्वारा आयोजित एआयटीए सुपर सीरिज 2019ची फ्युचर स्टार्स जुनिअर टेनिस स्पर्धा नुकतीच चिपळूण येथे झाली. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आनंदी भुतडा हिने लॉन टेनिसच्या खेळात दुहेरी गटात प्रथम क्रमांक तसेच एकेरीतही द्वितीय क्रमांक मिळविला. …

Read More »

कोकणातील 105 प्रयोगशील शिक्षकांचा गौरव

ठाणे ः प्रतिनिधी कोकणातील पाच जिल्ह्यांत सर्जनशील, उपक्रमशील आणि नावीन्यपूर्ण प्रयोग राबवून शिक्षण देणार्‍या 105 शिक्षक व संस्थांचा रविवारी (दि. 17) गौरव करण्यात आला. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे स्मृतिप्रीत्यर्थ ठाण्यात रंगलेल्या पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने कोकणातील शैक्षणिक विश्वातील बुद्धिमंतांचे स्नेहसंमेलनच भरले होते. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले म्हात्रे कुटुंबीयांचे सांत्वन

पनवेल : वार्ताहर पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या मातोश्री सखुबाई मोरू म्हात्रे यांचे शनिवारी (दि. 16) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्या 85 वर्षांच्या होत्या. गव्हाण-कोपर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोपर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या …

Read More »

‘त्या’ अपघातातील दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

पोलादपूर ः प्रतिनिधी शनिवारी दुपारी पोलादपूरनजीक मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्याजवळ जेवणासाठी थांबलेल्या कंटेनरला पोलादपूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्‍या अ‍ॅक्टिवा स्कूटरची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात पोलादपूर तालुक्यातील खडपी येथील दोघे भाऊ जखमी झाले. त्यापैकी स्कूटरस्वाराचा महाड येथे मृत्यू झाल्याने खडपी गावावर शोककळा पसरली. रविवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. …

Read More »

अयोध्येचा निकाल अमान्य, मुस्लिम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने अयोध्येप्रकरणी दिलेल्या निर्णयाविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाचे सचिव जफरयाब जिलानी यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. सुप्रीम कोर्टाने हा निकाल देताना मशिदीच्या बदल्यात देऊ केलेली पर्यायी जमीन स्वीकारायची नाही, असाही निर्णय बोर्डाच्या बैठकीत झाल्याचे …

Read More »

देवेंद्र फडणवीसांनी शिवतीर्थावर वाहिली बाळासाहेबांना आदरांजली

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. रविवारी (दि. 17) सकाळपासून शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवतीर्थावर जात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे, आमदार शिवेंद्रराजे …

Read More »

पुन्हा भाजपचेच सरकार? ‘काळजी करू नका; भाजप-सेनाच सत्तेत येईल’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने कंबर कसली असताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी माहिती दिली आहे. राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आपण भाजप अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर काळजी करू नका. भाजप-शिवसेना …

Read More »

संसदेचे आजपासून अधिवेशन; शिवसेना ’एनडीए’तून बाहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संसदेचे अधिवेशन सोमवारपासून (दि. 18) सुरू होत आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून भाजपसोबत काडीमोड घेतलेली शिवसेना आता एनडीएतून बाहेर पडली आहे. संसदेतील दोन्ही सभागृहांत म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेनेचे खासदार विरोधी पक्षात बसणार आहेत. ते विरोधी पक्षांच्या बाकावर बसतील, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी (दि. …

Read More »

फडणवीसांनी सेनेला करून दिली हिंदुत्वाची आठवण

मुंबई :  ’बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वांना स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र दिला आहे’, असे सूचक विधान करत भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या स्मृतिदिनी आदरांजली वाहिली. या वेळी फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडीओ …

Read More »

पालकांनो, सावधान…

कळंबोली येथील सुधागड हायस्कूल मधील अकरावीच्या विद्यार्थ्याला  कॉलेजमध्ये  जाण्यासाठी  वडिलांनी मोटरसायकल दिली नाही म्हणून शाळेच्या बाथरूम मध्ये त्याने स्वत:ला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामध्ये त्याचे प्राणही गेले. त्यामुळे पालकांच्यात चिंतेचे वातावरण पसरेल असल्याची चर्चा शाळांच्या गेटवर सुरू झाल्याचे पाहायला मिळते. काही दिवस ही चर्चा सुरू राहील आणि पुन्हा ये …

Read More »